मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा* 

*व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-* 

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते:
व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते. अशा व्यक्तींचे जीवन केवळ दीर्घच असते असे नव्हे तर ते तुलनात्मकरित्या वेदनांपासून मुक्त आणि अनेक प्रकारच्या पीडांपासून दूर असते.

2) नितळ त्वचा, चमकदार केस आणि निरोगी नखे:
व्यायाम करणार्‍यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत असतो आणि त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम शरीरावर होतातच पण ते त्वचा, केस, आणि नखांवर प्रतिबिंबित होत असतात. नियमित व्यायाम करणार्‍यांचे केस भराभर वाढतात व त्याच्यावर उत्तम चकाकी असते. अशा व्यक्तींची त्वचा नितळ असते आणि नखांची वाढसुध्दा निरोगीपणे होत असते.

3) शरीरातील अवयवांचा एकमेकांशी उत्तम समन्वय साधला जातो:
आपल्या शरीरामध्ये मेंदू, हृदय, हात, पाय इत्यादी अनेक अवयवांची जोडी (दोन) असते – डावे आणि उजवे. त्यांच्यात जेवढा चांगला समन्वय असेल तेवढा जीवनाचा दर्जा चांगला असतो. नियमितपणे व्यायाम केल्याने डाव्या आणि उजव्यामध्ये चांगला समन्वय साधला जातो.

4) शरीराची कार्यक्षमता वाढते:
नियमितपणे व्यायाम करणार्‍यांच्या शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते आणि त्यामुळेच त्यांची उर्जा पातळी चांगली असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा कितीही भार पडला तरी तो त्यांना सहन होतो आणि ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात.


5) मन सकारात्मक राहते:
व्यायाम करणार्‍यांची विचार करण्याची पध्दत सकारात्मक असते त्यामुळे त्यांची उत्पादकताही चांगली असते. कमी उर्जेमध्ये आणि कमी वेळेमध्ये उत्तम काम करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झालेली असते. कोणत्याही गोष्टीचा आळस येत नाही. उत्साहवर्धक वाटते.

गणित प्रश्न मंजुषा

 *🔔गणितोत्सव निमित्त प्रश्नमंजुषा🔔🔔*

📚📚📚📚📚📚📚

*(१)लहानात लहान दोन अंकी संख्या कोणती ?*

*(२) मोठ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती ?*

*(३) लहानात लहान एक अंकी नैसर्गिक संख्या कोणती ?*

*(४) मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या कोणती ?*

*(५) लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती ?*

*(६) मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती ?*

*(७) मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती ?*

*(८) एक शतक म्हणजे किती एकक  ?*

*(९) १ ते १०० पर्यंत ० (शून्य ) हा अंक दशकस्थानी किती वेळा येतो ?*

*(१०)  १ ते १०० पर्यंत ० (शून्य ) हा अंक किती वेळा येतो ?*

*(११) १  ते  १०० पर्यंत १ हा अंक किती वेळा येतो ?*

*(१२)  १ ते १०० पर्यंत  २ ते ९ अंक  हे प्रत्येकी किती वेळा येतात ?*

*(१३) १ ते १०० पर्यंत १ हा अंक शतकस्थानी किती वेळा येतो ?*

*(१४) १ ते १०० या संख्यांमध्ये एक अंकी संख्या एकूण किती आहेत ?*

*(१५) १ ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी संख्या एकूण किती आहेत ?*

*(१६) १ ते १०० या संख्यांमध्ये तीन अंकी संख्या एकूण किती आहेत ?*

*(१७) १ दशक म्हणजे किती एकक ?*

*(१८)  १ शतक म्हणजे किती दशक ?*

*(१९)   १ ते १० पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?*

*(२०)  १ ते १०० पर्यंत ९ हा अंक किती वेळा येतो ?*

*(२१) १ते १० संख्यांची बेरीज किती?*

*(२२) ३१ते ४० संख्यांची बेरीज किती ?*

*(२३)१ ते १०० संख्यांची बेरीज किती ?*

*(२४)५७ ते ६६ संख्यांची बेरीज किती ?*

*(२५) १ ते १०० मध्ये एकूण सम संख्या किती आहेत ?*

*(२६)१ ते १०० मध्ये विषम संख्या किती आहेत ?*

*(२७)१ ते २० मधील सम संख्यांची बेरीज किती ?*

*(२८) १ ते ४० मधील विषम संख्यांची बेरीज किती ?*

*(२९)१ ते १०० मध्ये वर्ग संख्या किती आहेत? व कोणत्या?*

*(३०) १ ते १०० मध्ये त्रिकोणी संख्या किती आहेत?व कोणत्या?*

*(३१) १ ते १०० मध्ये मूळ संख्या किती आहेत ? व कोणत्या ?*

*(३२)१ ते १०० मध्ये संयुक्त संख्या किती आहेत ?*

*(३३) कोणती संख्या मूळसंख्या व संयुक्त संख्या नाही ?*

*(३४) कोणती मूळसंख्या सम संख्या आहे?*

*(३५) एक अंकी एकूण संख्य किती आहेत?*

*(३६) दोन अंकी एकूण संख्या किती आहेत ?*

*(३७) तीन अंकी एकूण संख्या किती आहेत ?*

*(३८) चार अंकी एकूण संख्या किती आहेत?*

*(३९) पाच अंकी एकूण संख्या किती आहेत ?*

*(४०) एक अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ?*

*(४१) दोन अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ?*

*(४२)तीन अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ?*

*(४३) चार अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ?*

*(४४) पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ?*

*(४५) एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?*

*(४६) दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?*

*(४७) तीन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?*

*(४८) चार अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?*

*(४९) पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?*

*(५०) १ ते १०० मध्ये जोडमुळ संख्या किती आहेत ?*

*(५१) सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे ?*

*(५२)सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती आहे ?*

*(५३)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे ?*

*(५४) सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती आहे ?*

*(५५) सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती आहे ?*

*(५६) सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती आहे ?*

*(५७)१५४ ते १६३ मधील संख्यांची बेरीज किती ?*

*(५८)७ ची क्रमवार संख्या कोणती आहे ?*

*(५९) ७९ च्या मागील संख्या कोणती आहे ?*

*(६०)३९९ च्या पुढील संख्या कोणती आहे ?*

*(६१)मूळ रोमन संख्या किती ? व कोणत्या आहेत?*

*(६२)१ ही संख्या रोमनसंख्या चिन्हात काशी लिहिली जाते ?*

*(६३) ४० ही संख्या रोमनसंख्या चिन्हात कशी लिहितात ?*

*(६४) ९० ही संख्या रोमनसंख्या चिन्हात कशी लिहितात ?*

*(६५)७८९ ही संख्या रोमनसंख्या चिन्हात कशी लिहितात ?*

*(६६)CMLXXXIX ही रोमनसंख्या कोणती संख्या दर्शविते ?*

*(६७)७५ चा वर्ग किती ?*

*(६८) २९ चा वर्ग किती ?*

*(६९) ५६ चा वर्ग किती ?*

*(७०)१ मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?*

*(७१)१ फूट म्हणजे किती इंच ?*

*(७२) १ यार्ड म्हणजे किती फूट ?*

*(७३)  १ गुंठा म्हणजे किती चौरसफुट?*

*(७४)१ एक्कर म्हणजे किती आर ?*

*(७५)१ मिनिटांचे सेकंद किती ?*

*(७६)१तासाचे सेकंद किती ?*

*(७७) १ दिवसाचे तास किती ?*

*(७८)१ आठवड्याचे दिवस किती ?*

*(७९)१ वर्षाचे दिवस किती ?*

*(८०)लीप वर्षाचे दिवस किती ?*

*(८१) २९ दिवस कोणत्या महिन्यात येतात ?*

*(८२)१ वर्षाचे आठवडे किती ?*

*(८३)१ तप म्हणजे किती वर्षे ?*

*(८४)१ किलो म्हणजे किती ग्रॅम ?*

*(८५)१ क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम ?*

*(८६)१टन म्हणजे किती क्विंटल ?*

*(८७)१ ग्रॅम म्हणजे किती डेसिग्रॅम ?*

*(८८)१ लीटर म्हणजे किती सेंटीलीटर ?*

*(८९) पाऊण किलोग्रॅम म्हणजे ग्रॅम ?*

*(९०) सव्वा किलो म्हणजे किती ग्रॅम ?*

*(९१)साडे सात किलोमीटर म्हणजे किती मीटर ?*

*(९२)१ डझन म्हणजे किती वस्तू(नग)?*

*(९३) १ रिम म्हणजे किती कागद ?*

*(९४)१ रिम म्हणजे किती दस्ते ?*

*(९५)२५४०७ या संख्येत ५ ची स्थानिक किंमत किती ?*

*(९६) २५४०७ या संख्येत ५ ची दर्शनी किंमत किती ?*

*(९७)५८६ X ९९९ = किती ?*

*(९८)७ च्या पाढयातील  संख्यांची बेरीज किती ?*

*(९९)पंचाकोनाच्या  सर्व कोनांची बेरीज किती ?*

*(१००)३,२,७,४ हे अंक* *एकदाच वापरून तयार होणाऱ्या ४अंकी संख्यांची बेरीज किती?*                       

➖➖➖➖➖➖➖➖संकलन, गजानन गोपेवाड 


 

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०२५

वाचन प्रेरणा दिवसानिमित्त ऑनलाइन प्रश्नमंजुषा अग्निपंख शैक्षणिक समूह महाराष्ट्र राज्य आयोजित करणार आहे तरी इच्छुक शिक्षकांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावर व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात यावे हि विनंती आहे. गजानन गोपेवाड

💥अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य💥 
🙏आदरणीय सर्वाना नमस्कार 🙏

भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम सरांचा जन्म दिवस हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून आपण सादर करतोच. तेव्हा डॉ ए पी जे अब्दुल कलाम सरांचे देशाप्रती योगदान अनमोल आहे. तेव्हा आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आहे.
आपण आपल्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना सदर आँनलाईन प्रश्न मंजुषा शेअर करावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून. त्यांना महान डॉ ए पी जे अब्दुल कलाम सरांचे कार्य माहिती व्हावी. आपण सहकार्य करावे ही विनंती केली आहे.
🏆अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य 🏆
................................................................................................
https://quizzory.in/id/68edf2647f7fedac90bfdbd3
...............................................................................................

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...