बुधवार, ७ एप्रिल, २०२१

पिकावरील किटक नाशकांची फवारणी

 *_☘ फवारणिचे महत्व ☘_*


*_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

_जमिनिमध्ये कितीही प्रमुख द्रव्ये (N P K) दुय्यम अन्नद्रव्ये (ca, mg, s) आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये (Fe, Zn, Mn, Cl, Mo, Cu, B) घातली असली  तरी त्यांच्या परस्परातील स्पर्धा आंतरक्रिया (inter action) घडत असतात. उदा. नायट्रोजन वाढवले तर कलशियमची कमतरता होते. फास्फरस वाढविले तर झिंक, लोह याची कमतरता होते. बोरोन, मोलिब्डेन यांचे प्रमाण थोड़े जरी जास्त झाले तरी अनिष्ट परिणाम होतो. अशा गुंतागुंतीमुळे जमिनीत भरपूर खते देऊनसुध्दा ती लागू होत नाहित. त्यात जमीनी आसिडिक व अल्कलाईन असल्या तर समस्या वाढतात. ऊसाची संख्या मिळत नाही. अशा परिस्थितीत ही प्रमुख अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये, सुक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे दिली तर फार चांगला परिणाम होतो._

     _ऊसाच्या कांड्याची संख्या, पेराची जाड़ी, लांबी वाढविली आणि फुटवे मरण्याचे प्रमाण कमी केले तर टनेज चांगले वाढू शकते. फ़वारणीद्वारे पोषन द्रव्याची पुर्तता करण्याबरोबरच त्या सोबत संजिवके दिली तर हे काम अपेक्षे प्रमाणे घडू शकते. जिबरेलिन या संजिवकामुळे कांड्याची लांबी, संख्या वाढते. इंडोलब्युटेरिक आसिड( IBA ) किंवा ( NAA ) मुळे लांबी, जाडीसुध्दा वाढते. सायटोकायनिन (सिक्स बीए) मुळे जाडी, संख्या वाढते. ट्रायकंटेनाल मुळे सगळी पोषण द्रव्ये, संजिवाके यांचा प्रभाव वाढतो. जिबरेलिन आणि सिक्स बीएच्या मिश्रणाला 'प्रोमालिन' म्हणतात. प्रोमालिन व अन्नद्रव्याच्या मिश्रणाच्या फवारणीमुळे जमिनीत घातलेल्या अन्नद्रव्यांचे जलद शोषण होते. फोटोसिंथेसिस वाढते. आयबीए व सिक्स बीएच्या मिश्रणाच्या फवारणीमुळे मुळाकडून शेंडयाकडे अन्नद्रव्य व पाणी यांचे वहन करुन नेणाऱ्या नलिका (झायलेम) आणि पानातले तयार झालेले अन्न शरीरात सर्वत्र पोचविणार्या नलिका (फ्लोएम) चांगल्या बांदल्या जातात. भुद्रावन (soil solution) वेगाने खेचले जाते. मुळ्यांची वाढ चांगली होते. काण्ड्याची संख्या, जाड़ी, लांबी, चांगली वाढते. रिकव्हरी वाढते._

संकलन ::गजानन गोपेवाड 

*✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...