══════════════════════
संकलन,,, गजानन गोपेवाड
══════════════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
*📙शरीर कोणत्या मूलद्रव्यांचे बनलेले असते?*
शरीरात प्रथिने, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, पाणी क्षार असतात. १७% प्रथिने तर ७% क्षार असतात. पिष्टमय पदार्थ व स्निग्ध पदार्थात कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये असतात. प्रथिनांमध्ये या खेरीज नायट्रोजन व सल्फर ही द्रव्ये असतात.
मानवी शरीरात सुमारे ५० रासायनिक द्रव्ये वा धातु सापडतात. यात कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम. पोटॅशियम, मॅग्नेशियम ही प्रमुख द्रव्ये होत. याखेरीज दररोज काही मि. ग्रॅ. पेक्षा कमी प्रमाणात लोह, आयोडिन, फ्लोरिन, झिंक, कॉपर, कोबाल्ट, क्रोमियम, मॅग्नीज, मॉलिब्डेनम, सेलेनियम, निकेल, टीन व व्हेनेडियम हे धातूही आवश्यक असतात. यांच्याखेरीज शरीरासाठी नेमके कार्य काय हे ज्ञात नसलेली शिसे, पारा, बेरियम, बोरॉन व ॲल्युमिनियम अशी द्रव्यही शरीरात असतात.
शरीरात १२०० ग्रॅम कॅल्शियम, ४०० ते ७०० ग्रॅम फॉस्फरस, १०० ग्रॅम सोडियम, २५० ग्रॅम पोटॅशियम, तीन ते चार ग्रॅम लोह तर दोन ग्रॅम झिंक असते.
*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून
स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा