अग्निपंख शैक्षणिक स.महाराष्ट्र राज्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अग्निपंख शैक्षणिक स.महाराष्ट्र राज्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा* 

*व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-* 

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते:
व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते. अशा व्यक्तींचे जीवन केवळ दीर्घच असते असे नव्हे तर ते तुलनात्मकरित्या वेदनांपासून मुक्त आणि अनेक प्रकारच्या पीडांपासून दूर असते.

2) नितळ त्वचा, चमकदार केस आणि निरोगी नखे:
व्यायाम करणार्‍यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत असतो आणि त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम शरीरावर होतातच पण ते त्वचा, केस, आणि नखांवर प्रतिबिंबित होत असतात. नियमित व्यायाम करणार्‍यांचे केस भराभर वाढतात व त्याच्यावर उत्तम चकाकी असते. अशा व्यक्तींची त्वचा नितळ असते आणि नखांची वाढसुध्दा निरोगीपणे होत असते.

3) शरीरातील अवयवांचा एकमेकांशी उत्तम समन्वय साधला जातो:
आपल्या शरीरामध्ये मेंदू, हृदय, हात, पाय इत्यादी अनेक अवयवांची जोडी (दोन) असते – डावे आणि उजवे. त्यांच्यात जेवढा चांगला समन्वय असेल तेवढा जीवनाचा दर्जा चांगला असतो. नियमितपणे व्यायाम केल्याने डाव्या आणि उजव्यामध्ये चांगला समन्वय साधला जातो.

4) शरीराची कार्यक्षमता वाढते:
नियमितपणे व्यायाम करणार्‍यांच्या शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते आणि त्यामुळेच त्यांची उर्जा पातळी चांगली असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा कितीही भार पडला तरी तो त्यांना सहन होतो आणि ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात.


5) मन सकारात्मक राहते:
व्यायाम करणार्‍यांची विचार करण्याची पध्दत सकारात्मक असते त्यामुळे त्यांची उत्पादकताही चांगली असते. कमी उर्जेमध्ये आणि कमी वेळेमध्ये उत्तम काम करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झालेली असते. कोणत्याही गोष्टीचा आळस येत नाही. उत्साहवर्धक वाटते.

रविवार, २२ सप्टेंबर, २०२४

सकाळी चहा-कॉफी घेतल्याशिवाय पोट साफच होत नाही, तज्ज्ञ सांगतात- तुमचंही असं होत असेल तर.....*

*सकाळी चहा-कॉफी घेतल्याशिवाय पोट साफच होत नाही, तज्ज्ञ सांगतात- तुमचंही असं होत असेल तर.....*

भारतात सकाळी झोपेतून उठल्यावर लगेचच चहा किंवा कॉफी घेण्याची पद्धत बऱ्याच वर्षांपासून आहे. झोपेतून जागे होण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी अनेकदा हा चहा घेतला जातो. एकदा सकाळी चहा घेण्याची सवय लागली की ती मोडणे अवघड असल्याने असंख्य लोक हे रुटीन फॉलो करत असतात. अशा लोकांना एखादवेळी सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी मिळाली नाही तर अतिशय अस्वस्थ होते आणि पोट साफ व्हायला त्रास होतो. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर तुमचे पोटाचे आरोग्य चांगले नाही हे तुम्ही वेळीच लक्षात घ्यायला हवे. कारण पोट साफ होणे ही नैसर्गिक क्रिया असून ती अशाप्रकारे कोणत्याही सवयीशी निगडीत असता कामा नये असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. तुम्हालाही अशी अडचण येत असेल तर नेमकी काय अडचण आहे हे वेळीच लक्षात घ्यायला हवे.

*यामागे कोणती ३ कारणे आहेत ते आहारतज्ज्ञ श्वेता पांचाळ-शहा सांगतात...*

*१. पाण्याचे कमी प्रमाण...*
कमी पाणी प्यायल्याने अनेकदा शरीरात कोरडेपणा किंवा शुष्कपणा निर्माण होतो. त्यामुळे पाणी आणि द्रव पदार्थांचे आहारातील प्रमाण योग्य असायला हवे. थंडीच्या दिवसांत हवेत कोरडेपणा जास्त वाढतो तसेच तहान कमी लागते त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास जास्त होण्याची शक्यता असते. पण असा त्रास होऊ नये म्हणून जास्तीत जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी केव्हाही जास्त चांगले. 

*२. आहारात प्रोसेस्ड पदार्थ जास्त असणे...*
आहारात प्रोसेस्ड पदार्थ जास्त प्रमाणात असतील तरीही पोट साफ होण्यात अडचणी येतात. कारण प्रोसेस केलेल्या पदार्थांमध्ये मैदा आणि साखर जास्त असते. तसेच या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. त्यामुळे पोट वेळच्या वेळी नीट साफ होत नाही. अशावेळी आहारात धान्ये, कडधान्ये, डाळी, बिया, फळं, भाज्या यांचा समावेश वाढवायला हवा. जेणेकरुन पोट साफ होण्यास मदत होईल. 

*३. शरीराची हालचाल न करणे...*
दिवसभर आपण सतत बैठे काम करत असलो आणि अजिबातच हालचाल होत नसेल तरीही कोठा जड होण्याची समस्या निर्माण होते. कामाच्या नादात आपण बरेचदा तासनतास जागेवरुन उठत नाही आणि हालचालही करत नाही. यामुळे खाल्लेले अन्न योग्य पद्धतीने पचत नाही. त्यामुळे दर काही वेळाने शरीराची किमान हालचाल करायला हवी. इतकेच नाही तर सकाळी किंवा संध्याकाळी चालणे, योगासने असा किमान व्यायाम करायला हवा.


शनिवार, २७ जुलै, २०२४

छअसून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होते नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो.*

*छअसून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होते नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो.*


लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला असेच काही छोटे+छोटे उपाय सांगत आहोत ज्यामुळे 7 दिवसात तुमचे वजन कमी होऊ लागेल....

1. पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

2. दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.

3. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.

4. वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.

5. आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.

6. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8:30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा.

7. जेवणात वरून मीठ घेऊ नये. परंपरागत मसाले अन्नाची केवळ चव वाढवत नाहीt तर यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट , एंटीऑक्सीडेंट आणि फायबरही असते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की, हे मसाले भाजण्यासाठी तेलाचा जास्त उपयोग करू नये.
 
8. वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ ( डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.

9. दिवसभराच्या आहारात सर्वात जास्त फोकस ब्रेकफास्टवर करा. अनेकवेळा लोक वजन कमी करण्याचा नादात ब्रेकफास्ट करत नाहीत परंतु एका रिसर्चनुसार नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. ब्रेकफास्टमध्ये नेहमी एकसारखे पदार्थ सेवन करू नयेत.

10. सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या. प्रसुतीनंतर येणाऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे.
11. सर्वात महत्त्वाचे नेहमी उपाशी राहिल्यानंतर लठ्ठपणा वाढतोच. त्यामुळे उपाशी राहू नये . पोटभर जेवण्यापेक्षा थोडे थोडे चार वेळा जेवण केले तरी चालेल. वेळ मिळत नसल्यास सकाळ दुपार संध्याकाळ खूप चांगले. समजा तुम्ही एकाच वेळी तीन पोळ्या खात असाल तर थोडेसे बदल करून सकाळी एक दुपारी एक आणि संध्याकाळी एक याप्रमाणे जेवण करावे.

रविवार, २३ जून, २०२४

रोज ३० मिनिटांपेक्षा जास्त मोबाइलवर बोलता? हाय बीपीचा त्रास होणारच, संशोधन सांगते....*

*रोज ३० मिनिटांपेक्षा जास्त मोबाइलवर बोलता? हाय बीपीचा त्रास होणारच, संशोधन सांगते....*

मोबाईल वर तासन तास बोलणे हे एक प्रकारचे काही व्यक्तींना व्यसन झाले आहे.विशेष करून स्त्रिया ह्या मोबाईल वर जास्त बोलतांना सर्व्हेक्षणात आढळून आल्यात. ह्यामुळे डोकेदुखी, चिडचिड, कान बधिर होणे, कान सुन्न होणे व कानामध्ये आवाज येणे यासारखे अनेक आजार होतात.

फोनवर एकमेकांशी बोलणे हे आता काही फार नवीन राहिलेले नाही. कधी कामानिमित्त तर कधी दूरवर असलेल्या व्यक्तीसोबत गप्पा मारण्याच्या निमित्ताने, तर कधी आणखी काही कारणाने आपण नातेवाईकांशी, मित्रमंडळींशी किंवा अगदी बिझनेस रिलेटेड गोष्टींच्या निमित्तानेही कित्येक तास फोनवर बोलतो. कॉल सेंटर किंवा यांसारख्या ठिकाणी काम करणाऱ्यांचे तर कामच फोनवर बोलण्याचे असते. त्यामुळे अनेकदा फोनवर बोलण्याशिवाय पर्यायच नसतो. बराच वेळ चालणारा हा फोन कल ठेवल्यानंतर आपलं डोकं, कान सुन्न झाल्यासारखं झालेलं असतं. मग काही वेळ शांत डोळे मिटून बसावं असंही आपल्याला वाटतं

बराच वेळ सलग बोलल्याने किंवा ऐकल्याने असे झाले असेल असं आपल्याला वाटतं खरं. पण यामागे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे कारण आहे ते म्हणजे बराच वेळ फोनवर बोलल्यावर आपला रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर वाढलेले असण्याची शक्यता असते. आठवड्यातून तुम्ही ३० मिनीटे किंवा त्याहून जास्त वेळ फोनवर बोलत असाल तर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शनचा त्रास होण्याचा धोका हा १२ टक्क्यांनी वाढतो. चीनच्या ग्वांगझू येथील शियानहुई किन या दक्षिण वैद्यकीय विद्यापीठातील अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार फोनवर बोलण्याचा कालावधी ३० मिनीटांपेक्षा जास्त असेल तर ही रिस्क जास्त वाढते. हे संशोधन युरोपियन हार्ट जनरलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. 

सध्या एकूण लोकसंख्येच्या १० पेक्षा जास्त वय असलेल्या तीन चर्तुर्थांश लोकांकडे स्वत:चा मोबाइल असतो.
मोबाइल फोनमधी रेडिओ फ्रिक्वेन्सी ऊर्जा ही कमी पातळीची असते. याचा रक्तदाबाशी थेट संबंध असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. तसेच हायपरटेन्शनमुळे हार्ट एटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो ज्यामुळे अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते. या संशोधना साठी जवळपास १४ हजार जणांचा अभ्यास करण्यात आला असून हे संशोधन जास्त नेमके होण्यासाठी यावर आणखी अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे किन यांचे म्हणणे आहे. आता थेट फोनवर बोलण्यापेक्षा हेडस फ्रिचा वापर केला तर रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता कमी होईल, असे आपल्याला वाटू शकते, मात्र हेडस फ्रिमुळे विशेष फरक पडत नाही आणि शरीराला जो त्रास व्हायचा तो होतोच. मात्र याविषयी आणखी संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचेही किन यांचे म्हणणे आहे. 


Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...