*_आजची माहिती_*
*_📕 अंधत्व का येते ? 📕_*
**********************
_हातात पांढरी काठी घेतलेली गॉगल घातलेली व्यक्ती धडपडत बसमध्ये चढताना, रस्ता क्रॉस करत असताना तुम्ही पाहिली असेल. त्या व्यक्तीला पाहून तुम्हाला वाईटही वाटत असेल. एवढ्या सुंदर सृष्टीचा तिला डोळे नसल्याने आस्वाद घेता येत नाही. एवढेच काय, बऱ्याच कामांसाठी दुसर्यावर अवलंबून राहावे लागते. असे हे अंधत्व का बरे आले असेल? असा प्रश्नही तुमच्या मनात निर्माण झाला असेल._
_अंधत्वाची अनेक कारणे आहेत ३ मिटरवरून (दिवसाच्या उजेडात) बोटे मोजता न येणे, अशी अंधत्वाची व्याख्या वर्ल्डहेल्थ ऑर्गनायझेशननी (WHO) केली आहे. सध्या जगात २.८ कोटी अंध व्यक्ती आहेत. आपल्या देशात अंधत्व हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यक्रमात याचा समावेश आहे. अंधत्वाची कारणे बघितल्यास मोतीबिंदू, बुब्बुळावर फूल पडणे, ट्रॅकोमा, सांसर्गिक आजार, 'अ' जीवनसत्त्वाचा अभाव अपघात, डोळ्यांचे इतर जन्मजात आजार, डोळ्यांतील पडदा निघून येणे, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा व्याधी, त्या कारणांचा मुख्यत: समावेश होतो. विषारी दारू वा वायू यामुळे डोळ्यांच्या नसांवर परिणाम होऊनही अंधत्व येते. म्हणून अंधत्व टाळण्यासाठी डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यांची स्वच्छता ठेवणे, सकाळ संध्याकाळ डोळे स्वच्छ पाण्याने धुणे, डोळ्यांचे व्यायाम करणे, डोळ्यांच्या आजारावर त्वरीत उपचार करून घेणे, वैदूकडून उपचार न करणे, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांचे नियंत्रण करणे, 'अ' जीवनसत्त्वाचे डोस लहान मुलांना दर ६ महिन्यांनी सहाव्या महिन्यापासून तीन वर्षांपर्यंत देणे, आहारात हिरव्या पालेभाज्या, पपई, गाजर यांचा समावेश करण्याने आपण अंधत्वाचे निवारण करू शकतो, आणखी एक गोष्ट म्हणजे मरणोत्तर नेत्रदानाने अनेक अंध व्यक्तींना आपण दृष्टी देऊ शकतो. हे आपले सामाजिक कर्तव्य आहे._
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_संकलन : गजानन गोपेवाड _*
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*
_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा