शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

काजण्या का होतात?

 ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

संकलन गजानन गोपेवाड

══════════════════════

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═══════════════════════

📙 *कांजण्या का होतात ?* 📙

*****************************

दहा वर्षे वयापर्यंत तुमच्यापैकी सगळ्यांनाच कांजण्या होऊन गेल्या असतील. आठवत नसेल तर आईला विचारा ! हा अत्यंत सौम्य स्वरूपाचा आजार असून, तो व्हेरिसेला झोस्टर नावाच्या विषाणूंमुळे होतो. हा रोग श्वासावाटे एकापासून दुसऱ्याला होतो. या रोगात सुरुवातीला बारीक ताप येतो. थकवा जाणवतो व हात पाय दुखतात. त्यानंतर अंगावर पुरळ येते. हे पोट, पाठ या भागात जास्त प्रमाणात येते, तर चेहरा व हातपाय यावर नंतर व कमी प्रमाणात येते. हा रोग सात आठ दिवसांत आपोआप बरा होतो. त्यासाठी विशिष्ट असा उपचार करण्याची गरज पडत नाही. फक्त तापासाठी पॅरासिटामॉल घेतले तरी चालते. प्रौढ व्यक्तींमध्ये हाच रोग 'नागिण' या स्वरूपात आढळून येतो.


अत्यंत सौम्य असणाऱ्या ह्या रोगात कधीकधी जीवाणूंच्या संसर्गामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व कमी झालेल्या व्यक्तींमध्ये न्यूमोनिया, मेंदूज्वर असे गंभीर रोग होऊ शकतात. अर्थात याचे प्रमाण फारच कमी असते. त्यामुळेच कांजण्या या रोगाला फारसे गंभीर मानण्यात येत नाही. एकदा हा रोग होऊन गेला की परत होत नाही.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

मनोविकास प्रकाशन


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════


═══════════════════════

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...