बुधवार, ७ एप्रिल, २०२१

7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन

 [4/7, 3:18 PM] मंगेश मांडोले आर्णी, यवतमाळ: *_आज_*


*_विश्व आरोग्य (स्वास्थ्य) संस्था_*


*_📒जागतिक आरोग्य दिन 📒_*


*_स्थापना - ७ एप्रिल, इ.स. १९४८_*

****************************


_जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 1948 साली झाली असली तरी त्याच्या जवळपास शंभर वर्ष आधीपासूनच वेगवेगळ्या देशांनी आरोग्याच्या मुद्द्यांवर एकत्र येण्यास सुरुवात केली होती. 1851 साली पॅरिसमध्ये पहिल्या इंटरनॅशनल सॅनिटरी कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं. 1938 पर्यंत या कॉन्फरन्सची चौदा अधिवेशनं झाली._


_त्यावेळी जगासमोरची मोठी आव्हानं होती कॉलरा, प्लेग आणि यलो फिव्हर. या साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी 1892 आणि 1903 मध्ये करार झाले. आजच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांची पाळंमुळं या करारांमध्ये सापडतात. गेल्या सात दशकांत सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील सुधारणांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचाही वाटा आहे. कुठल्याही नव्या आजाराची माहिती मिळवणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणं, आजारांच्या साथी पसरत असतील तर त्याविषयी देशांना सावध करणं, लस आणि उपचारांविषयी संशोधन, आरोग्यासाठी निधी जमा करणं आणि तो गरज असेल तिथे पोहोचवणं अशी कामं ही संघटना करते._


_WHOच्या प्रयत्नांमुळे देवी रोगाचं उच्चाटन, पोलियो सारख्या रोगांवर नियंत्रण शक्य झालं. इबोलावरची लस तयार करण्यातही WHOनं महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या HIV-एड्स, इबोला, मलेरिया, टीबी अशा संसर्गजन्य आजारांबरोबरच, कॅन्सर आणि हृदयविकार तसंच पोषक आहार, अन्नसुरक्षा, मानसिक आरोग्य, नशामुक्ती अशा क्षेत्रांतही WHO काम करते आहे. विविध देशांबरोबरच खासगी देणगीदारांनी दिलेल्या पैशातून या संघटनेचं काम चालतं. स्वित्झर्लंडच्या जीनिव्हामध्ये या जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे._


_संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेले सर्व देश या संघटनेचे सदस्य आहेत. पण मग त्या देशांचं काय, जे संयुक्त राष्ट्रांचे सदस्य नाहीत?_

    *_७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन_*

********************************


७ एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ही जागतिक संस्था मराठीत ‘जागतिक आरोग्य संस्था’ या नावाने ओळखली जाते. ७ एप्रिल १९४८ रोजी स्वित्झर्लंडलंड मधील जिनेव्हा येथे ही संस्था स्थापन झाली. म्हणून हा दिवस "जागतिक आरोग्य दिवस" म्हणून जगभरात साजरा केला जातो. ही संस्था आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात दिशादर्शक ठरणे, जागतिक स्तरावरील महत्वाच्या आरोग्य विषयक संस्थांमध्ये समन्वय राखणे, त्यांचे व्यवस्थापन करणे, जागतिक आरोग्य सेवा बळकट करणे, नैसर्गिक आपत्कालीन काळात पिडीतांना आवश्यक ती मदत करणे, जागतिक स्तरावर पोषण, निवारा, स्वच्छता, मनोरंजन, पर्यावरण स्वच्छता आदी गोष्टींना प्रोत्साहन देवून आवश्यक ते सहकार्य करणे, जागतिक स्तरावर आरोग्य विषयक नियमावली, करार आणि नियम मांडणे यांसारखी महत्त्वाची कार्ये ही जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर करीत असते.


*जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने -*


आपण दैनंदिन जीवनात आपल्या आरोग्याची किती काळजी घेतो; याचा आज आपण विचार करायलाच हवा, अर्थात आजच्या या पोस्टमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न करतोय.


●आपले आरोग्य टिकविण्यासाठी आपण शुध्द (गावराणी- अर्थात शक्य असेल तरच) अन्न-पदार्थ खाण्यावर भर द्यावा. म्हणजेच आजच्या या रासायनिक अन्न प्रणालीतही आपण सेंद्रिय अन्न खाण्याचा प्रयत्न करा.

●जे खाल ते घरगुती आणि ताजे खा.

●ब्रेड-बिस्कीट पासून ते तेल, गहू, तांदूळ यांच्या packing वरही expiry date पाहिल्याशिवाय खरेदी करु नका.

●मिठाई सारखे पदार्थ फक्त २४ तासांच्या आत खायचे असतात. मिठाईचे पदार्थ विकत घेतांना भेसळयुक्त मावा वापरणाऱ्या दुकानांवरुन घेण्यापेक्षा (अशी शंका असणाऱ्या दुकानांवरुन) Quality जपणाऱ्या दुकानांवरुनच मिठाईची खरेदी व्हावी.

●मिठाई सुध्दा जर नजरेला ओलसर व मऊ दिसली तरच घ्यावी कारण जूनाट मिठाई ओलसर व मऊ न दिसता कडकपणा दर्शविणारी आणि मिठाई एकसंध न दिसता भेगाळलेली असते.

●चायनीजचे पदार्थ आजकाल जास्त आवडीने खाल्ले जातात. या चायनीज पदार्थांमध्ये "अजिनोमोटो" हा मीठ किंवा साखरेसारखा दिसणारा स्फटिकी पदार्थ अतिप्रमाणात चायनीज फूडस् च्या सेंटर्सवर वापरला जातो, म्हणून चायनीज फूडस् सेंटर्सवर आपण अजिनामोटो टाकला जावूच नये याबाबतीत आग्रही रहा अथवा असे पदार्थ घरीच बनविलेले अधिक योग्य असतात.

●भाजीपाला खरेदी करतांनाही मिठाई खरेदी बाबत करतांना जी काळजी घेतात तशीच घ्यावी लागते.

●भाजीपाल्याच्या नुसत्या अवस्थेवरुनही ताजा आणि जून भाजीपाला केवळ नजरेने ओळखता येतो.

●मात्र खासकरुन फळभाजी घेतांना उदा. गवार, वांगी, कारले, गिलके-दोडके (शिरोळे-घोसाळे) अथवा इतर यांची नेहेमीप्रमाणे जी उंची असते त्यापेक्षा अधिक उंचीचे दिसल्यास रासायनिक औषधे वा इंजेक्शन्स देवून त्यांना अत्यंत कमी कालावधीत भयानक वाढ देण्यात आलेली आहे हे निश्चितच समजावे. अशा अधिक प्रमाणातील रासायनिक पदार्थ वापरुन भाज्यांची केलेली कृत्रिम वाढसुध्दा आरोग्यास अत्यंत अपायकारक असते.

●सर्व प्रकारच्या भेसळयुक्त पदार्थांना टाळण्यासाठी, विविध अन्न-पदार्थांमध्ये कोणत्या पदार्थाची भेसळ असू शकते व ही भेसळ कशी ओळखावी या बाबत माहिती प्रत्येकाने घ्यायलाच हवी.

●कुठल्याही प्रकारच्या अन्न-पदार्थांमध्ये भेसळ असल्याची शंका आल्यास स्थानिक अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधक कार्यालयाकडे त्वरीत तक्रार नोंदवावी.

●आता हे सर्व quality and fresh food बद्दल झाले. आरोग्याचा विषय इथेच थांबत नाही तर आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम, मैदानी खेळ, योगासने, योगाभ्यास आदि आवश्यक आहेच.

●शारिरीक, घराची व परिसराची स्वच्छता ही तेवढीच गरजेची आहे.

●शारिरीक तंदुरुस्तीसोबतच मानसिक आरोग्य जपणे आवश्यक आहे



 ********************************

*_०७ एप्रिल - जगातील पहिली काडेपेटी_*

********************************


७ एप्रिल १८२७


आजच्याच दिवशी १८२७ साली बाजारात आली जगातील पहिली काडेपेटी.


इवलीशी काडेपेटी आली कुठून माहितीय का? अग्नी पेटवण्यासाठी चकमक वापरण्याच्या किचकट मार्गातून सुटका करायला जॉन वॉकर या ब्रिटिश शास्त्रज्ञानं काड्यापेटीचा शोध लावला. माचिस बाजारात आली त्याला आज तब्बल १९२ वर्षं झाली. या मेणाच्या पृष्ठभागावर घासुन ज्वाला निर्माण करणारी काडेपेटी जॉन वॉकरने तयार केली, अन ७ एप्रिल १८२७ ला पहिली काडेपेटी जगाच्या बाजारात आली. दैनंदिन जीवनात गरजेची ठरलेल्या काडीपेटीचा जगभर वेगानं प्रसार झाला. आजही बहुतेकांच्या किचन ओट्यावर ती हाताशीच ठेवलेली असते. ८० च्या दशकात काडेपेटीच्या वैविध्यपूर्ण कव्हर्सचा संग्रह करायचा अनेक जणांना नाद होता. त्यातीलच एक मुलुंडच्या सज्जनवाडीत राहणाऱ्या नंदकुमार देशपांडे यांनी गेल्या ४० वर्षांपासून हा छंद जोपासलाय. त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या तब्बल सहा हजार काडेपेट्या जमवल्यात. त्यात आपल्याकडच्या सर्वात जुन्या 'अनिल' ब्रॅण्डसोबतच अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, अझरुद्दीन, श्रीदेवी यांची चित्र असलेल्या वैशिष्ठयपूर्ण माचिस आहेत. 


स्वीडन, इंडोनेशिया, पाकिस्तान, चीन, जपान, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रिया या देशातल्या त्रिकोणी, चौकोनी, आयताकृती अन लिपस्टिक, बॅटरी सेलच्या आकाराच्याही काडेपेट्या त्यांच्या संग्रहात आहेत. त्यातल्या रिकाम्या काड्यांतून आयफेल टॉवरची प्रतिकृती उभारून एका प्रदर्शनात त्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं. आपल्याकडं शिवकाशीला काडेपेटी उत्पादनाचाही मोठा उद्योग आहे. केरळातल्या कोचि मध्येही हे कारखाने आहेत. हजारो लोकांचं पोट या उद्योगावर अवलंबून आहे. अलीकडच्या काही वर्षांत गॅस लायटर्सचं प्रस्थ बरंच वाढलं. धुम्रपानविरोधी मोहीम जगभर सुरू झालीय. त्याचा परिणाम काडेपेटी उद्योगांवर झालाय. वार्षिक तब्बल दीड हजार कोटींची उलाढाल असलेल्या या उद्योगात दहा वर्षांत पंचवीस टक्क्यांनी घट झालीय. माचीस बनवणारे ८ हजार कारखाने बंद पडलेत. पूर्वी आपण पाकिस्तान आणि आफ्रिकेतही माचिस निर्यात करायचो. आता पाकिस्तानमध्ये हा उद्योग सुरू झालाय. त्यांच्या स्वस्त दरामुळं आफ्रिकन देश त्यांच्याकडून काडेपेट्या आयात करतात.


आपल्याकडं 'विमको' ही काडेपेटी उत्पादन करणारी प्रमुख कंपनी. त्यांचे एम, आय नो, होम लाईट, शिप हे माचीस ब्रँड सर्वांनीच कधी ना कधी हाताळलेत यात शंकाच नाही.

संकलन गजानन गोपेवाड 





संदर्भ : इंटरनेट


********************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...