🌹अवकाळी पाऊस 🌹
आज अचानक त्याच आगमन
मोठया झपाट्यानं झालं होत
गारीच,वादळाचआणि विजेचा चमकिन
ढगाच ढोल वाजत आलं होत
असं कधी तो नेहमी याच
आज मात्र जरा वेगळं रूप पाहिलं
रागात असावा जणू काही
सार काही हानी हानी करून गेलं
आठवणीच ठरल तो पाऊस
सर्वांच्या मनी भीती दाटविणारा
काळ कसा येतो जणू
सार जीव घेऊ पाहणारा
त्याला आवर घालणार
कुणी तरी आहे का
त्याला शांत करण्याची
बळ कुणात नाहीका
हात जोडूनि मी विनवणी केली
तरी राग त्याच्या प्रत्येकावर होता
मानवाणीच केल सार काही
असा ओरडून सांगत होता
माझ्या जीवाला भावला
तो वेडा पिसा पाऊस जणू
त्याच्या रागभरात भावना
आणि काय मी जाणू
गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा