अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०२४

इन्स्टंट नूडल्स सतत खाल्ल्याने पचन बिघडते, ५ दुष्परिणाम; आरोग्य धोक्यात का घालता.....?*

*इन्स्टंट नूडल्स सतत खाल्ल्याने पचन बिघडते, ५ दुष्परिणाम; आरोग्य धोक्यात का घालता.....?*

नूडल्स म्हणजे अनेकांच्या अतिशय आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. अगदी २ मिनीटांत होणारे आणि पोटभरीचे असे हे नूडल्स काही जण नियमित खातात. मोठमोठ्या कंपन्याही त्याची आकर्षक पद्धतीने जाहिरात करतात आणि आपले उत्पादन खरेदी करण्यास ग्राहकांना भरीस पाडतात. मॅगीसारखे नूडल्स तर अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने खातात. यामध्ये चीज, भाज्या, बटर असे घालून याची चव आणखी वाढवली जाते. तर चायनिज पदार्थ आवडणारेही आपल्या आजुबाजूला असंख्य जण असतात आणि हे लोक आवडीने शेजवान नूडल्स किंवा तत्सम वेगवेगळ्या फ्लेवरचे नूडल्स खातात. मात्र हे नूडल्स एकतर मैद्यापासून तयार झालेले असतात आणि त्यामध्ये इतरही हानिकारक घटक असल्याने ते आरोग्यासाठी म्हणावे तितके फायदेशीर नसतात. त्यामुळे नूडल्स खाणे टाळलेले केव्हाही चांगले. 

*पाहूयात नूडल्स खाणे का धोक्याचे असते याविषयी (How Bad are Instant Noodles to Your Health).....*

*१. सोडीयमचे जास्त प्रमाण...*
नूडल्समध्ये सोडीयमचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. रक्तदाब वाढला की त्याचा हृदय आणि इतर अवयवांवर परीणाम होतो आणि परीणामी शरीराचे कार्य बिघडते. 

*२. प्रिझर्व्हेटीव्हचे प्रमाण जास्त...*
फळं, भाज्या, दूध, डाळी, धान्य यांसारख्या नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश असायला हवा असे वारंवार सांगण्यात येते. पॅकेट फूड म्हणजेच प्रिझर्वेटीव्ह असणारे पदार्थ शक्य तितके टाळायला हवेत असे सांगितले जात असताना आपण आहारात जास्तीत जास्त पॅकेट फूडचा समावेश करतो. मॅगी किंवा नूडल्स दिर्घ काळ टिकावेत यासाठी त्यामध्येही प्रिझर्वेटीव्ह जास्त प्रमाणात घालण्यात येतात. ते आरोग्यासाठी चांगले नसल्याने शक्यतो टाळायला हवेत.

*३. अनावश्यक फॅटचे प्रमाण जास्त...*
आपल्याला अन्नातून चांगले फॅटस आणि वाईट फॅटस असे २ प्रकारेच फॅटस मिळतात. नूडल्समध्ये वाईट प्रकारच्या फॅटसचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. कोलेस्टेरॉल वाढले तर हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो. 

*४. मेटाबॉलिक समस्या...*
नूडल्समुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, वजन वाढणे, रक्तदाब वाढणे अशा समस्या उद्भवतात. या समस्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने शक्यतो आहारात नूडल्ससारखे पदार्थ टाळलेले केव्हाही चांगले. 

*५. पोषक घटकांची कमतरता...*
नूडल्समध्ये शरीराला आवश्यक असणारे विशेष कोणतेच घटक नसतात. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, मात्र यात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स, खनिजे यांचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे हे खाऊन शरीराला काहीच फायदा होत नसल्याने आहारात या घटकांचा समावेश टाळलेला चांगला. यामुळे फक्त पोट भरते बाकी काही नाही.

रविवार, २२ सप्टेंबर, २०२४

ओले खोबरे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

ओले खोबरे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

  ओल्या खोबऱ्यात व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शियम, मिनरल्स भरपूर प्रमाणात असते. गृहिणी स्वयंपाकात 
  खोबऱ्याचा वापर करतात नारळाचे उत्पादन मुख्यतः कोकणामध्ये होते नारळाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. 
  नारळाचं पाणी शरीरासाठी अतिशय पोषक असते 

 ओल्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात जे आपल्या चेहऱ्यासाठी खूप आवश्यक 
 असतात. ज्यांची त्वचा निस्तेज आणि कोरडी आहे त्यांनी नारळाच्या दुधाने चेहऱ्याला मसाज केल्यास चेहरा 
 एकदम टवटवीत दिसतो.

  वजन कमी करण्यासाठी नारळ अतिशय उपयुक्त ठरतो. नारळाचे दूध हे भुकेवर नियंत्रण ठेवते त्यामुळे वजन 
 नियंत्रित राहते. खोबरे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. ओले खोबरे सोबत गुळ देखील खाऊ शकतो अथवा 
 बदामाची पूड खाल्ल्यानेही बराच फायदा होतो. खोबरे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.

 ओल्या खोबऱ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. जर तुमचे पोट साफ होत नसेल तर तुम्ही नित्य खोबरे खा 
 त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल. केस गळत असतील तर त्याचे पाणी केसांना लावू शकता 
  केसांसाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे या पाण्यामुळे तुमचे केस मुलायम 
 देखील होतील.
 

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

कंबर दुखी, पाठदुखि , मानदुखी, खांदेदुखि, स्पाँडिलायसिस, संधीवात, rheumatoid arthritis.**हे सर्व वातविकार प्रकार आहेत.*

*कंबर दुखी, पाठदुखि , मानदुखी, खांदेदुखि, स्पाँडिलायसिस, संधीवात, rheumatoid arthritis.*
*हे सर्व वातविकार प्रकार आहेत.*

*१.स्पाँडिलायसिस हा रोग नाही.*           
*२.ही शरीरातील (काही भागापुरती)* 
*झीज आहे.*
*३.एक प्रकारे वार्धक्य असही आपण म्हणू शकतो.*
*४.पाठीत ऊसण भरणे -* 
*हे स्पाँडिलायसासमुळे होऊ शकत.*
*५.मान तिरपावणे -*                   
*हे स्पाँडिलायसासमुळे होऊ शकत.*
*६. पाठीत ऊसण भरणे, मान तिरपावणे, स्पाँडिलायसीस, या सर्वासाठी पुढे सांगितलेली काळजी घेणे जरुर आहे. -----*

 *सकाळी कोवळ्या उन्हात उभे राहून रोज विटामिन डी नैसर्गिक रित्या  घ्या*

जिरे आणि ओवा चिमूटभर दिवसातून चार ते पाच वेळा खा. तसेच दिवसभरात केव्हाही पाणी गरमच प्या.

मेथी रात्री पाण्यात भिजत टाका.
सकाळी ते पाणी प्या, व भिजवलेली मेथी चावून खा.

मेथीची पाने वाटून पेस्ट करून सांध्यावर लावा अथवा मेथी दाणे पेस्ट करून दुखर्‍या जागेवर लावा.

मेथी  भिजवून मटकी ला मोड आणतात तसे आणा. तेल मीठ न घालता पांढरा कांदा घालून भाजी करा. ज्वारी भाकरी सोबत चपाती नाही फक्त एवढेच दोन तीन वेळा १५ दिवस खाणे दुसरे काही नाही. खाणे.

त्रिफळा चूर्ण व गूळ एकत्र करून रात्री झोपण्याच्या आधी गरम पाण्याबरोबर घ्या

डिंकाचा खडा चघळा
किंवा डिंकाचे लाडु करुन खा.

पारिजातकाची १०-११ पाने वाटून चटणी करा, ती पाण्यात ऊकळवा, थंड करुन प्या.
तीन महिने घ्या --- नंतर २० दिवस सोडून --- परत तीन महिने घ्या. 
अशा प्रकारे करा आराम वाटेल.

रोज एक किंवा दोन महायोगीराज गुग्गुळ गोळी घ्या.    किंवा
महारास्ना काढा घ्या.

१चमचा हळद+१चमचा पीठीसाखर+कणभर खायचा चूना+थोड पाणी घालुन एकजीव करा व तो लेप उसण भरली असेल तीथे लावा. ७ दिवस लावा.

दुखद बाव लेप लावा.

महानारायण तेलाने माॅलीश करणे.

दुखर्‍या भागावर शेक घ्या.
त्यासाठी गरम पाण्याची पीशवी
किंवा   ईलेक्ट्रीकची ऊशी
किंवा   विटेचा तुकडा शेगडीवर गरम करुन फडक्यात गुंडाळून शेकु शकता.
महत्वाचा ऊपाय शेक आहे. औषध फक्त वेदाना कमीकरण्यापूरतीच असतात. एकदा आखडलेला भाग सुटला कि दुखण आपोआपच बर होत असत.

*ही दक्षता घ्या.......*
जरुशिवय पुढे वाकायच नाही, वेळ आलीच तर काठी घ्या.
शक्यतो जड ऊचलायच नाही. कुठेही बसतांना पाठ ताठ राहील याची दक्षता घ्यायची. 
बॅकबेंडींगची आसने योगासन शिकवणार्‍याकडुन शिकून घेवुन करायची.          
झोपायला पातळ गादी व पातळ ऊशी घ्या. कुशिवर झोपतांना दोन ढोपरांमधे जाड ऊशी घ्या.

हाडमोडीवर  अर्जुन सादडा
अर्जुनसादडा - सालीचे चुर्ण + १ग्रॅमतुप +१ग्रॅम राखर घालुन सकाळ संध्याकाळ घ्याव
 *कोणतेही हाडाचे दुखणे व्यायाम केल्याशिवाय कायमचे  बसणार नाही. पेन किलर खाणे योग्य नाही. जास्त त्रास होत असल्यासच पेन किलर  घ्यावी*
            परंतु
 *
🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒💥🍓💥🍓💥🍓💥🍓💥🍓💥🍓💥🍓

दररोज सकाळी अंकुरलेले ‘मूग’ खा, मिळतील हे जबरदस्त फायदे* 🫘 🥗 🫒 🥙

*दररोज सकाळी अंकुरलेले ‘मूग’ खा, मिळतील हे जबरदस्त फायदे*
 🫘 🥗 🫒 🥙

*अंकुरित मुगामध्ये प्रथिने,* *जीवनसत्त्वे तसेच खनिजयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात आहे. जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. अंकुरलेल्या मूगामध्ये डायटरी फायबर्स, व्हिटॅमिन बी -6, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ई, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट्स, फॉलिक असिड , झिंक इ. असतात ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.*
*हे सर्व आपल्याला रोगांविरूद्ध लढण्याची शक्ती देतात. अंकुरलेले मूग खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर आणि प्रथिने मिळतात.चला तर जाणुन घेउयात अंकुरित मूग खाण्याचे अधिक फायदे. अंकुरित मुगामध्ये ग्लूकोजची पातळी कमी असते, म्हणूनच ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे ते सुद्धा अंकुरित मुग खाऊ शकतात.*
*सकाळी थोड्याश्या अंकुरित मुगाचे सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रण राहण्यास मदत होते. अंकुरित मुगाचे सेवन केल्याने चयापचय दर चांगला राहतो आणि शरीराला चांगली ऊर्जा मिळते.*
*आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास अंकुरित मुग खा. त्यात भरपूर फायबर आहे. जे पोटाच्या प्रत्येक समस्येपासून आपले संरक्षण करते. तसेच पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. अंकुरित मुगामध्ये लोहाचे चांगले प्रमाण असते. याच्या सेवनाने हिमग्लोबीनची पातळी सुधारण्यास मदत मिळते.*
*मोड आलेल्या मुगामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेट्री गुण असल्याने संधिवातात (अर्थारायटिस) उपयुक्त ठरतात. आपल्या शरीरात व्हिटॅमिन आणि प्रथिनेची कमतरता असल्यास आपण त्याची कमतरता दूर करण्यासाठी अंकुरित मूग खा.*
*अपचनाचा त्रास होत असेल तर आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये एक वाटी अंकुरलेल्या मुगाचा समावेश करा. मुगामध्ये असलेल्या फायबर मुळे आपली पचन शक्ती सुधारण्यास मदत मिळेल.*
*अंकुरलेल्या मूगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात भरपूर एंजाइम असतात, जे पचन सुलभ करण्यास मदत करतात. आपल्याला हे सेवन करून* *बद्धकोष्ठता येत नाही. तसेच, पोटाशी संबंधित सर्व रोग गायब होतात.*

*अंकुरित मुगामध्ये व्हिटामिन ए असते. याच्या सेवनाने नजर तीक्ष्ण होते. अंकुरलेल्या मूगामध्ये असलेले गुणधर्म मुरुम काढून टाकण्यास मदत करतात. तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.*
*जर आपण वजन कमी करण्याबद्दल विचार करत असाल तर अंकुरलेल्या मूगाचे सेवन सुरू करा. आपल्याला लवकरच एक फरक दिसेल. त्यातील फायबर वजन कमी करण्यास मदत करते.*


शरीरातील रक्त वाढवणे, हिमोग्लोबिन HEMOGLOBIN चे नियंत्रण व अशक्तपणा दुर करणारे काही उपाय.**

*शरीरातील रक्त वाढवणे, हिमोग्लोबिन HEMOGLOBIN चे नियंत्रण व अशक्तपणा दुर करणारे काही उपाय.**

१एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून त्यात एक चमचा मध घालून प्या.  हा उपाय दररोज केल्यास, रक्त लवकर वाढते.

 २. अशक्तपणाच्या त्रासात पालक औषधासारखे कार्य करते.  पालक अ, क, बी 9, लोह, फायबर आणि कॅल्शियम जीवनसत्त्वे भरपूर असतात.
 पालक एकाच वेळी वीस टक्के पर्यंत लोह वाढवू शकतो.  पालक भाजीपाला आणि सूप म्हणून वापरला जाऊ शकतो.

 ३ रक्त वाढवण्यासाठी टोमॅटो खूप उपयुक्त आहे.  दररोज एक ग्लास टोमॅटोचा रस प्याल्याने  रक्त लवकर बनते. याशिवाय आपण सफरचंद आणि टोमॅटोचा रस मिसळून  ही टोमॅटो सूप पिऊ शकता.

 ४ मक्याचे दाणे शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यासाठी देखील फायदेशीर आहे.  ते पौष्टिक आहेत आणि उकडून खाऊ शकतात.

 ५ एका ग्लास बीट  रसात थोडे मध मिसळून ते पिण्यामुळे शरीरात लोहाचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते ज्यामुळे शरीरात रक्त तयार होते.

६सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे.  अशक्तपणाच्या रूग्णासाठी फायदेशीर ठरते.  आपण सोयाबीनचे उकळवून ते खाऊ शकता.

७डाळिंबाच्या रसामध्ये थोडासे सैंधव आणि थोडीशी मिरपूड मिसळून दररोज ते प्यायल्यास शरीरातील लोहाची कमतरता कमी होण्यास मदत होते.

८गुळा सोबत शेंगदाणा  खाल्ल्याने शरीरात लोह वाढते.

 ९हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, लसूणमध्ये थोडे सैधव मिसळा आणि चटणी बनवा. रोज खाल्यास हिमोग्लोबिनवर वाढण्यास मदत होते.

 १०. शरीरात रक्ताचा अभाव पूर्ण करण्यासाठी दूध आणि खजूर हा देखील एक चांगला उपाय आहे.  हा उपाय करण्यासाठी, दुधामध्ये खजूर घाला आणि निजायची वेळ आधी दूध प्या.  दूध प्यायल्यानंतर खजूरही खा.

*अशक्तपणाचा आयुर्वेदिक उपचार: अशक्तपणाचा आयुर्वेदिक उपचार ...*

 ११. रक्त वाढविण्यासाठी गुळवेलीचा रस सर्वोत्तम आहे.

  १२आवळा आणि जांभूळ रस समान प्रमाणात मिसळल्यास शरीरात हिमोग्लोबिनची पातळीही वाढते.

 १३ शिंगाडा  खाण्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते आणि शरीराला सामर्थ्य मिळते.

 १४आंब्याच्या रस दुधा बरोबर सेवन केल्यास शरीरात हिमोग्लोबिनही वाढते.

१५ दोन चमचे तीळ पाण्यात भिजवा आणि दोन ते तीन तासांनंतर त्यांना पाण्यातून उपसून घ्या आणि बारीक करून पेस्ट बनवा.आता एक चमचा मध मिसळा आणि दिवसातून दोनदा खा.  या मुळे शरीरात रक्ताची वाढ झपाट्याने होऊ लागते.

 शरीरात रक्ताची कमतरता भागवण्यासाठी बरेच डॉक्टर लोह आणि व्हिटॅमिन गोळ्या किंवा कोणतेही परिशिष्ट घेण्याची शिफारस करतात.
 औषध घेण्याव्यतिरिक्त, आपण आहारात काही निरोगी अन्न जोडून नैसर्गिक मार्गाने रक्त वाढवू शकतो.

 *हीमोग्लोबिन बूस्टिंग फूडः हेमोग्लोबिन बूस्टिंग फूड ...*

 १. आपल्या आहारात मोहरी, पालक, कोथिंबीर आणि पुदीनाची पाने घाला.

 २. फळांमध्ये सफरचंद, पपई, चिकू, लिंबू आणि पेरू खा.

 ३ पिस्ता आणि अक्रोड यासारखी ड्रायफ्रूट खाल्ल्याने रक्तातील लोहाचे प्रमाणही वाढते.

 ४आपल्या आहारात कोरडी द्राक्षे, मनुके, धान्ये, गाजर आणि डाळीचे सेवन करा.  दररोज ते खाल्ल्याने शरीरात रक्त वाढते.

 ५मुग, हरभरा, मठ आणि गहू मोड आलेले एकत्रित करून त्यात लिंबू व मध मिसळून सकाळी  दोन अडीच मुठ खा.  सकाळी रिकाम्या पोटी ते खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषकद्रव्ये मिळतात, जे अशक्तपणावर उपचार करण्यास मदत करते.

*शरीरामध्ये रक्त HEMOGLOBIN वाढवण्यासाठी काय करावे?* 

बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खुप कमी होते
अशावेळी

👉 मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम.
👉 आहारात सिझनल फळांचा  समावेश करा.
👉 गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे,
👉🏻 राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे.
 👉 सफरचंद व बीट खावे, डाळिंब खाणे, हळद-रक्त वाढीसाठी गुणकारी आहे
👉 सुकामेवा शेंगदाणे खावे, 
अंजीर भिजवून खाणे, मक्याचे कणीस खाणे, दूध आणि खजूर, सोयाबीन खावे, पालक अंबाडी चुका तसेच इतर पालेभाज्या बदलून बदलून फळभाज्याचा समावेश आपल्या आहारामध्ये ठेवावा, नियमित खाव्यात.

निरोगी आयुष्यासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे आपण याआधी पाहिले आहे.

निरोगी आयुष्यासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे आपण याआधी पाहिले आहे.

आज आपण पाणी पिण्याच्या योग्य वेळा कोणत्या व त्याने काय फायदे होतात ते पाहू.

१. *सकाळी उठल्या उठल्या लगेच: १-२ ग्लास पाणी प्यावे*
याने आपला मेंदू आणि शरीर स्लिप मोड मधुन ग्रीड मोड मध्ये येतात. आपले अंतर्गत अवयव शुद्ध आणि स्वच्छ होतात. आतड्यांवर दबाव येऊन पोट साफ व्हायला मदत होते.

२. *जेवणाआधी ३० मिनिटे: १ ग्लास पाणी*.
यांनी आपली पचनक्रिया सुधारते आणि कॅलरी इंटेक कंट्रोल मध्ये राहतो.

३. *व्यायामाच्या आधी व नंतर १-१ ग्लास पाणी पिणे*.
व्यायामाच्या आधी प्यालेले पाणी आपल्या शरीराला व्यायामासाठी वॉर्मअप सारखे तयार करते.

व्यायामानंतर प्यालेले पाणी आपल्याला डीहायड्रेशन पासून वाचवते.

हेवी व्यायाम केल्यावर किंवा गर्म्याच्या दिवसात जास्त पाणी प्यावे.

४. *आंघोळीच्या आधी: १ ग्लास पाणी*.
कोमट पाणी प्याल्याने आपल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि आपले ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होते.

५. *झोपायच्या आधी: १ ग्लास पाणी प्यावे*.
झोपण्याआधी जर आपण हायड्रेटेड असलो तर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस कमी होतात. कारण घट्ट रक्त हार्ट अटॅकचे मुख्य कारण आहे.

६. *जेव्हा तुम्ही खूप थकलेले असाल: १ ग्लास पाणी*.
पाणी आपल्या मेंदूला पावर अप करते. Noggin's Fluids ची पातळी वाढते आणि आपल्या cognitive functions मध्ये सुधारणा होते.

जेव्हा तुम्हाला एखादे प्रेसेंटेशन द्यायचे असेल त्याआधी १ ग्लास पाणी प्या.

जेव्हा झोप येत असेल आणि झोपणे शक्य नसेल तेव्हा पण एक ग्लास पाणी प्या.

निसर्ग उपचार तज्ञ


गुडघेदुखीवर शेवगा शेंगाचे सूप*

*गुडघेदुखीवर शेवगा शेंगाचे सूप*

गुडघेदुखीचे अनेक प्रकार आहेत. सर्वांना वेगवेगळे इलाज आहेत. पण त्यातल्या त्यात अशक्तपणा व रज्जू क्षयाने येणारी गुडघेदुखी हि सामान्य आजार आहे. ती थांबवण्यासाठी बिन खर्चिक उपाय आहे. रसायन मिश्रित औषधे फार तर या आजारावर वेदनाशमणाचेच काम करतात.परंतु कायम स्वरूपी  गुडघे दुखी घालवायची असेल तर दररोज सकाळी शेवग्याच्या दोन शेंगांचे सूप एक आठवडा भर घ्यावे. कोणतीही गुडघेदुखी कंबर दुखी हात पाय संधिवात " हाडे दुखणे   त्यासाठी कॅल्शियमचे भरपूर प्रमाणात सेवन करणे हाच उत्तम उपाय.

*सूप करण्याची पद्धत*

शेवग्याचा दोन शेंगा कापून घ्या 
दोन ग्लास पाण्यात
दोन लसणाच्या पाकळ्या, किंचित गुळ, अर्धी हिरवी मिरची उकडून घ्याव्यात शेंगा पूर्ण उकडल्यानंतर त्यांचा गर देखील कुस्करून घ्या त्यात चवी पुरते काळे मीठ टाका. हे सारे मिश्रण स्वच्छ वस्त्राने गाळून घ्या. नंतर परत त्या पाण्याला एक उकळी येवू द्या. साधारण एक ग्लास सूप होईल इतके आटवा. चवी साठी वर कोथिंबीर टाकायची असल्यास टाका. आणि गरमागरम असतानाच हे सूप घ्या. नैसर्गिक रित्या कॅल्शियम मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मोरिंगा. मोरिंगा म्हणजेच शेवगा हप्त्यातून दोन वेळा भाजी खाल्ली तरी चालेल.

काकडी*

*काकडी*
🥒🥒🥒🥒🥒
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून दिले जाते आणि यामध्ये असलेले सॉल्युबल फायबर्स पोट साफ करतात. यामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो तसेच अन्नपचन व्हायला खूप मदत मिळते. 
🥒🥒🥒🥒🥒🥒
यासोबतच यामध्ये इरेप्सिन नावाचे अ‍ॅन्झाइम असते जे पोटासाठी खूप चांगले असते. हे खाल्ल्यामुळे अल्सर, बद्धकोष्ठ, अपचन यासारखे पोटाशी संबंधित आजार होत नाहीत.
🥒🥒🥒🥒🥒🥒🥒
काकडीमध्ये पाण्यासह फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि पोटॅशिअम सारखी पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असता.
🥒🥒🥒🥒🥒🥒
याशिवाय काकडीमध्ये व्हिटॅमिन – बी, ए आणि ॲंटी-ऑक्सीडेंट्सही मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला अनेक लाभ मिळू शकतात. फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या समस्यांपासून ॲंटी-ऑक्सीडेंट्स शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.
🥒🥒🥒🥒🥒🥒


बाभळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे.....*

*बाभळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे.....*

आयुर्वेदात अशा अनेक वनौषधी आणि वनस्पती आहे, ज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे यातिल बाभळीच्या शेंगांना फार मौल्यवान मानले जाते. खुपच गुणकारी आहे तर बघू या फायदे...

  *(१)गुडघेदुखी कमी होते...*
बाभळीच्या शेंगांचे चूर्ण उपयुक्त आहे. व्रुध्दापकाळात सांधेदुखी, ही सामान्य समस्या आहे आणि गुडघेदुखी तर चाळीशीनंतर चालू होते. तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे हे चूर्ण कोणत्याही आयुर्वेद शाॅपला नक्कीच मिळेल, याने काही दिवसांतच गुडघेदुखीला आराम मिळेल..

*(२)डोकेदुखी दूर होते.*.* वाढता ताण-तणाव, चिंता, धावपळ, यामुळे. सतत डोकेदुखी असणं ही समस्या घरोघरी आढळून येते, अशा वेळी बाभुळ शेंगाचि पावडर कोमट पाण्याबरोबर घ्यावी, लगेच आराम मिळतो..

*(३) स्त्रियांसाठी शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे...*
आजकाल बहुतेक महिलांना ल्यूकोरिया चा त्रास होतो, श्वेतप्रदर, पांढरे पाणी जाणे, अशा समस्या बहुतेक महिलांना होतात. तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने आराम मिळतो नक्कीच.

*(४) पुरुषांसाठी या शेंगांचे चूर्ण फायदेशीर ठरते...*
बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पुरुषांना देखील फायदेशीर आहे. ज्यांना धातूक्षयाचा त्रास असेल. त्यांनी हि पावडर. नियमितपणे कोमट पाण्याबरोबर घेतल्यास फायदा होतो. वंध्यत्व दूर होते.

*(५) पाठदुखी कंबरदुखी...* या त्रासात आराम देण्यासाठी बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे. एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यामुळे पाठदुखी कंबरदुखी चा त्रास होतो, आजकाल बहुतेक लोक बसून काम करतात त्यामुळे पाठदुखी देखिल सामान्य समस्या आहे, तेव्हा हि पावडर उपयुक्त ठरते, जेवणानंतर एक चमचा भरून चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने छान आराम मिळतो नक्कीच. जमल्यास हि पावडर दूधासोबत घेतल्यास स्नायू बळकट होतात.

*(6) जूलाबाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे...*
बरेच वेळा, बाहेरच्या खाण्यामुळे, पोट खराब होऊन पातळ जुलाब होतात, अतिसार होतो, गळल्यासारखे होते, यांच्यावर शेंगांचे चूर्ण हे रामबाण औषध आहे, थोडं चूर्ण पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो.

*(७) अशक्तपणा, कमजोरी वाटणे, यावर जर तुम्ही शारिरीक दृष्ट्या अशक्त असाल तर तुम्ही बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पाण्यात किंवा दुधात मिसळून रोज एक वेळा सेवन करू शकता आणि वाटलं तर मधात मिसळून चाटण म्हणून घ्या. 

.तेव्हा वरील फायदे बघता बाभळीच्या शेंगांचे चूर्ण अतिशय मौल्यवान औषध आहे आणि सहज आयुर्वेद दुकानात मिळतं. जरुर हि पावडर घरात असू द्यावी.


उजव्या बाजूला पोटात दुखणे याची कारणे*

*उजव्या बाजूला पोटात दुखणे याची कारणे* 

काहीवेळा आपल्या पोटात उजव्या बाजूला वेदना होऊ लागतात. या पोटदुखीची वेगवेगळी कारणे असू शकतात. कारण आपल्या पोटात उजव्या बाजूस यकृत, पित्ताशय, आतड्याचा उजवीकडील भाग, अपेंडिक्स, उजव्या बाजूची किडनी तसेच स्त्रियांमध्ये right ovary असे अवयव असतात, त्यामुळे विविध कारणांमुळे उजव्या बाजूला पोटदुखी होऊ शकते. पोटात उजव्या बाजूला दुखणे याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.

*पचनासंबधित गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता (Constipation) :*
◼️गॅस्ट्रोएन्टेरिटिस, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS), IBD, अन्न विषबाधा अशा कारणांनी उजव्या बाजूस पोटात दुखू लागते.
◼️अपेंडिक्सला सूज आल्याने पोटात उजवीकडे दुखते.
◼️उजव्या किडनीत स्टोन किंवा इन्फेक्शन झाल्याने पोटात उजव्या बाजूला दुखते.
◼️हर्नियामुळे सुध्दा काहीवेळा उजव्या बाजूला पोटदुखी होते.
◼️यकृताला सूज येणे, यकृताचे आजार तसेच पित्ताशयातील खडे यामुळेही उजव्या बाजूला पोटात दुखू लागते.
◼️स्त्रियांमध्ये मासिक वेळी, तसेच गरोदरपणात Ectopic pregnancy मुळे उजव्या बाजूला पोटात दुखू शकते.

*कधी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे ? :*
खालील लक्षणे जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता, तातडीने आपल्या डॉक्टरांकडे जावे.
◼️पोटात उजव्या बाजूला अतिशय वेदना होणे,
◼️छातीत दुखणे,
◼️ताप येणे,
◼️शौचावाटे रक्त पडणे,
◼️लघवीतून रक्त पडणे,
◼️उलट्या होणे,
◼️उलटीतून रक्त पडणे,
◼️ त्वचा पिवळसर होणे,
◼️पोटावर सूज येणे
अशी लक्षणे दिसून आल्यास तातडीने आपल्या डॉक्टरांकडे जावे.

*पोटात उजव्या बाजूला दुखणे यावर घरगुती उपाय :*
◼️अर्धा कप पाण्यात लिंबू रस व काळे मीठ घालून ते मिश्रण प्यावे.
◼️गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे उजव्या बाजूला पोटात दुखणे थांबते.
◼️आल्याचे तुकडे पाण्यात घालून ते पाणी उकळावे. मिश्रण कोमट झाल्यावर ते पाणी अर्धा कप प्यावे.
◼️चहामध्ये आले टाकून काळा चहा प्यावा.
◼️डाळिंबाच्या दाण्यात थोडे काळे मीठ मिसळून ते दाणे खाल्याने उजव्या बाजूला पोटात दुखणे थांबते.
◼️पोटावर गरम शेक घ्यावा.
◼️हे घरगुती उपाय खानपान संबंधित गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता अशा कारणांमुळे पोटात उजव्या बाजूला दुखत असल्यास उपयोगी पडतात. मात्र जर इतर गंभीर कारणामुळे पोटात उजवीकडे दुखत असल्यास त्यावर घरगुती उपाय करीत वेळ वाया घालवू नये. अशावेळी तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.
✍️गजानन गोपेवाड

सतत झोप आल्या सारख वाटणे, काम करण्याची

*सतत झोप आल्या सारख वाटणे, काम करण्याची इच्छा नसणे, दिवसभर जांभळ्या येणे, अशक्त पणा वाटणे अश्या समस्यांना त्रासलेले आहेत तर ही पोस्ट तुमच्या साठी…* 

*झोप पूर्ण न होणे* 
                       आपल्या शरीराला किमान 7 ते 8 तास शांत झोपेची आवश्यकता असते. रात्री झोपताना मोबाईल, टॅबचा वापर केल्यानं लवकर झोप लागत नाही. काही वेळा झोपेत मध्येच आपण दचकून उठतो. भीतीनं किंवा टेन्शनमुळेही झोप पूर्ण होत नाही. मेंदू थकल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.

 *प्रमाणापेक्षा जास्त खाणे*
                          आपण आपला आहार हा थोडी भूक राखून घेतला पाहिजे म्हणजे आपण खाल्लेले अन्न व्यवस्तीत पचेल सुरवातीला जेवण कमी झालं असं वाटलं पण नंतर आपणास सवय लागून जाते.

 *पुरेसा व्यायाम न करणे* 
                          आपल्या शरीराला उत्साही आणि आनंदी ठेवण्यासाठी किमान रोज सकाळी 30 मिनिटं वेगवेगळे व्यायाम करणं आवश्यक आहे. व्यायाम केल्यानं रक्ताभिसरण चांगलं होतं. शरीरातील पेशी अधिक चांगल काम करतात तुम्ही दिवसभर उत्साही आणि आनंदी राहता.

 *आहारात प्रथिनांचं प्रमाण कमी* 
                                     तुमच्या आहारात भरपूर फळ, अंड, दूधाचा वापर करायला हवा. प्रथिनांचा वापर करायला हवा. चीज, मासे, दही, योगर्ट शेंगदाण्याचा वापर आहारात करा. फास्ट फूड पचनासाठी जड असतं. ते खाणं टाळा. वेळेवर आहार घ्या.

 *साखरयुक्त पदार्थांचं सेवन टाळा* 
                             साखरेचं प्रमाण अति असणारे गोड पदार्थ तुम्हा वारंवार खात राहिलात तर तुम्हाला आळस येऊ शकतो. त्यामुळे दिवसभर मरगळलेले किंवा थकलेलं वाटू शकतं. साखरेचं प्रमाण कमी असणारे पदार्थ खाण्यावर भर द्या.

 *शरीरात लोहाची कमतरता* 
                            आपल्या शरीरातील हिमोग्लोब्लीन किंवा रक्त कमी झालं तरीही आपण काहीही काम न करता आपल्याला दमल्यासारखं होतं. खूपदा डोकं दुखतं आणि चक्करही येते. त्यामुळे तुमच्या आहारात पालेभाज्या, हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी आवश्यक असणारी फळ, खाद्यपदार्थ खाणं आवश्यक आहे.

 *ताणतणाव* 
                        कामाच्या ठिकाणी किंवा घरातही काही वेळ तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. गाणी ऐकणं, चित्र कारणं, फिरणे काहीही जे तुम्हाला आवडतं ते. ज्यामुळे तुम्हाला आलेला ताण कमी होईल. किंवा कामाच्या टेन्शनपासून काही वेळ स्वत:ला लांब ठेवा त्यामुळे तुमचा मूड फ्रेश होईल आणि अधिक जोमानं काम करू शकाल. रागावर नियंत्रण ठेवा. राग येत असेल तर लक्ष दुसरीकडे ठेवून आनंदी राहण्याचा प्रयत्न  करा 


*लेखन. गजानन गोपेवाड*
🍑🍇🍒🍇🍒🍇🍒🍑🍒🍇🍒🍑🍒🍇🍒🍑🍓🍑🍓🍑🍓🍑🍒🍑🍒🍇🍒🍑🍒

*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*


सोमवार, २९ जुलै, २०२४

आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका.....*

*आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका.....*
आई - बाबा ज्याप्रमाणे मुलांच्या आरोग्याची काळजी घेतात (Parents Health Care). लहानपणी जसं आपलं आरोग्य त्यांनी सांभाळलं. त्याच प्रमाणे वय वाढल्यानंतर मुलांनी आपल्या आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी (Monsoon). आई वडिलांचं वय वाढल्यानंतर त्यांना स्वतःच्या अनेक गोष्टी करायला कमी नाही (Health Tips). खाण्या पिण्याकडेही त्यांचं पुरेसं लक्ष नसतं. ज्यामुळे आरोग्याच्या निगडीत अनेक आजार शरीराभोवती घेरतात. शिवाय तब्येतही वारंवार बिघडते.

लॉन्जेविटी एक्सपर्ट प्रशांत देसाई सांगतात की, 'आपल्या आई - वडिलांवर सतत प्रेम करत रहा , त्यांना घालून पाडून बोलू नका ते होते म्हणून आपण आहोत एवढे लक्षात ठेवा, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यांना ३ गोष्टी कधीही खायला देऊ नका. यामुळे आई वडील वारंवार आजारी पडतील. शिवाय गंभीर आजार शरीराभोवती विळखा घालतील'

*साखरेचा चहा आणि बिस्कीट...*
तज्ज्ञांच्या मते, बऱ्याच लोकांना चहा पिण्याची सवय असते. पण ही सवय घातक ठरू शकतं. एक कप चहामध्ये ३६ ग्रॅम साखर असते. यामुळे त्यांना इन्शुलीन रेझिस्टन्स, लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्याऐवजी खाकरा, शेव मुरमुरा किंवा घरगुती नाश्त्यावर तूप घालून खाऊ शकता. यामुळे आरोग्याला फायदे मिळतील.

*व्हेजिटेबल ऑईल...*
बरेच जण आहारात व्हेजिटेबल ऑईलचा आहारात समावेश करतात. ज्यामुळे मेटाबॉलिक डिसऑर्डरची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे रक्तातील ट्रायग्लिसराईडची पातळी वाढते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याऐवजी त्यांना तूप आणि खोबरेल तेलाचा आहारात सामावेश करा.

*रेस्टॉरंटमधलं अन्न...*
वयस्कर पालकांना शक्यतो रेस्टॉरंटमधून किंवा बाहेरचं खायला देऊ नका. त्यात मीठ, साखर आणि पाम तेलाचा जास्त वापर होतो. त्यात आरोग्यदायी आणि पौष्टीक गोष्टी नसतात. त्याऐवजी घरातील अन्न खायला द्या. तसेच मास मच्छी देणे सुद्धा टाळावे.
 

*३ ते ५ वयोगटातील मुलांना महत्त्वाच्या ६ गोष्टी करता येतात का? कशी शिकणार ही कौशल्यं..

*३ ते ५ वयोगटातील मुलांना महत्त्वाच्या ६ गोष्टी करता येतात का? कशी शिकणार ही कौशल्यं.....*

मुलांना शाळेला सुट्टी लागली की कुठे फिरायला जायचं, कोणत्या समर कॅम्पला जायचं याचं नियोजन सुरू होतं. हे सगळं ठिक असलं तरी पालक म्हणून आपणही मुलांना थोडा वेळ द्यायला हवा. नुसताच वेळ नाही तर त्या वेळात मुलांना काही कौशल्ये जरुर शिकवायला हवीत.  दैनंदिन जीवनात उपयुक्त असणारी ही कौशल्ये तुम्ही मुलांना जेवढ्या लवकर शिकवाल तेवढ्या लवकर तुमच्या मुलांना त्या कौशल्यांची सवय लागेल, मुलं स्वतंत्र व्हायला त्याची निश्चितच मदत होईल. ही कौशल्ये आत्मसात केल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासही मदत होईल. साधारण ३ ते ५ वर्षापर्यंतच्या मुलांना काही किमान कौशल्ये कोणत्या पद्धतीने शिकवू शकता याविषयी...

*१. भाषा आणि संवाद कौशल्य...*
भाषेचं महत्व आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. या वयातील मुलं साधारणपणे खूप चीडचीड करतात, ओरडून बोलतात, किंवा खूप कमी बोलतात अशा प्रकारच्या तक्रारी पालक करताना दिसतात. मग या सुट्टीमध्ये मुलांच्या भाषा कौशल्यावर थोडं जास्त लक्ष द्या. नवीन गोष्टी वाचणं, एखाद्या स्थळाबद्दल माहिती घेणं, चित्र काढून त्याबद्दल बोलणं अशा वेगवेगळ्या पद्धती तुम्ही भाषा कौशल्य वाढवण्यासाठी करू शकता.

*२. स्वत: ची काळजी घेण्याची कौशल्ये...*
साधारण ३ वर्षानंतरची मुलं वेग वेगळ्या पद्धतीने स्वतःची काळजी घेऊ शकतात. कपडे घालणे, आंघोळ करताना साबण लावणे, अंगावर पाणी घेणे, शू-शी स्वत:ची स्वत: करता येणे. स्वतःच्या हाताने जेवण करणे, घरामध्ये लहानसहान कामात मोठ्यांना मदत करणे अशी कामं मुलं करू शकतात.

*३. संज्ञानात्मक कौशल्ये...*  मुलांच्या मेंदूचा विकास होत असताना त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे समस्या सोडवणे. आता, पालकांच्या दृष्टीने मुलांना कसली आलीये समस्या? तर, मुलांना घरामध्ये आणि बाहेर सुद्धा अनेक प्रश्न पडतात, त्या प्रश्नाचे उत्तर शोधणे म्हणजे समस्या सोडवणे. आता एक उदाहरण म्हणजे शाळेमध्ये पहिला दिवस असेल, तर कोणते मित्र असतील? कोणती शिक्षिका असेल? ही ३ ते ५ वर्षांच्या मुलांसाठी समस्या आहे. हळूहळू शाळेमध्ये जाऊन, मुलांच्या बरोबर रोज खेळून त्यांना मित्र बनवून मग ती समस्या सुटते. हेच अभ्यासाच्या बाबतीत, खेळ शिकण्याच्या बाबतीत वगैरे सुद्धा दिसून येत. 

*४. सामाजिक कौशल्य...*
काही वेळेस मुलं एकत्र असतात पण एकत्र खेळू शकत नाहीत. हे होण्यामागे मुख्य कारण म्हणजे सामाजिक खेळ ( ग्रुप प्ले ) कसे खेळायचे हे खूप वेळेस मुलांना माहीत नसतं. शेअरिंग, सूचना देणे आणि ऐकणे, खेळाचे वर्णन करून सांगता येणे वगैरे कौशल्ये वाढण्यासाठी मुलांना इतर मुलांशी खेळायची संधी उपलब्ध करून द्या. याशिवाय रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला पाहणे, रस्त्यावरती न पळणे, सिग्नल पाळणे, खेळताना स्वतःची काळजी घेणे इत्यादी. सामाजिक कौशल्ये पालक शिकवतील तेव्हाच मुलं शिकतील.

*५. शारीरिक कौशल्ये...* कोणतेही कार्य करण्यासाठी मुलांची शारीरिक कौशल्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात. साधारण ४ वर्षापर्यंत मुलांमध्ये डोळे आणि हात यांचा समन्वय, दोन्ही हाताचे समन्वय, मेंदू आणि शरीर यातील समन्वय असणं गरजेचं आहे. पोहायला जाणे, सायकल चालवणे, नाच करणे, एखादा खेळ शिकणे  अशा प्रकारच्या गोष्टी मुलांसोबत केल्याने त्यांची शारीरिक कौशल्ये विकसित व्हायला मदत होते. 

*६. भावनिक कौशल्य...* मुलांच्या भावना या वयानुसार आणि स्वभावानुसार बदलत असतात. त्यांना आजूबाजूच्या गोष्टीचा जसा अनुभव येत जातो त्याप्रमाणे मुलं भावना व्यक्त करतात. काही वेळेस तीव्र तर काही वेळेस सौम्य भावना व्यक्त करताना दिसतात. एखादी गोष्ट खरी आहे की खोटी हे सुद्धा मुलांना या वयामध्ये समजतं. म्हणजे एखादं कार्टून कॅरॅक्टर हे प्रत्यक्षात नसतं त्यामुळे आपल्याला कितिही त्याप्रमाणे वागावंस वाटलं तरी सत्यात मला तसं वागत येणार नाही. 

*©संकलन*
*गजानन गोपेवाड*

गुरुवार, २५ जुलै, २०२४

मूळव्याधी (पाईल्स)वर सुटकारा मिळवण्यासाठी घरगुती उपाय.*

*मूळव्याधी (पाईल्स)वर सुटकारा मिळवण्यासाठी घरगुती उपाय.*

*एका अध्ययनात किमान 50 टक्के लोकांना 50 वर्षाच्या वयापर्यंत पाईल्स होण्याची शक्यता असते. ही एक सामान्य आजार आहे ज्याचा संक्रमण पसरत नाही. पाईल्सवर उपचार असतो पण लोकांना डॉक्टरकडे जाण्यास थोडी शरम वाटते.*

*हा आजारपण वाढल्याने त्यातून रक्त येऊ लागत आणि फार दुखू लागत ज्यामुळे बसायला त्रास होतो. यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार सांगत आहोत, ते केल्याने नक्कीच आराम मिळेल.*

*1. कोमट पाण्याने स्नान : दिवसातून तीन वेळा गरम पाण्याने स्नान करावी किंवा पाण्यात थोड्यावेळासाठी बसावे. त्या जागेवरची त्वचा ठीक होईल आणि जळजळ देखील कमी होण्यास मदत मिळेल.*

*2. संतुलित आहार घ्या : पाईल्स बरे करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला संतुलित आहार घेणे सुरू केले पाहिजे. ज्यामुळे कब्‍ज व पोटदुखी इत्यादीची समस्या दूर होते. जेवणात हिरव्या भाज्या, पाले भाज्या, ब्राउन राईस, दूध, सुजी इत्यादीचे सेवन करा.*

*3. बर्फाचा शेक द्या : ज्या भागात जळजळ होत असेल, तेथे बर्फाचा तुकडा ठेवा, याने आराम मिळेल व सूज कमी होण्यास मदत मिळेल.*

*4. एलोवेरा: पाईल्स झाल्यावर एलोवेरेला कापून आतला गर त्या जागेवर लावल्याने फायदा होतो. याचे जेल, जळजळ शांत करतो आणि सूज देखील कमी करण्यास मदत करतो.*

*5. लिंबाचा रस : तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल, पण पाईल्स झाल्यावर लिंबाचा रस त्या जागेवर लावल्याने फार फायदा होतो. सुरुवातीत जळजळ होते पण थोड्यावेळाने आराम मिळतो.*

*6. जैतूनाचे तेल : जैतूनाचे तेल फारच उपयोगी असत. यात एंटीऑक्‍सीडेंट असत जे त्वचेची जळजळ शांत करत. पाईल्स झाल्यावर कॉटन बॉलमध्ये तेल घेऊन प्रभावित जागेवर लावायला पाहिजे. याने आराम मिळेल.*
 
*7. इतर प्राकृतिक उपाय: बर्‍याच वेळेपर्यंत ऐकाच मुद्रेत बसून राहणे टाळावे. व्यायाम करावा आणि रक्त आल्यावर लगेचच *डॉक्टरांना सल्ला* *घ्यावा.* 
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

*चिंचेच्या झाडाखाली झोपणे वैज्ञानिकदृष्ट्या निषिद्ध का मानले जाते?

*चिंचेच्या झाडाखाली झोपणे वैज्ञानिकदृष्ट्या निषिद्ध का मानले जाते?*

चिंच.. म्हटली की जिभेवर रेंगाळते ती म्हणजे आंबट गोड चव. पाणीपुरी, शेवपुरी .. चिंचेची आंबट-गोड आमटी.. असे एक ना अनेक भारतीय पदार्थ चिंचेच्या वापराशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. अगदी प्राचीन काळापासून भारतीय खाद्य संस्कृतीत चिंच हा अविभाज्य भाग आहे. चिंच हे भारतीय उपखंडातील सर्वात महत्त्वाच्या बहुउद्देशीय उष्णकटिबंधीय फळझाड प्रजातींपैकी एक आहे. चिंच हा बहुवर्षायू वृक्ष असून या झाडाचे मूळ ॲबिसिनियात आणि मध्य आफ्रिकेत असल्याचे अभ्यासक मान्य करतात. आज चिंच हे झाड उष्ण कटिबंधात सर्वत्र आढळते. भारतात विशेषेकरून कोकण व उत्तर कारवार येथील जंगलात चिंच मोठ्या प्रमाणात दिसते. चिंचेच्या झाडाचे मूळ आज आफ्रिकेतील असले तरी चिंचेचे फळ मोठ्या प्रमाणात प्रथम भारतात उत्पादित केले जात होते असे मानले जाते. 

उर्वरित भारतात हे झाड जगते परंतु कोकण आणि कारवार प्रमाणे चिंचेच्या फळाची गुणवत्ता तिथे मिळत नाही.. यामागील मुख्य कारण भारत आणि आफ्रिका सोळाशे लक्ष वर्षांपूर्वी एक भूभाग असल्याने हे साम्य आढळत असावे, असे अभ्यासक मानतात. किंबहुना काही अभ्यासकांच्या मते चिंचेचे बी हे समुद्रमार्गे कोकण आणि कारवार यांच्या किनाऱ्यावर रुजले गेले, आणि त्यानंतर ते उर्वरित भारतात पसरले. असे असले तरी उर्वरित जगाला चिंचेची ओळख झाली ती केवळ भारतामुळे. चिंचेला इंग्रजीत टॅमरिंड असे म्हणतात. चिंचेचे शास्त्रीय नाव ‘टॅमॅरिंडस इंडिकस’ आहे. हा शब्द मूलतः पर्शियन शब्दावरून आला आहे. पर्शियन भाषेत चिंचेला “तमार-इ-हिंद” असे म्हणतात. याचा अर्थ ‘हिंदचे खजूर’ असा आहे. संस्कृत मध्ये चिंचेला “अम्लिका” असे म्हटले जाते. तर संस्कृत ग्रंथांमध्ये चिंचेच्या वृक्षाला ‘तिन्त्रिणी वृक्ष’ असे संबोधले गेले आहे . चिंचेची पाने, बिया आणि साल अनेक आरोग्यविषयक आजार बरे करण्यासाठी उपयुक्त आहेत.

चिंचेशी संलग्न आख्यायिका
पौराणिक कथांमध्ये चिंचेच्या झाडाची सावली कृष्णासारखी पवित्र असल्याचे म्हटले आहे. राधेपासून विभक्त झालेला श्रीकृष्ण चिंचेच्या झाडाखाली बसला होता, अशी आख्यायिका आहे. चिंचेची पाने रात्रीची दुमडतात, यासंदर्भातील आख्यायिका शिव आणि भस्मासूर यांच्यातील संघर्षाशी सलंग्न आहे. शिव आणि भस्मासूर यांच्यातील युद्धाच्या दरम्यान जखमी भस्मासूर चिंचेच्या झाडावर लपला होता. शिवाने आपल्या अंतःचक्षूने भस्मासुराचा शोध घेतला त्यावेळेस भस्मासूर दिसावा म्हणून चिंचेच्या झाडाने आपली पाने दुमडून घेतली. अशा अनेक आख्यायिका चिंचेच्या झाडाशी संबंधित आहे. या पौराणिक आख्यायिका असल्या तरी एक दंतकथा विशेष करून चिंचेच्या झाडासंदर्भात प्रसिद्ध आहे, ती म्हणजे या झाडावर भूत, चेटकीण या सारख्या अमानवी शक्तींचा वास असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस या झाडाखाली झोपू नये किंबहुना जाऊही नये असे सांगितले जाते, असे केल्यास भूतबाधा होते असा समज आहे. परंतु अशा स्वरूपाची कथा, आख्यायिका का प्रसिद्ध झाली यामागे वैज्ञानिक कारण असल्याचे तज्ज्ञ मानतात. रात्रीच्या वेळी चिंचेच्या झाडाखाली का झोपू नये, यामागील शास्त्रीय कारण समजून घेणे नक्कीच महत्त्वाचे ठरणारे आहे.

चिंच इतर वनस्पतींना मारणारी वनस्पती
चिंच हे एक Allelopathic झाड आहे. अ‍ॅलेलोपॅथी हा शब्द ग्रीक शब्द अ‍ॅलेलॉन आणि पॅथी या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. अ‍ॅलेलॉन म्हणजे दुसऱ्यावर किंवा परस्पर आणि पॅथी म्हणजे सफरींग-वेदना. ज्या वनस्पतीमुळे दुसऱ्या वनस्पतींवर घातक परिणाम होतो त्यांना अ‍ॅलेलोपॅथी ही संज्ञा वापरण्यात येते. अ‍ॅलेलोपॅथी वनस्पती दुसऱ्या वनस्पतींवर घातक रसायनं सोडतात. ही रसायनं वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागांद्वारे सोडली जाऊ शकते किंवा नैसर्गिक विघटनाद्वारे सोडली जाऊ शकतात. अ‍ॅलेलोपॅथी या शब्दाचे श्रेय ऑस्ट्रियन प्राध्यापक ‘हॅन्स मोलिश’ यांना दिले जाते, त्यांनी १९३७ साली “द इफेक्ट ऑफ प्लांट्स ऑन इच अदर” या पुस्तकात हा शब्द सर्वात आधी वापरला. असे असले तरी या वनस्पतींच्या या गुणधर्माविषयी प्राचीन काळापासून मानवाला प्रचिती असल्याचे नोंदविले गेले आहे. प्राचीन ग्रीक आणि रोमन नोंदींमध्ये या वनस्पतींचा उल्लेख विषारी असा करण्यात आलेला आहे. केवळ चिंचच नाही तर काळया अक्रोडच्या झाडाचाही याच प्रकारात समावेश होतो म्हणूनच प्लिनी द एल्डरने इसवी सनाच्या पहिल्या शतकात काळया अक्रोडाच्या झाडाला विषारी म्हणून नोंदविले आहे.

अ‍ॅलेलोपॅथी म्हणजे काय?
अ‍ॅलेलोपॅथी ही एक जैविक प्रक्रिया आहे ज्यामध्ये एक वनस्पती स्वतःच्या वाढीसाठी शेजारच्या वनस्पतीची वाढ पूर्णपणे थांबवते. अ‍ॅलेलोपॅथी ही एक जगण्याची यंत्रणा आहे. निसर्गात प्रत्येक सजीव हा जगण्याच्या स्पर्धेत असतो. चार्ल्स डार्विन याच्या ‘सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट’ या सिद्धांताप्रमाणे अ‍ॅलेलोपॅथी या गटात मोडणाऱ्या वनस्पती, झाडे स्वतःच्या वाढीसाठी आपल्या सभोवताली असणाऱ्या इतर वनस्पतींची वाढ थांबवितात. या वनस्पती मुख्यत्त्वे आपल्या मुळांद्वारे जमिनीत विषारी रसायनं सोडतात, त्यामुळे त्या झाडाच्या आजूबाजूच्या झाडांची वाढ खुंटीत होवून झाडे मरतात. त्याचमुळे चिंचेच्या आजूबाजूला इतर वनस्पती आढळत नाही. चिंचेप्रमाणे काळं अक्रोड ही अंगणात न लावण्याचा सल्ला दिला जातो. अक्रोडाच्या झाडाचे सर्व भाग हायड्रोजुग्लोन तयार करतात, जे ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर अ‍ॅलेलोटॉक्सिनमध्ये रूपांतरित होते. अक्रोडाच्या झाडांची मुळे, कुजणारी पाने आणि डहाळे हे सर्व आसपासच्या जमिनीत जुग्लोन सोडतात, ज्यामुळे इतर अनेक वनस्पतींच्या वाढीस प्रतिबंध होतो. नुकत्याच झालेल्या प्रयोगशाळा आणि ग्रीनहाऊस या दोन्ही प्रयोगांतून असे दिसून आले की ‘चिंचेच्या झाडाची पाने आणि मुळांमध्ये जैविक दृष्ट्या महत्त्वपूर्ण वाढ नियंत्रक असतात आणि ते अ‍ॅलेलोपॅथीद्वारे झाडाच्या खोडाजवळ तणमुक्त वातावरण तयार करण्यात गुंतलेले असतात (संदर्भ: Parvez, Syeda & Parvez, Mohammad & Fujii, Yoshiharu & Gemma, Hiroshi. (2003). Allelopathic competence of Tamarindus indica L. root involved in plant growth regulation. Plant Growth Regulation. 41. 139-148. 10.1023/A:1027387126878). म्हणूनच चिंचेचे झाड घराच्या आजूबाजूला किंवा अंगणात लावू नये असे सांगितले जाते. याच कारणामुळे चिंचेचे झाड नेहमीच एकांतवासात, एकाकी असते, त्याचमुळे या झाडाशी निगडित अमानवी कथा उत्त्पन्न झाल्या आहे.

*रात्री का झोपू नये या झाडाखाली?*
चिंचेच्या झाडावर भूत किंवा चेटकीण तत्सम वाईट शक्ती असल्याने या झाडाखाली रात्रीचे झोपू नये किंवा शक्यतो जाऊ नये असे म्हटले जाते. सर्वच झाडे रात्रीच्या वेळेस कार्बन डायऑक्साईड सोडत असल्याने रात्रीच्या वेळेस या झाडांखाली न झोपण्याचा सल्ला दिला जातो. या संदर्भात पुरावनस्पती अभ्यासक देवदत्त पोखरकर यांनी नमूद केले की ‘चिंचेच्या झाडापासून माणसाला भूतबाधा वगैरे होत नाही, इतर झाडांच्या तुलनेत चिंचेचे झाड अधिक कार्बन डायऑक्साईड सोडत असल्याने पक्षीही या झाडावर घरटी करत नाहीत, अपवादात्मक परिस्थिती वगळता. पक्षी चिंचेच्या झाडावरील फळे दिवसा खातात, त्या साठी त्या झाडावरही जातात, परंतु रात्रीच्या वेळेस पक्षीही चिंचेच्या झाडाजवळ भटकत नाहीत. दुसरं महत्त्वाचं कारण असं थंडाव्यासाठी साप-नाग -अजगर रात्रीच्या वेळेस चिंचेच्या झाडावर वास्तव्यासाठी जातात. त्यामुळे अज्ञानाने रात्रीच्या वेळेस या झाडाखाली झोपल्यास सर्प-विंचू चावण्याचा धोका असतो. इतर प्राण्यांच्या तुलनेत सापाची श्वसनक्रिया कमी ऑक्सिजन असलेल्या ठिकाणी अधिक प्रभावी असते त्यामुळे चिंचेच्या झाडावर साप रात्रीच्या वेळेस सहज वास्तव्य करू शकतो. बऱ्याच वेळा चिंचेच्या झाडावर घुबडाचा वावर असतो. जे काही मोजके पक्षी सापाला खातात, त्यात घुबडाचा समावेश होतो. त्यामुळे ‘जीवो जीवस्य जीवनम्:’ हे येथे अक्षरश: खरे ठरते. चिंचेचे झाड त्याच्या उपजत अ‍ॅलेलोपॅथी धर्मामुळे एकाकी असते. त्यात अधिक कार्बन डायऑक्साईड सोडणारे झाड, या झाडावर रात्रीच्या वेळेस साप, घुबड यांचा वावर, अक्राळ-विक्राळ फांद्या यासर्वांमुळे या झाडावर भूत असल्याच्या आख्यायिका प्रचलित झाल्या आहेत.

बुधवार, २४ जुलै, २०२४

आयुर्वेद health tips...Every one shud follow*

*आयुर्वेद health tips...Every one shud follow* 

1)तहान लागेल तेव्हाच पाणी प्या.
2)शाबुदाणा,शेंगदाणे,वरी,दही हे सगळे पित्त वाढवणारे पदार्थ खाऊन उपवास करू नयेत... खरा उपवास म्हणजे लंघन..पोटाला विश्रांती देणे..

3)जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात..दुपारी १२ पर्यंत आणि रात्री ८ पर्यंत जेवण करावे.
4)दोन्ही जेवणानंतर शत पावली( Actual १०० steps च अपेक्षित आहेत .व्यायाम नव्हे )घालावी. म्हणजे अन्न पुढे सरकण्यास आणि पचनाला मदत होते.

5)लोणचे,पापड,अति तिखट,तेलकट, खारट अन्न पदार्थ खाऊ नयेत.
6)रात्री च्या वेळी दही खाऊ नये.

7)रोज ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.
8)मधल्या भुकेच्या वेळेत त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारे फळ,राजगिरा लाडू,साळीच्या लाह्या,खजूर हे खावे...फरसाण,बिस्कीट,शेव हे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ आहेत.

9)आपण जिथे राहतो तिथे ज्या स्थानिक भाज्या पिकतात,फळे मिळतात ते खावे..फळे नुसतीच खावीत, दुधात घालून,दह्यात मिक्स करून खाऊ नयेत...फळांची मूळ चव आणि गुणधर्म बदलतात अशाने..

10)जेवणात २ चमचे तुपाचा समावेश जरूर  असावा.तुपाने कोलेस्टेरॉल वाढत नाही..तूप हे दुधावर अनेक संस्कार केल्यानंतर तयार होते त्यामुळे पचनासाठी चांगले असते..
11)संडास,लघवी ,उलटी ,शिंक या वेगांचे धारण कधीही करू नये..लागल्यास लगेच जावे.

12)पाळीच्या दिवसात स्त्रियांनी लोणचे खाल्ले तर रक्त स्त्राव वाढण्याची शक्यता असते कारण लोणच्यात तेल,मीठ,तिखट यांचा जास्त वापर असतो आणि त्यामुळे स्त्री शरीरातील पित्त वाढते पर्यायाने रक्त सुध्दा वाढते..म्हणून लोणचे खाऊ नये.

13)दूध आणि फळं एकत्र करून खाऊ नये..विरुद्ध आहार आहे..त्याचे पचन होत नाही.आणि अनेक आजारांची निर्मिती त्यातून होते.
14)कधीही पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नये..वायू च्या संचरणासाठी पोटात जागा ठेवावी.

15) शिळे अन्न, processed food, preservatives असलेले पदार्थ शक्यतो टाळावेत..जितका आहार ताजा खाल्ला जाईल  तितके शरीराचे पोषण चांगले होईल...आपल्या शरीराचा संपूर्ण डोलारा हा आपण खात असलेल्या आहारावर च अवलंबून असतो..

बुधवार, १० जुलै, २०२४

किडनी खराब होऊ द्यायच्या नसेल तर लगेच खाणं बंद करा 'हे' पदार्थ.....!*

*किडनी खराब होऊ द्यायच्या नसेल तर लगेच खाणं बंद करा 'हे' पदार्थ.....!*

किडनी आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. त्यामुळे किडन्यांची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. पण लोकांच्या काही चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किडनींचं मोठं नुकसान होतं. लोक अशा अनेक गोष्टी रोज खातात ज्यामुळे किडनी खराब होऊ शकतात. आज आम्ही अशाच काही पदार्थांबाबत तुम्हाला सांगणार आहोत.

*मेयोनीज...*
आजकाल सॅंडविच किंवा मोमोज किंवा इतर काही पदार्थांसोबत मेयोनीज खाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण केवळ एक चमचा मेयोनीजमध्ये १०३ कॅलरी असतात. तसेच यात सामान्य सॅच्युरेटेड फॅट अधिक प्रमाणात असतं. फॅट नसलेलं किंवा कमी कॅलरीच्या मेयोनीजची निवड करा. हेही बघा की, त्यात सोडिअम आणि शुगर जास्त नसेल.

*फ्रोझन फूड...*
फ्रोजन फूड आणि मायक्रोवेवमध्ये शिजवलेले पदार्थ खाऊन टाइप २ डायबिटीसचा धोका वाढतो. कारण यात पदार्थांमध्ये फॅट, शुगर किंवा सोडिअम भरपूर प्रमाणात असू शकतं. ताजे आणि पौष्टिक पदार्थ खाणं नेहमी चांगलं असतं. 

*सोडा...*
सोड्यामध्ये शुगरचं प्रमाण फार जास्त असतं. सोबतच यात कोणतंही पोषण नसतं. याने तुमच्या आहारात जास्त कॅलरी जोडल्या जातात. ज्यामुळे तुमचं वजन वाढतं. रिसर्चमधून समोर आलं की, सोड्याचं सेवन ऑस्टियोपोरोसिस, किडनीचे आजार, खराब पचनक्रिया आणि दातांच्या समस्यांना निमंत्रण देतं.

*प्रोसेस़्ड मीट...*
बेकन, सॉसेज, हॉट डॉग आणि बर्गर पॅटीजसारखे प्रोसेस्ड मीट किडनीचं आरोग्य खराब करू शकतात. यात हाय सोडिअम असतं. नेहमीच जास्त सोडिअमचं सेवन केलं तर ब्लड प्रेशरची समस्या वाढू शकते. ज्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो.

*डीप फ्राय पोटॅटो...*
जर तुम्ही फ्रेंच फ्राइजच्या रूपात चिप्ससारखे पॅकेज्ड फूड किंवा फास्ट फूडच्या रूपात बटाट्याचं सेवन करत असाल तर तुमच्या किडनीचं आरोग्य धोक्यात आहे. किडनी खराब होऊ द्यायची नसेल तर डीप-फ्राइड बटाटे खाणं टाळलं पाहिजे. बटाट्यामध्ये पोटॅशिअमचं प्रमाण जास्त असतं. जे कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
 

रविवार, ७ जुलै, २०२४

काही पावलं चालूनच हृदयाची धडधड वाढते? मग वेळीच व्हा सावध.....*

*काही पावलं चालूनच हृदयाची धडधड वाढते? मग वेळीच व्हा सावध.....*

हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चालणं, धावणं किती महत्वाचं आहे. डॉक्टरही नेहमीच धावण्याचा आणि चालण्याचा सल्ला देत असतात. तुम्हीही चालत असाल किंवा रनिंग करत असाल तर तुम्हाला जाणवलं असेल की, रनिंग करताना अचानक हार्ट रेट म्हणजे हृदयाचे ठोके वेगाने होऊ लागतात. काही लोक या गोष्टीला घाबरतात. पण ही एक सामान्य प्रोसेस आहे. मात्र तरीही वॉक करताना किंवा रनिंग करताना हार्ट रेट का वाढतो आणि हार्ट रेट किती असायला हे जाणून घेणार आहोत.

*का वाढते हृदयाची धडधड...?*
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, रनिंग करताना जास्त एनर्जी लागते आणि ही एनर्जी मिळवण्यासाठी मांसपेशींना जास्त एनर्जी आणि ऑक्सिजनची गरज असते. ही गरज पूर्ण करण्याची जबाबदारी हृदयाची असते. हृदय वेगाने रक्त पंप करणं सुरू करतं ज्यामुळे हार्ट रेट वाढतो.

त्याशिवाय धावताना शरीराचं तापमानही वाढतं ज्यामुळे हृदय वेगाने रक्त पंप करून शरीर थंड करण्याचा प्रयत्न करत असतं. धावताना आपल्या शरीरात एड्रेनालाईन आणि कोर्टिसोलसारखे हार्मोन वाढतात. ज्यामुळे हृदयाचे ठोके वेगाने होतात.

*हार्ट रेट कसा मोजतात...?*
हार्ट रेट वाढणं व्यक्तीचं वय, आजूबाजूचं तापमान, फिटनेस लेव्हल आणि वजनावरही अवलंबून असतं. अनेकदा धावताना तणावात असलेल्या लोकांचाही हार्ट रेट वाढतो. हार्ट रेट फार जास्त वाढणंही घातक ठरू शकतं.

*किती हार्ट रेट नॉर्मल, कधी व्हावं सावध...*
सामान्यपणे एका रनिंग करत असलेल्या व्यक्तीचा हार्ट रेट जाणून घेणं खूप सोपं आहे. रनिंग करताना हार्ट रेट ६० ते १०० बीपीएम असतो. तुम्ही हार्ट मॉनिटरचा वापर करूनही हार्ट रेटची माहिती मिळवू शकता. आजकाल स्मार्ट वॉचमध्येही याची सोय असते.

*हृदयाची धडधड वाढणं कशाचा संकेत...*
सामान्यपणे पाहिलं तर ज्यांचं वजन जास्त असतं ते काही पावलं चालले किंवा धावले तर त्यांना दम लागतो. त्याशिवाय जर चालताना किंवा रनिंग करताना काही वेळातच त्यांना श्वास भरून येतो. अशात हा हृदयरोगाचा संकेत असतो. अनेकदा हे हार्ट अटॅकचंही लक्षण मानलं जातं. अशात गरजेचं आहे की, हार्टबीट मॉनिटर करत रहा आणि वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. परंतु रोज एक तास चाला.
 

मंगळवार, २ जुलै, २०२४

लेमन टी पिण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे,*

*लेमन टी पिण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे,*       
                                                                                              *कसा बनवायचा पर्फेक्ट लिंबाचा चहा*

एका स्वच्छ पातेल्यात पाणी घेऊन त्याला उकळी आणा.

रंग येण्यासाठी यात चहापूड घाला. लक्षात ठेवा की चहापूड खूप कमी घालायची आहे.

याला एक उकळी आणून कपात गाऴून घ्या.

या कपात वरून लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. (कोमट असताना)

चव वाढवण्यासाठी आपल्या आवडीनुसार यात आपण मध (कोमट असताना) आणि आलेही घालू शकता.

आपला लिंबाचा चहा तयार आहे.

*लेमन टी पिण्याचे अनेक आरोग्यदाचे फायदे :-*

आपल्याला माहित आहेतच की लिंबाचा चहा चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर असतो. पण कसा? लिंबू शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि मेटाबोलिजम वाढवण्यास मदत करते.

लिंबू हा विटामिन सीचा प्रमुख स्रोत आहे. यामुळे शरीरातील पेशींची वाढ आणि विकास होण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही मदत होते. विटामिन सी लोहाची कमतरता रोखते आणि रक्तदाब व हृदयरोगाचा धोका कमी करते.

लिंबाच्या चहात आले घातल्यास हे पेय सूज रोखण्यासाठी उपयुक्त असते. आले हा मळमळ व अंगदुखीवरचा उत्तम उपाय आहे. याशिवाय वारंवार भूक लागण्याच्या तक्रारीवरही गुणकारी असते. आल्यातील उच्च फायबरमुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि पचनास मदत होते.

लिंबाचा चहा जास्त आरोग्यकारक बनवण्यासाठी यात साखर घालू नका. याऐवजी मध वापरा. यातील नैसर्गिक गोडवा मेटाबोलिजम वाढवतो आणि चरबी कमी करतो.

आपल्या आवडीनुसार यात आपण चहा करताना कार्बनिक लेमनग्रास घालू शकता. यात अँटीऑक्सिडंट गुण असतात आणि हे त्वचा व केसांसाठी चांगले असते. यामुळे मासिक पाळीच्या वेदनांपासूनही आराम मिळतो.

🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒
 

रविवार, ३० जून, २०२४

➖➖➖➖➖➖➖➖➖ *हृदयविकार कोणाला होतो ?*➖➖➖➖➖➖➖➖➖➖🍈🍈🍈🍈🍈🍈🍈

➖➖➖➖➖➖➖➖➖
      *हृदयविकार कोणाला होतो ?*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖🍈🍈🍈🍈🍈🍈🍈

हृदयविकार दोन किंवा तीन प्रकारचे असू शकतात. हृदयाचा ताल बिघडू शकतो. किंवा त्याच्या चार कप्प्यांमध्ये असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या झडपा नादुरुस्त होऊ शकतात. तसं झाल्यास शुद्ध आणि अशुद्ध रक्ताची एकमेकांमध्ये सरमिसळ होऊ शकते. परंतु हृदयाच्या स्रायूला रक्ताचा योग्य तितका पुरवठा न झाल्यामुळं त्याचं आकुंचन व प्रसरण नीट न होणं आणि त्यापायी त्याच्यावर ताण पडणं यालाच हृदयविकार असं सर्वसाधारणरीत्या म्हटलं जातं.
💥💥💥💥💥💥💥💥💥
आपण बराच काळ सतत वेगानं चालत असलो की पाय दुखु लागतात किंवा जड वजन उचलल्यामुळं हात दुखु लागतात. याचं कारण म्हणजे पायांच्या किंवा हाताच्या स्नायूंना काम करण्यासाठी ज्या वेगानं ऑक्सिजनचा वापर करावा लागतो त्या वेगानं त्यांना तो मिळत नाही. 

हृदय हाही एक स्रायूच असल्यामुळे त्यालाही जर योग्य प्रमाणात रक्ताचा पुरवठा झाला नाही तर तोही दुखू लागतो. जस तेल वाहून नेणार्‍या टँकरच्या इंजिनाला त्या टैंकरमधल्या तेलाचा काहीच उपयोग होत नाही तसंच हृदयाच्या आत कितीही रक्त असलं तरी त्याचा वापर त्या स्नायूंना करता येत नाही. त्यासाठी त्याच्यावर एखाद्या मुकुटाप्रमाणे विराजमान झालेल्या रक्तवाहिन्यांकडून त्याला रक्ताचा योग्य तितका पुरवठा व्हावा लागतो. 
🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇
जर काही कारणानं या वाहिन्या चोंदल्या तर त्यांच्या मधून वाहणाऱ्या रक्ताच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मग त्या वाहिन्या हृदयाच्या स्नायूला योग्य तितकं रक्त पुरवू शकत नाहीत. या वाहिन्या चोंदण्याची अनेक कारणं आहेत. ज्यांच्या शरीरात ही कारणं निर्माण होण्याची शक्यता जास्ती आहे अशांना मग हृदयविकार होण्याची शक्यताही वाढीस लागते.

ज्यांना उच्च रक्तदाबाचा विकार जडलेला आहे त्यांना हृदयविकारही जडण्याची शक्यता जास्ती असते. रक्तदाब वाढण्याचीही अनेक कारणं आहेत. अतिधुम्रपान, लठ्ठपणा तसंच शरीराची फारशी हालचाल न करणं यामुळं रक्तदाब वाढीस लागतो. काहींच्या आनुवंशिक गुणधर्मामुळे रक्तदाब वाढलेला असतो. तसंच अतितणावग्रस्त परिस्थितीही रक्तदाब वाढण्यास कारणीभूत होते.
🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓
पण त्याहूनही अधिक घोकादायक आहे ते रक्तातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण. हे वाढलेलं असेल तर मग हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्या कोंडण्याची शक्यताही वाढीस लागते. मांसजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे तसंच संपृक्त म्हणजेच सॅच्युरेटेड चरबी सेवनही याला कारणीभूत असतं. आपल्या जेवणात तळणासाठी सॅच्युरेटेड फैट्स ज्याच्यात कमी प्रमाणात आहेत अशा सूर्यफूल, करडई यासारख्या तेलांचा वापर केल्यास कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाला काही प्रमाणात आळा घालता येतो.
🍒🍒🍒🍒🍒🍒🍒
मधुमेह असणाऱ्या मंडळींनाही हृदयविकार होण्याची शक्यता जास्ती असते. तसंच लठ्ठपणा, मेदवृद्धी हीही हृदयविकाराला पोषक परिस्थिती निर्माण करतात. बॉडी मास इंडेक्स म्हणजेच वजन आणि उंची यांचं गुणोत्तर हे लठ्ठपणा मोजण्याचं एक एकक आहे.

ज्यांचा बॉडी मास इंडेक्स पेक्षा जास्ती आहे अशांना हृदयविकार होण्याची शक्यताही जास्ती असते. अति धूम्रपान किंवा अति मद्यपान हेही हृदयविकाराला कारणीभूत असतात.
 म्हणून सर्वांनी आपल्या आहार विहाराकडे लक्ष ठेवून रोज सकाळी मॉर्निंग वॉल्क करावा 

 *यासाठी तीन महिने रियांश अमृत ज्यूस घ्या आणि निरोगी रहा*

*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातुन*    

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...