*_आजची माहिती_*
*_📕काही लोकांना कोणताच वास कळत नाही, असे का ?📕_*
***************************************
_खरपूस भाकरीचा, खमंग फोडणीचा वास आपली भूक चाळवत असतो. सुगंधी फुलांचा वास मनाला आनंद देऊन जात असतोअशा वासांच्या वेगवेगळ्या छटा आपण अनुभवत असतो गटाराशेजारून जाताना आपण अगोदरच नाक दाबून घेत असतो काही आजारांमध्ये घाण वास येत असल्याची जाणीव सतत होत राहते. पण काही व्यक्तींना सुगंधी-दुर्गंधी असा कोणताच वास कळत नाही. हा एक प्रकारवा आजार आहे. या व्यक्तींना कसलाच वास येत नाही, तर काही जणांची वास येण्याची क्षमता कमी झालेली असते. आपल्या नाकातील काही त्वचा ही वास समजण्यासाठी तयार झालेली असते. या त्वचेमध्ये वास समजण्यासाठी चेतातंतू असतात. कोणत्याही वासाचे कण हवेद्वारे नाकात पोहोचले की, हे चेतातूंतू उद्दीपित होतात. चेतातंतूद्वारे ह्या संवेदनेचे वहन मेंदूमधील वासाच्या केंद्रात केले जाते व वास कळतो._
_नाकातील त्वचा जर जाड झाली असेल, सर्दी झालेली असेल, नाकातील हाड वाढलेले असेल, नाकात पॉलीप (वाढ) असेल ; तर या अडथळ्यामुळे नाकातील वास समजणाऱ्या त्वचेपर्यंत गंध पोहोचू शकत नाही व वास येत नाही. अपघाताने मेंदूमधील वासाच्या केंद्राला वा वास नेणाऱ्या चेतातंतूस इजा झाली, तर वास कळत नाही. याच भागात गळू, गाठ झाल्यास, मेंदूच्या आवरणाचा दाह झाल्यासही वास कळत नाही. सतत द्रोमाइडच्या वाफेमुळेही वास समजत नाहीसे होते. मधुमेह, सिफीलीस यामध्ये चेतातंतूंना सूज आल्यास वास कळत नाही. अशा वास न येणाऱ्या व्यक्तींना त्यामुळे चवीतील सूक्ष्म फरकही समजत नाहीसे होते._
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_संकलन : गजानन गोपेवाड_*
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*
_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा