विषय : - बालदिनानिमित्त चित्र काव्यलेखण .
दि . १५ / ६ / २०२१ .
शिर्षक : - *अरे अरे दैवा ...*
अरे अरे दैवा आमच्या
हातुन काय पाप घडले ?
नशिबी बालपणीच कष्ट
करण्याला भाग पडले .
श्रीमंताच्या या मुलांना
भारी गणवेश बुट असे
उन्हाला कहार झालायं
अनवाणी पाय भाजतसे
शिक्षणाची ओढ फार
शिकावं वाटतं आम्हा
कुटूंबाच्या भाकरीचा
पडतोच प्रश्न हा पुन्हा
प्लास्टिक अणं भंगार
जमवण्याला भटकंती
चार पैसे मिळवता मग
वाटतेच मनाला शांती
हे विश्वंभरा कृपा करावी
प्रार्थना करतोत मनोमनी
दुःख असे कोणाच्याही
वाटयाला न येवो जिवनी .
कवि :)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा