बुधवार, १६ जून, २०२१

मित्रप्रेम कविता) :गजानन गोपेवाड

 *मित्र वेडेच असतात !!*


केंव्हाही येतात केंव्हाही जातात

मनाची दारं उघडीचं टाकतात  

आपल्या सुखात खळखळून हसतात

आपल्या दुःखात पिळवटून रडतात

                  मित्र   वेडेच असतात.!!


 जवळची नातीसुद्धा परकी होतात 

 दिलं ,घेतलं हिशाोबातअडकतात

 तिथं हेच सावरायलाच असतात

 सावरलंकी अलगद बाजुलाही सरकतात

                 मित्र  वेडेच असतात.!!


रक्ताच्या नात्याचे नसतात .

अग्निसमक्ष जोडलेले नसतात

 एखाद्या अवचित हळव्या क्षणी

 अद्वैत साधून मनात शिरतात

                 मित्र वेडेच असतात.!!


  सारे माझे तयांना ठाऊक असते

  सारे तयांचे मला ठाऊक असते

  कोठे काय बोलायचे उमजलेले असते

  काय ओठांच्या आत हवे माहित असते.

              मित्र वेडेच असतात.!!


 बालपणीचे निरागस बंध

 तारुण्यातील उनमत्त  गंध

 प्रौढपणीचा समजदार संग

 अवघे आयुष्य माझे रंगारंग 

              मित्र  वेडेच असतात.!!


मैत्री  खरंच अशी अनमोल असते. 

प्रत्येक जीवाने अनुभवायाचीअसते.

पण....पण.....

खुळ्या सोनेरी उन्हासारखी

आयुष्यात मैत्री जुळावी लागते.

               मित्र वेडेच असतात !!


असे मित्र आणि  मैत्री हि कोठेही विकत मिळत नाही , तेंव्हा आपल्या जवळच्या मित्रांना जपा 

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...