बुधवार, ७ एप्रिल, २०२१

उकळलेले पाणी बेचव का असते

 *_आजची माहिती_*


*_📙उकळलेले पाणी बेचव का लागते ?📙_*

************************************


_सर्दी झाली वा पोट खराब असेल तर उकळून गार केलेले कोमट पाणी तुम्ही प्यायला असाल. असे आणि बेचव लागते हे तुमच्या लक्षात आले असेल ! असे का बरे होत असावे ?_

     _पाण्याला त्याची चव त्यात विरघळलेल्या नायट्रोजनमुळे व क्षारांमुळे असते. त्यामुळे हापशाच्या पाण्याची चव, विहिरीच्या पाण्याची चव किंवा नदी, तळे, झरे, समुद्र यांच्या पाण्याची चव वेगवेगळी लागते. पाणी गरम केल्याने त्यातील विरघळलेले वायू वातावरणात निघून जातात व क्षार तळाशी गोळा होतात. अशा प्रकारे पाण्याला चव देणारे दोन्ही घटक नाहीसे झाल्याने पाणी बेचव लागते. त्यामुळेच असे पाणी प्यावे लागू नये, असेच सर्वांना वाटत असते. असे असले तरी वारंवार अामांश होणाऱ्या व्यक्तींनी उकळून गार केलेले पाणीच प्यावे. म्हणजे त्यांना आमांशाचा त्रास होणार नाही. हगवण लागलेल्या व्यक्तींनीही उकळलेले पाणी प्यावे. चवीपेक्षा सुरक्षितता जास्त महत्त्वाची असते, हे आपण समजून घ्यायला हवे._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन :गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...