*पचनसंस्थेसाठी काही घरगुती उपाय.*
उत्तम औषध बडीशोप
रुचकर, पाचक, कितीही जडान्न खाऊन वर बडिशेप खावी, ते अन्न पचते ( जेवणानंतरच खावी. ). तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकटा दूर होतो. आतड्यांची हानी टळते.
पोटात गॅस होऊ देत नाही व चिकटपणा/आमांश दूर करते.
अपचनाच्या सर्व तक्रारींत..
बडिशेप, काढा वा अर्क वापरता येतो. उदा. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, वारंवार संडासची भावना होणे, पोटात खुटखुटणे इ. थोडक्यात, सर्व पचनसंस्थेसाठी उपयोगी आहे. जेवणानंतर एक चमचा बडिशेप रोज दोन वेळा खावी.
मुलांना दात येताना... जुलाबाचा त्रास होतो, त्यासाठी चुन्याच्या निवळीसह बडीशेप चूर्ण घ्यावे.
भूक लागत नसेल तर रोज बडिशेप खावी. त्यासाठी शक्य असेल तर एक चमचा बडिशेप चूर्णात दोन चमचे मध टाकून त्याचे चाटण रोज एक वेळा घ्यावे.
तापामध्ये अंगाची आग होत असेल.
जिभेला शोष पडत असेल तर बडिशेपेचा काढा खडीसाखर घालून प्यायला द्यावा..
लघवी कमी होत असेल.
तसेच लघवीला जळजळ किंवा आग होत असेल तर एक चमचा बडिशेपेचा काढा करून प्यावा.
कोरडा खोकला
असेल तर, एक चमचा बडिशेप चूर्ण + एक चमचा पत्री खडीसाखर बरोबर घेणे.
सूज व वेदना.
असतील तर बडिशेप, सैंधव पूड व ओवा समभाग घेऊन तव्यावर गरम करून त्यांची रुमालात पुरचुंडी करून शेकावे.
बडीशेप सरबत.
बडिशेप ४ वा ५ चमचे घेऊन ती एका भांड्यात पाणी भरून त्यात टाकून रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी हे मिश्रण १० मिनिटे उकळावे व गाळून त्यात ४ वा ५ चमचे खडीसाखरेचा पाक करून घालावा. म्हणजे चांगले सरबत तयार होते.
उपयोग - या सरबतामुळे भूक वाढते, पचनशक्ती सुधारते, उष्णता कमी होते. शिवाय ते पौष्टिक आहे.
स्वादिष्ट विरेचन चूर्ण..
बडिशेप, ज्येष्ठमध व सोनामुखी प्रत्येकी १५० ग्रॅम एकत्र करून त्यांची पूड करावी. त्यात ३०० ग्रॅम खडीसाखर पूड करून मिसळावी म्हणजे हे विरेचन चूर्ण तयार होते. उपयोग - रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा चूर्ण गरम पाण्यासोबत घ्यावे.
त्याने पोट साफ होते. तसेच मूळव्याध, तोंड येणे इ. उष्णताविकार व त्वचाविकार बरे होतात.
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रसदेखील पोटातील गॅस दूर करण्यासाठी उपयुक्त असते. यासाठी एक कप पाण्यात एक चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा बेकिंग मिसळा आणि ते प्याव. यामुळे पोटातील गॅसपासून त्वरित आराम मिळतो.जास्त वेळा चहा पिणे हे पोटात गॅस (Stomach Gas) तयार होण्याच्या लक्षणांपैकी एक आहे. ...
ओवा
ओव्यामध्ये थायमॉल नावाचे संयुग असते, जे गॅस्ट्रिक रस स्राव (Gastric Juice) करते आणि पचनास मदत करते. ...
जिऱ्याचे पाणी
गॅसच्या समस्येवर जिरे पाणी हा उत्तम घरगुती उपाय.
आले आणि लसूण:
आले आणि लसूणमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म पोटातील गॅस कमी करण्यास मदत करतात.
जिरे पाणी
एका ग्लास गरम पाण्यात थोडेसे जिरे मिसळून ते पिणे हा देखील एक चांगला घरगुती उपाय आहे.
धणे पाणी
धणे पाण्यात भिजवून ते बारीक करून पाण्यात मिसळून प्यायल्यानेही गॅसपासून आराम मिळतो.
योगासन पवनमुक्तासन आणि वज्रासन यासारखे काही योगासन पोटातील वायू कमी करण्यास मदत करू शकतात.
नैसर्गिक चहा
आल्याचा किंवा पुदिन्याचा चहा प्यायल्याने पोटातील वायू कमी होण्यास मदत होते
शक्य झाले तर सूर्य नमस्कार घालावे .
प्रत्येक अवयवाला व्यायाम होईल .
ताजे अन्न खा .
जड अन्न खाणे बंद करावे .
सकाळी उठून गरम पाण्यातून लिंबू घ्या .
सकाळी फिरायला जावे .
रात्री झोपताना चार थेंब एरंडेल तेल बेंबीत सोडा
याने संडास साफ होईल .
रोज पालेभाज्या खाणे उत्तम .
वडा पाव सामोसे असे पदार्थ कमी खायचे .
फारच त्रास होत असेल तर रात्री झोपताना अर्धा चमचा त्रि फळा चूर्ण घेऊन वर कोमट पाणी प्या .
तेव्हा भरपूर आणि काहीही खायची इच्छा असेल तर त्या प्रमाणात भरपूर व्यायाम देखील करा. गॅसेसचा त्रास होणार नाही.
व्यायाम करायची इच्छा नसेल किंवा विविध कारणांनी व्यायाम करणे शक्य होत नसेल तर जेवण साधे आणि सात्विक करा. लौकर पचणारे फळ आणि सॅलडसारखे पदार्थ जास्त प्रमाणात खा. गॅसेसची तक्रार येणार नाही.
लेखन✍️ गजानन गोपेवाड