बुधवार, ७ एप्रिल, २०२१

रांजणवाडी म्हणजे काय?

 *_आजची माहिती_*


*_📙रांजणवाडी म्हणजे काय ?📙_*

*****************************

_रांजणवाडी होण्याचा अनुभव आपण कधी ना कधी तरी घेतलेला असतोच. 'काहीतरी चोरून खाल्ल्यावर रांजणवाडी होते बरं का !' असंही कोणी आपल्याला गमतीने म्हटलेले असते. रांजणवाडी हा डोळ्यांचा आजार आहे. पापण्यांच्या मुळाशी पू साठायला लागून हा रोग होतो. आपल्या पापण्यांच्या मुळाशी तैलग्रंथी असतात. त्यांना 'झीज' ग्रंथी असे म्हणतात. या ग्रंथीचे तोंड बंद होऊन आता ग्रंथीतील स्राव साठून त्यामध्ये जंतुसंसर्ग होतो व त्यामुळे या ठिकाणी पूर साठावयास लागतो. पापणी लाल, सोडलेली दिसते. डोळ्यांची उघडझाप करताना दुखते. स्पर्शाने वेदना होतात यालाच रांजणवाडी असे आपण म्हणतो._

     _रांजणवाडी पिकल्यावर आपोआप फुटते व पू निघून गेल्यावर पापणी पूर्ण बरी होते. रांजणवाडीची नुसती सुरुवात असल्यास गरम पाण्यात कपडा बुडवून त्याने शिकल्याने रांजणवाडी एक दोन दिवसांत जिरू शकते. जिरली नाही तर तरी पिकण्यासाठी शेकल्याने मदत होते व ती लवकर फुगून फुटते. सुजेच्या सुरुवातीस पू निघण्यासाठी पापणी दाबून प्रयत्न करू नये. त्यामुळे कधी कधी तेथील जंतुसंसर्ग रक्तवाहिन्यांद्वारे मेंदूमध्ये नेला जाऊन मेंदूमध्ये संसर्ग होऊ शकतो._

     _शेकणे या उपायांसोबतच आणखी एक उपाय घरच्या घरी करता येतो. लसणाच्या पाकळीचा रस सकाळ संध्याकाळ दोन दिवस लावला तर रांजणवाडी जिरते. वारंवार रांजणवाडी होणे हे शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे असे होणार्‍या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एखादे वेळी त्यांना मधुमेहही झालेला असू शकतो._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...