*सप्तरंग काव्यस्पर्धा*
*वऱ्हाडी कविता -*
*शिर्षक - व्यथा शेतकऱ्याची*
काय सांगु तुले बा
व्यथा शेतकऱ्याची
अन कास्तकाराची
गाथा गरीबीची... !!
सरकी खत अन
बी मायगाच
मायगाच्या जमान्यात
ससत कवा वायाच... !!
मनामदी माह्या बाप
एकच गिरवतो कित्ता
मिरगाच्या पावसाची
लागली चिंता... !!
बंदयाच आवडात
सरकी का सोयाबिन
तूरच पेराव मनतो
साऱ्या वावरातीन... !!
अमदाच्या सालात
गराडान घातल थैमान
मिरगाचा पावस
मावरच लई बैमान... !!
म्या फाडतो आता
सारे पेरणी डोबणीले
येसीन त ये बा नायत
येजो सरणाले.... !!
जेथ पाव तेथ पैसा
अदल्याचा बजार
चोपणले वाई कराले
पुडल्या सालात दाहजार... !!
अन्नाचा घास नाय
भेटत जीवाले
अमदाच साल सारे
पाये आभायाले.... !!
गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा