बुधवार, ७ एप्रिल, २०२१

जादु बेरीज चौरसाची

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*

           *_🤔 कुतूहल 🤔_*


🎯 *_निर्मिती जादूच्या बेरीज चौरसांची_*

*********************************


_या लेखात जादूचे बेरीज चौरस बनविण्याच्या खास रीती पाहूया. प्रथम पाहू विषम घरांचे जादूचे चौरस, उदा. ३७३ चौरस बनविण्याची पायरी पद्धत, जिला सायमन द ला लुबेरे पद्धत असेही नाव आहे._

     _प्रथम आपण क्रमवार १ ते ९ नैसर्गिक संख्यांचा जादूचा चौरस तयार करू. याकरिता मधला अंक ५ घ्यावा. सर्वांत लहान संख्या १ मधल्या स्तंभाच्या वरच्या घरात भरा. नंतर उजवीकडे वर जाणारा तिरका बाण वापरावा. १ च्या उजवीकडे वर जाणारा बाण तिसऱ्या स्तंभाच्या वर जातो, म्हणून तिसऱ्या स्तंभातील शेवटच्या घरात २ भरा. पुन्हा खालून उजवीकडे गेल्यास बाण दुसऱ्या रांगेत जातो म्हणून त्याच दुसऱ्या ओळीत शेवटच्या घरात ३ भरा. त्यापुढचा बाण १ ने भरलेल्या घरात जाईल म्हणून ४ ही संख्या ३ च्या खालच्या घरात भरा. अशा रीतीने बाकीचे अंक आकृती १ मध्ये दाखवलेल्या बाणांच्या दिशांप्रमाणे भरा. (स्वामी भारतीकृष्ण तीर्थजी यांच्या वैदिक गणितात या पद्धतीसाठी ‘परावत्र्य योजयेत्’ असे सूत्र आहे.) समान फरक असलेल्या कोणत्याही ९ परिमेय संख्या घेऊनही असा चौरस बनवता येईल. काही चौरस लगतच्या दोन संख्यांमध्ये समान फरक नसूनही तयार होतात. १५,१६,१७,२२,२३,२४,_


*_२९,३०,३१ या नऊ संख्या घेऊन जादूचा चौरस बनवता येतो का पाहा._*

_सम घरांचे जादूचे चौरस उदाहरणार्थ, ४७४ चौरस करण्याची कॉन्स्टॅन्टिनोपलच्या मॉस्कोपुलस यांची सुधारित सोपी पुढील रीत लोकप्रिय आहे._

     _१ ते १६ संख्या क्रमाने घेऊन एक चौरस (आकृती २-अ) दिला आहे. या चौरसातला मुख्य चौरस आणि मधला चौरस यांच्या कर्णांच्या टोकांशी असलेल्या संख्यांची फक्त अदलाबदल करावयाची इतकेच!  कसे ते बाणांच्या साहाय्याने दाखवले आहे. (आकृती २-ब) आता आपल्याला ३४ बेरजेचा जादूचा चौरस मिळेल. (आकृती २-क) याशिवाय ठिपक्यांच्या रांगोळीची पद्धत, बुद्धिबळातील घोडा, उंट, हत्ती यांच्या चालींचे मिश्रण करून केलेली पद्धत, भारतीय ठक्कुरा फेरू यांची अनोखी मनोरंजक पद्धत अशा कितीतरी पद्धती आहेत._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक- १६ मार्च २०२१_*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...