अग्निपंख शै.स.महाराष्ट्र राज्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अग्निपंख शै.स.महाराष्ट्र राज्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

कंबर दुखी, पाठदुखि , मानदुखी, खांदेदुखि, स्पाँडिलायसिस, संधीवात, rheumatoid arthritis.**हे सर्व वातविकार प्रकार आहेत.*

*कंबर दुखी, पाठदुखि , मानदुखी, खांदेदुखि, स्पाँडिलायसिस, संधीवात, rheumatoid arthritis.*
*हे सर्व वातविकार प्रकार आहेत.*

*१.स्पाँडिलायसिस हा रोग नाही.*           
*२.ही शरीरातील (काही भागापुरती)* 
*झीज आहे.*
*३.एक प्रकारे वार्धक्य असही आपण म्हणू शकतो.*
*४.पाठीत ऊसण भरणे -* 
*हे स्पाँडिलायसासमुळे होऊ शकत.*
*५.मान तिरपावणे -*                   
*हे स्पाँडिलायसासमुळे होऊ शकत.*
*६. पाठीत ऊसण भरणे, मान तिरपावणे, स्पाँडिलायसीस, या सर्वासाठी पुढे सांगितलेली काळजी घेणे जरुर आहे. -----*

 *सकाळी कोवळ्या उन्हात उभे राहून रोज विटामिन डी नैसर्गिक रित्या  घ्या*

जिरे आणि ओवा चिमूटभर दिवसातून चार ते पाच वेळा खा. तसेच दिवसभरात केव्हाही पाणी गरमच प्या.

मेथी रात्री पाण्यात भिजत टाका.
सकाळी ते पाणी प्या, व भिजवलेली मेथी चावून खा.

मेथीची पाने वाटून पेस्ट करून सांध्यावर लावा अथवा मेथी दाणे पेस्ट करून दुखर्‍या जागेवर लावा.

मेथी  भिजवून मटकी ला मोड आणतात तसे आणा. तेल मीठ न घालता पांढरा कांदा घालून भाजी करा. ज्वारी भाकरी सोबत चपाती नाही फक्त एवढेच दोन तीन वेळा १५ दिवस खाणे दुसरे काही नाही. खाणे.

त्रिफळा चूर्ण व गूळ एकत्र करून रात्री झोपण्याच्या आधी गरम पाण्याबरोबर घ्या

डिंकाचा खडा चघळा
किंवा डिंकाचे लाडु करुन खा.

पारिजातकाची १०-११ पाने वाटून चटणी करा, ती पाण्यात ऊकळवा, थंड करुन प्या.
तीन महिने घ्या --- नंतर २० दिवस सोडून --- परत तीन महिने घ्या. 
अशा प्रकारे करा आराम वाटेल.

रोज एक किंवा दोन महायोगीराज गुग्गुळ गोळी घ्या.    किंवा
महारास्ना काढा घ्या.

१चमचा हळद+१चमचा पीठीसाखर+कणभर खायचा चूना+थोड पाणी घालुन एकजीव करा व तो लेप उसण भरली असेल तीथे लावा. ७ दिवस लावा.

दुखद बाव लेप लावा.

महानारायण तेलाने माॅलीश करणे.

दुखर्‍या भागावर शेक घ्या.
त्यासाठी गरम पाण्याची पीशवी
किंवा   ईलेक्ट्रीकची ऊशी
किंवा   विटेचा तुकडा शेगडीवर गरम करुन फडक्यात गुंडाळून शेकु शकता.
महत्वाचा ऊपाय शेक आहे. औषध फक्त वेदाना कमीकरण्यापूरतीच असतात. एकदा आखडलेला भाग सुटला कि दुखण आपोआपच बर होत असत.

*ही दक्षता घ्या.......*
जरुशिवय पुढे वाकायच नाही, वेळ आलीच तर काठी घ्या.
शक्यतो जड ऊचलायच नाही. कुठेही बसतांना पाठ ताठ राहील याची दक्षता घ्यायची. 
बॅकबेंडींगची आसने योगासन शिकवणार्‍याकडुन शिकून घेवुन करायची.          
झोपायला पातळ गादी व पातळ ऊशी घ्या. कुशिवर झोपतांना दोन ढोपरांमधे जाड ऊशी घ्या.

हाडमोडीवर  अर्जुन सादडा
अर्जुनसादडा - सालीचे चुर्ण + १ग्रॅमतुप +१ग्रॅम राखर घालुन सकाळ संध्याकाळ घ्याव
 *कोणतेही हाडाचे दुखणे व्यायाम केल्याशिवाय कायमचे  बसणार नाही. पेन किलर खाणे योग्य नाही. जास्त त्रास होत असल्यासच पेन किलर  घ्यावी*
            परंतु
 
🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒💥🍓💥🍓💥🍓💥🍓💥🍓💥🍓💥🍓

ज्वारीच्या भाकरीचे महत्व* *!! रामबाण !!*

*ज्वारीच्या भाकरीचे महत्व* 
        *!! रामबाण !!*
“मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन १४ किलोनी कमी झालं.” 

“माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स काढून फेकून दिले.”

“गेली २० वर्षं अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं.”

“माझ्या छातीतली जळजळ आता थांबली.”

“माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला, माझा अल्सरेटिव्ह कोलायटिस, माझा रुमटॉइड आर्थ्रायटिस, माझा मूड, माझी झोप…” वगैरे सुधारले...

गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते.  काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात. 

*जेवणात का खावी ज्वारीची भाकरी… ?*

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. 

ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते. 

बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.

तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.

ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहतो.

भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.

*ज्वारीचे फायदे*

1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.

2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.

3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.

4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.

5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.

6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.

7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.

8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.

9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.

10) शौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे.

11) काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.

*ज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या, 
ज्वारीचा आहारामध्ये अपयोग करा ,रोग पळवा 



*विशेष सुचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून वाचावा व ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा*

पहाटेची लवकर उठण्याची अमर्याद ताकद.....*

*पहाटेची लवकर उठण्याची अमर्याद ताकद.....*

*तुम्ही सकाळी किती वाजता उठता...?*
हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती.

पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला.पण तो हार मानणारा नव्हता, यातून बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं?

“हेल, तु सकाळी लवकर उठ!” “बाकी सगळं आपोआप होईल”या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते, काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली, आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं!

*पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का...?*
इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्नावर हेल ने एक कोडवर्ड सांगितला 

https://chat.whatsapp.com/G7SHhSXSekCFq3WmVKCDii

*ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत...*

*१) Silence (ध्यान)...* 
*शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान!
*स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान!
*मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान!
*मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!
*माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान!
*अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान! 

*२) Affirmations (सकरात्मक स्वयंसूचना)...*
*अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद!
*स्वतः स्वतःला सुचना देणं,
*प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!
*येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसूचना!
*स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात.
*अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो.
*एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे?
*वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!

*३) Visualize.(चांगल्या कल्पना मनात घोळवणे)...*
*तीव्र इच्छा पुर्ण झाली आहे, अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटला वर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिज्वलायजेशन!
*कल्पनाशक्ती ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे.
*कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं.
*दररोज आपण आपली ध्येयं पूर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे.
*पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो.
*ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे. 
*मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो.
*प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, “यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!” 


*4) शरीरातून आळसाला पळवून  लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम...
*शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा!
*व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त बाबीकडे वळते, आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.
*वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.  
*तो कशावरच एकाग्र होवू शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होवू शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.
*ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,प्राणायाम करा.  शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.

*५) Reading (वाचन)...* 
*पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.
*पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.
*वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.

*६) Scribing (लिहिणे)...* 
*लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.
*लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.
*लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.
*संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.
*लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे. लिहिल्याने विचार पक्के होतात.
*सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं.
*एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत.
*मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.
*ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,
*रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत, आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं.
*लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!
*जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.
*अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.

*ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे. वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या आहेत...?* 

 आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे. तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे.

कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत.
तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू. अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये.
वेळ आहे स्वतःवर काम करण्याची स्वतःसाठी जगण्याची आलेल्या परिस्थिती चा फायदा करून घेण्याची...


💥🍇💥🍇💥🍇💥🍇💥🍇💥🍇💥🍇💥🍇💥

रविवार, ३० जून, २०२४

शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन🌹*🌹🌹🥇🥇🌹🌹🏆🏆🌹🌹

*🌹शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन🌹*
🌹🌹🥇🥇🌹🌹🏆🏆🌹🌹

     🏵️ *जुन महिना* 🏵️
*1) SMC मिटिंग आयोजन 14/6*
*2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन.*
*3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन*
*4) Student pramotion करणे.*
*5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे.*
*6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे.*
*7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे.*
*8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी.*
*9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम*
*10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड*
*11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे.*
*12) Staff Attach-deteach करणे.*
*13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6*
*14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ*
*15) Student Request पाठविणे व coinfirm करणे.*
*16)शा.पो.आ. करारनामा करणे.*
*17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे.*
*18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे.*

       🏵 *जुलै महिना* 🏵️
*1) माता-पालक संघ सभा*
*2) सरल st. request-coinfirm पाठविणे.*
*3) मीना राजु मंच सभा*
*4) SMC मिटिंग*
*5) कथाकथन स्पर्धा आयोजन*
*6) शा.पो.आ.सभा*
*7) दिंडी उपक्रम आयोजन*
*8) पालक सभा आयोजन*
*9) आदर्श परिपाठ तयारी*
*10) गुरुपोर्णिमा उपक्रम*
*11) शिष्यवृत्ती वर्ग सुरुवात 5 वी/8वी*
*12) नवोद्य विद्यार्थी निवड व वर्ग सुरुवात 5वी*
*13)पायाभुत चाचणी 1 आयोजन*

        🏵️ *आँगस्ट महिना* 🏵️
*1) Student माहिती online भरणे.*
*2) शिक्षक -पालक संघ सभा*
*3) SMC मिटिंग आयोजन*
*4) स्वातंत्र दिन पुर्व तयारी*
*5) सरल school portal भरणे.*
*6) सरल Staff portal भरणे*
*7) गोपाळकाला (दहिहंडी)उपक्रम*
*8) अकारिक चाचणी १ आयोजन*
*9) प्रगत/अप्रगत उपक्रम(जादा तास) आयोजन*
*10) लो.टिळक पुण्यतिथी 1/8*
*11)रक्षाबंधन उपक्रम आयोजन*
*12) परिसर सहल आयोजन*

     🏵️ *सप्टेंबर महिना*🏵️
*1) माता-पालक संघ सभा*
*2) संच मान्यता portal भरणे.*
*3) गणपती उपक्रम*
*4) SMC मिटिंग*
*5) शाळेत गणेशोत्सव साजरा करणे.*
*6) वक्तृत्व स्पर्धा आयोजन.*
*7) शा.पो.आ.सभा*
*8) मीना राजु मंच सभा*
*9) पालक सभा आयोजन*
*10) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती online भरणे.*
*11) पायाभुत online marks भरणे.*
*12) विद्यार्थी प्रगत-अप्रगत ठरविणे.*
*13) समाजकल्याण शिष्यवृत्ती online भरणे.*
*14)  अध्ययन निष्पत्ती उपक्रम*
*15) शाळेत शिक्षक दिन साजरा करणे.5/9*

    🏵️ *आँक्टोंबर व नोव्हेंबर महिना* 🏵️
*1) 15 oct वाचन प्रेरणा दिन साजरा करणे.*
*2) सत्र 1 परीक्षा घेणे.*
*3) नवरात्र दिवसात परिसर सहल आयोजन*
*4) स्वच्छता अभियान राबविणे.*
*5) SMC मिटिंग*
*6) दिवाळी अभ्यास नियोजन*
*7) गांधी जयंती साजरी करणे. 2/10*
*8) नवरात्र भोंडला आयोजन.*
*9) चित्रकला उपक्रम आयोजन.*
*10) नवोदय,शिष्यवृत्ती online form भरणे.*
*11) शैक्षणिक सहल पुर्वतयारी*
*12) क्रिडा स्पर्धा पुर्वतयारी.*
*13)  पायाभुत चाचणी 2 आयोजन**
*14) शिक्षक -पालक संघ सभा*
*15) पं.नेहरु जयंती 14/11 बाल दिन*
*16) सरदार वल्लभभाई पटेल जयंती 31/10*

      🏵️ *डिसेंबर  महिना*  🏵️
*1) माता पालक संघ सभा SMC मिटिंग*
*3) शा.पो.आ.सभा*
*4) पालक सभा आयोजन*
*5) कला व क्रिडा स्पर्धा*
*6) शैक्षणिक सहल आयोजन*
*7) Udise+ Online भरणे*
*8) शाळेचा वार्षिक आराखडा भरणे.*
*9)अध्ययन निष्पत्ती उपक्रम*

      🏵️ *जानेवारी महिना* 🏵️
*1) शिक्षक -पालक संघ सभा*
*2) प्रजासत्ताक दिन कार्यक्रम*
*3) सा.फुले जयंती उपक्रम*
*4) सांस्कृतिक कार्यक्रम*
*5) बाल आनंद मेळावा*
*6) स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती.12/1*
*7)नेताजी जयंती 23/1*
*8) शिष्यवृत्ती सराव परीक्षा 5 वी/8 वी सरावप्रश्नपत्रिका नियोजन*

   🏵️ *फेब्रुवारी महिना* 🏵️
*1) माता पालक संघ सभा*
*2) शा.पो.आ.सभा*
*3) पालक सभा आयोजन*
*4) शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8 वी परीक्षा*
*5) आकारिक चाचणी 2 आयोजन*
*6) वार्षिक तपासणी पूर्वतयारी*
*7) शिवजयंती कार्यक्रम 19/2*
*8) Udise + online भरणे.*

      🏵️ *मार्च महिना* 🏵️
*1) शिक्षक -पालक संघ सभा*
*2)SMC मिटिंग*
*3) वार्षिक तपासणी*
*4) इयत्ता 7 वी/8 वी/5 वी/4 थी निरोप समारंभ*
*5) शाळेची वार्षिक तपासणी*
*6) समग्र शिक्षा अभियान खर्च वार्षिक विनियोग*
*7) SSA online link भरणे.*
*8) जागतिक महिला दिन 8/3*
*9) यशवंतराव चव्हाण जन्मदिन 12/3*
*10) जागतिक अपंग दिन 17/3*
*11) संत गाडगेबाबा जयंती 4/3*
*12) वर्गनिहाय सत्र 2 पर्यतचा वार्षिक  नियोजन प्रमाणेअभ्यासक्रम पुर्ण करणे.*

      🏵️ *एप्रिल महिना* 🏵️
*1) माता-पालक संघ सभा*
*2)शा.पो.आ. सभा*
*3) द्वितीय सत्र परीक्षा*
*4) पायाभुत चाचणी 3*
*5) माँडरेशन तयारी*
*6) महात्मा फुले जयंती 11/4*
*7) पेपर तपासणे.निकाल तयार करणे.*
*8) शा.पो.आ.वार्षिक एकुणात करणे.*
*9) आंबेडकर जयंती 14/4*
*10) नवोद्य परीक्षा 5 वी*
*11) RTE केंद्र बोर्ड परीक्षा 5 वी व 8 वी*

         🏵️ *मे महिना* 🏵️
*1)निकाल जाहीर करणे*
*2) 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करणे.*
*3) पुढील वर्ष वर्गवाटप,*
*4) शिक्षक कामकाज वाटप -लाँगबुक भरणे.*
*5) 33 कोटी वृक्षलागवड माहीती online.*
*6) प्रशिक्षण तयारी-अभ्यासक्रम बदल*
*7) पुढील शैक्षणिक वर्ष नियोजन....*
🙏🙏🙏🏵️🏵️🥇🥇🏵️🏵️🙏🙏🙏

रविवार, २३ जून, २०२४

आपल्या हातान्च्या बोटान्विषयी थोडक्यात उपयुक्त माहिती.....*

*आपल्या हातान्च्या बोटान्विषयी थोडक्यात उपयुक्त माहिती.....*

*अंगठा (The Thumb)...*  आपल्या हाताचा आपल्या फुफुसाशी जोडलेला असतो. जर तुमच्या हृदयाची धडधड वाढली असेल तर अंगठ्याला मसाज करा आणि हळुवार खेचा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

*तर्जनी (The Index Finger)...*   
हे बोट आतड्या gastro intestinal tract सोबत जोडलेले आहे. जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हळुवार चोळा यामुळे वेदना गायब होईल.

*मध्यमा (The Middle Finger)...* 
हे बोट अभिसरण तंत्र circulation system सोबत जोडलेली आहे. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा जीव घाबरत असेल तर या बोटाला मालिश करा तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

*अनामिका (The Ring Finger)...*  
हे बोट तुमच्या मनस्थिती सोबत जोडलेले आहे. जर काही कारणामुळे तुमची मनस्थिती चांगली नाही आहे तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि खेचा. लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल आणि तुमचा मूड चांगला होईल.

*करंगळी (The Little Finger)...* 
करंगळीचा संबंध किडनी आणि डोक्या सोबत असतो. जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि दाबा. तुमची डोकेदुखी निघून जाईल. या बोटाला मालिश केल्याने किडनी देखील निरोगी राहते.
,🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍑🍇🍒🍇🍒🍇🍑🍇


कॅल्शियम कमी होण्याची लक्षणे व घरगुती उपाय*

*कॅल्शियम कमी होण्याची लक्षणे व घरगुती उपाय*

▪️ नखे पांढरट होणे. किंवा त्यावर तसे ठिपके दिसणे.

▪️हाताला 👋🏻 मुंग्या येणे.

▪️हाडातील ठिसूळपणा.

▪️सांधेदुखी 🦵🏻 हातांची हाडे, पाय, मांडी दुखणे.

▪️ थकवा येणे, कमी झोप.

▪️ स्मृतिभ्रंश 🤔

▪️कोरडी त्वचा, खाज येणे.

▪️ दात दुरखी, दात 🦷किडणे, त्यांची मुळे सैल होणे.

▪️मासिक पाळीवेळी ओटीपोटात दुखणे,

▪️निराशा.. 😔

▪️अनामिक भीती.

▪️हाडांची 🦴झीज होणे, गुड़ते दुखणे

*कॅल्शियमची कमी भरून काढण्यासाठी घरगुती उपाय*

दूध - दूध 🥛कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात. दुधाच्या माध्यमातून शरीरात 🧍🏻‍♂️ जाणारे कॅल्शियम जास्त फायदेशीर असते.

दही - दहीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एका बाउल दहीमध्ये ४०० मि.ग्रॅ. कॅल्शियम असते. दुधापासून तयार इतर पदार्थ उदा. पनीर, चीज सेवन 🤌🏻करून कॅल्शियम मिळते.

मसाले-तुळस - ओव्याची फुले, दालचिनी, पुदिना, लसुण 🧄तसेच तुळस यासारखे मसाले न केवळ पदार्थांना विशेष प्रकारचा फ्लेवर आणि टेस्ट 😋देतात, यातून कॅल्शिअम मिळते.

पालेभाज्या - हिरव्या 🥦पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. पालक, शलजम, कोबी, मशरूम सलाड

शेंगभाज्या - शेंगभाज्या 🫘शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात. यामुळे शरीराला प्रोटीनसोबतच कॅल्शियम मिळते

संत्री-लिंबू - संत्री, लिंबू 🍋 यासारख्या फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी मिळते. डी व्हिटॅमिनचा 🛡️विशेष गुण म्हणजे, हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.

सोयाबीन - सोयाबीन पौष्टिक असून यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम 📈 स्रोत आहे.

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...