शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

वाचन करताना किती प्रकाश आवश्यक आहे

 *_आजची माहिती_*


*_📕वाचताना किती उजेड आवश्यक असतो📕_*

****************************************


_अंधारात वाचू नकोस, डोळे खराब होतील" असे तुम्हाला केव्हातरी ऐकावे लागले असेलच. अनूक तमूक नेत्याने लहानपणी रस्त्यावरच्या लाईटच्या उजेडात अभ्यास केला, असेही तुम्ही ऐकले वा वाचले असेल. त्यामुळे वाचण्यासाठी किती उजेड आवश्यक असतो, याविषयी तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल! डोळ्यांवर ताण न येता वाचण्यासाठी चांगला उजेड असणे आवश्यक आहे उजेड योग्यत्या प्रमाणात नसेल, तर डोळ्यांवर ताण पडतो व डोळे खराब होतात. उजेड पुरेसा असावा. तो सगळीकडे सारखा पसरलेला असावा प्रखरता नसावी. उजेड कमी जास्त होणारा नसावा. ट्यूबलाईट लागताना त्या ट्यूबकडे वघणे आपल्याला त्रासदायक वाटते, ते यामुळेच. कृत्रिम स्रोतापासून (जसे बल्व, ट्यूबलाईट इ.) उजेड मिळत असला तरी त्याची गुणवत्ता नैसर्गिक सूर्यप्रकाशासारखी असावी._

     _एखाद्या पृष्ठभागावर पडणाऱ्या उजेडाचे मोजमाप 'लक्स' या एककात करतात. पौर्णिमेच्या चंद्राचा उजेड ०.१ लक्स, तर प्रखर सूर्यप्रकाशाचा उजेड १,००,००० लक्स इतका असतो. आपले डोळे ०.१ ते १,००,००० लक्स इतक्या विस्तृत प्रमाणाच्या उजेडाला प्रतिसाद देऊ शकतात, डोळे सरावाने वा विपरीत परिस्थितीशी जुळवून घेता येण्याच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे कोणत्याही उजेडात आपले काम बजावत राहतात. कोणत्या कामासाठी किती उजेड असावा, हे खालील तक्त्यात दाखवले आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी उजेड जास्त असलेला केव्हाही चांगला, फक्त त्यात प्रखरता नसावी._


*_कामाचे स्वरूप_*


_सर्वसामान्य वाचन - १०० लक्स_


_कार्यालयीन काम - ४०० लक्स_


_घड्याळे तयार करणे -२००० ते ३००० लक्स_


_इतर कारागिरीची कामे - १००० लक्स_


*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...