बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

केळी खाणे आरोग्यदायी-*

*केळी खाणे आरोग्यदायी-* 

1)दिवसाची सुरूवात केळ्याने करा.म्हणजे चहा, काॅफी, तंबाखू, बिडी ऐवजी केळी खा.

2) दिवसभरात त्रास देणारी ॲसिडिटी, डोकेदुखी, अपचन व ब्लोटिंगपासून आपल्याला केळं वाचवतं.

3)केळं हे मुळात 'प्रिबायोटिक' असल्यामुळे आपल्या आतड्याच्या स्वास्थ्याला जपते. दिवाळीच्या दिवसात फराळाचे पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे होणारे त्रास, उदा. अपचन, ॲसिडिटी यांच्यापासून वाचवते. तेव्हा फराळ कराच पण केळं विसरू नका.

4) मधुमेहाने त्रस्त असलेल्यांसाठी केळं हे एक वरदान आहे. मधुमेहींवर नेहमीच सफरचंदांचा मारा केला जातो. जी साखर सफरचंदात आहे तीच केळ्यातही आहे. तिला 'फ्रुक्टोज' म्हणतात. ही फ्रुक्टोज रक्तातील साखर आटोक्यात आणण्यास मदत करते.
American Diabetes Association ने सुध्दा केळ्याला मान्यता दिली आहे.

5) केळ हे पूर्ण अन्न आहे. केळ आपण जेवणाबरोबर किंवा नंतरही खाऊ शकतो.

6)'बंदोबस्त' सारख्या महत्त्वाच्या आणि अतिशय थकवणाऱ्या  कामाच्या दिवसांमध्ये केळं आपल्याला डिहायड्रेशन व पायांत गोळे येण्यापासून वाचवते, जो त्रास आपल्याला जास्त काळ उभे राहिल्याने होतो.

7) केळ्यात असलेला खनिजांचा साठा ( minerals)  ह्रदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करण्यास मदत करतो. त्यामुळे ह्रदयविकाराने ग्रस्त असलेल्यांनी केळं खाल्लच पाहिजे.

8) केळं हे फक्त पोटालाच नाही तर खिशालाही जपणारे आहे. जे सफरचंदाला जमणार नाही.
9) केळी खाल्ल्याने  दिवस भरात होणारा चहाचा अतिरेक कमी होतो.

*काही भेडसावणारे प्रश्न-* 

1) केळ्यांवर केमिकल्सचा मारा असतो, मग कसे खाणार? 
     हे जरी खरे असले तरी आपल्याला केमिकल युक्त केळी ओळखता येतात. ज्याचा रंग खूप पिवळा असतो. म्हणून सेंद्रिय केळीचा वापर करा आपल्या आसपास जी केळी होतात. त्या केळ्यांचे सेवन केल्यास ह्या समस्येवर मात करणे शक्य आहे. उदा. वेलची केळी, राजेळी केळी, हिरव्या सालीची केळी. तेव्हा आपल्या नेहमीच्या फळवाल्याला हिरव्या सालीची केळी आणायला प्रोत्साहित करा.

2) केळ खाल्ल्याने वजन वाढतं ?
         आपल्या शरीराला कॅलरीज म्हणजे  ऊर्जेची गरज सतत असते. ही ऊर्जा जेव्हा आपल्याला आपल्या आसपास पिकत असलेल्या फळांमधून मिळते. तेव्हा ह्या ऊर्जेचा शरीर पूर्णपणे व उत्तमरित्या उपयोग करते. आणि चरबीत रूपांतर होऊ देत नाही. आपल्या आसपास ऋतुमानानुसार मिळणारी फळे- केळं, आंबा, चिकू, पेरू, द्राक्षं, सीताफळ, फणस इ.

3) आपण दिवसभरात किती केळी खाऊ शकतो?
         ह्या प्रश्नाचे खरे उत्तर फक्त आपले पोटच आपल्याला देऊ शकते. दिवसाची सुरुवात तर केळ्याने कराच. पण केळं दिवसभरात कधीही खाता येतात. भूक लागलेली असतांना वेळेच्या अभावी फक्त चहा + बिस्किट खाणं किंवा नुसता चहा पिणं किंवा रिकाम्या पोटी काम करणं या ऐवजी केळं खाल्लं तर डोकेदुखी, ॲसिडिटी, अपचन ह्या समस्यांवर नक्की मात करता येते.

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

इन्स्टंट नूडल्स सतत खाल्ल्याने पचन बिघडते, ५ दुष्परिणाम; आरोग्य धोक्यात का घालता.....?*

*इन्स्टंट नूडल्स सतत खाल्ल्याने पचन बिघडते, ५ दुष्परिणाम; आरोग्य धोक्यात का घालता.....?*

नूडल्स म्हणजे अनेकांच्या अतिशय आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. अगदी २ मिनीटांत होणारे आणि पोटभरीचे असे हे नूडल्स काही जण नियमित खातात. मोठमोठ्या कंपन्याही त्याची आकर्षक पद्धतीने जाहिरात करतात आणि आपले उत्पादन खरेदी करण्यास ग्राहकांना भरीस पाडतात. मॅगीसारखे नूडल्स तर अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने खातात. यामध्ये चीज, भाज्या, बटर असे घालून याची चव आणखी वाढवली जाते. तर चायनिज पदार्थ आवडणारेही आपल्या आजुबाजूला असंख्य जण असतात आणि हे लोक आवडीने शेजवान नूडल्स किंवा तत्सम वेगवेगळ्या फ्लेवरचे नूडल्स खातात. मात्र हे नूडल्स एकतर मैद्यापासून तयार झालेले असतात आणि त्यामध्ये इतरही हानिकारक घटक असल्याने ते आरोग्यासाठी म्हणावे तितके फायदेशीर नसतात. त्यामुळे नूडल्स खाणे टाळलेले केव्हाही चांगले. 

*पाहूयात नूडल्स खाणे का धोक्याचे असते याविषयी (How Bad are Instant Noodles to Your Health).....*

*१. सोडीयमचे जास्त प्रमाण...*
नूडल्समध्ये सोडीयमचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. रक्तदाब वाढला की त्याचा हृदय आणि इतर अवयवांवर परीणाम होतो आणि परीणामी शरीराचे कार्य बिघडते. 

*२. प्रिझर्व्हेटीव्हचे प्रमाण जास्त...*
फळं, भाज्या, दूध, डाळी, धान्य यांसारख्या नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश असायला हवा असे वारंवार सांगण्यात येते. पॅकेट फूड म्हणजेच प्रिझर्वेटीव्ह असणारे पदार्थ शक्य तितके टाळायला हवेत असे सांगितले जात असताना आपण आहारात जास्तीत जास्त पॅकेट फूडचा समावेश करतो. मॅगी किंवा नूडल्स दिर्घ काळ टिकावेत यासाठी त्यामध्येही प्रिझर्वेटीव्ह जास्त प्रमाणात घालण्यात येतात. ते आरोग्यासाठी चांगले नसल्याने शक्यतो टाळायला हवेत.

*३. अनावश्यक फॅटचे प्रमाण जास्त...*
आपल्याला अन्नातून चांगले फॅटस आणि वाईट फॅटस असे २ प्रकारेच फॅटस मिळतात. नूडल्समध्ये वाईट प्रकारच्या फॅटसचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. कोलेस्टेरॉल वाढले तर हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो. 

*४. मेटाबॉलिक समस्या...*
नूडल्समुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, वजन वाढणे, रक्तदाब वाढणे अशा समस्या उद्भवतात. या समस्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने शक्यतो आहारात नूडल्ससारखे पदार्थ टाळलेले केव्हाही चांगले. 

*५. पोषक घटकांची कमतरता...*
नूडल्समध्ये शरीराला आवश्यक असणारे विशेष कोणतेच घटक नसतात. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, मात्र यात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स, खनिजे यांचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे हे खाऊन शरीराला काहीच फायदा होत नसल्याने आहारात या घटकांचा समावेश टाळलेला चांगला. यामुळे फक्त पोट भरते बाकी काही नाही.

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०२४

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

अन्नावर कधी राग काढू नये🙏🏻*

*🙏🏻अन्नावर कधी राग काढू नये🙏🏻*

🌸 ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते. माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान. एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच राहते. अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते.

🌸 घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका. त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या. शत्रू जरी काही खात-पीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका. अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही त्रास होतो.

🌸 गरिबीमुळे काहीजण भाकरी, ब्रेड, वडे, समोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात. मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूर पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात. अथवा हुसकावून लावतात. चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुक्या प्राण्यांना काय समजणार ? एखाद्याचा तोंडचा घास काढून घेऊ नये 

🌸 मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत. तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये. घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात. यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्राहुती दिली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे. मंगलकार्याच्यावेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते. अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी. संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो.

🌸 अन्न शिजविणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले, वाईट विचार,त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रुसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणे-पिणे करू नये.

🌸 मनुष्यप्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात. ‘अतिथी देवो भव’ ही म्हणही त्यासाठीचा वापरतात. कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरे, गायी व इतर मुक्या प्राण्यांना खाऊ घालणे चांगलेच त्यामुळे मनाला समाधान मिळते.  अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, स्वतःची अध्यात्मिक शक्तीही वाढते.
 
Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...