🌦️*आठवणीतला पाऊस*🌦️
🐛🍃☔☂️🌲🌱🐛
_________________________
घोंगवणाऱ्या माट्यासह
सुसाटयाचा वारा
उंच उंच उडे गगनी
पाला आणि पाचोळा
वेग वाऱ्याचा
पडझड पानांची
घराकडे धाव
राबणाऱ्या पावलांची
अचानक गडगडाट
कडकडाट विजांचा
रिमझिम रिमझिम
पाऊस पडू लागे थेंबाचा
पावसाच्या थेंबानी
धरणी झाली चिंब
मातीच्या सुगंधाने
उन्मादला सांड
सुखावली वसुंधरा
बहरले सारे रान
वनराईत मयुर नाचे
पिसारा फुलवून छान
डराव डराव करी
बेडूक बिळात
बळीराजाची तिफन
चाले शेतात
आवासून चातकाने
पाहिलेली वाट
पहिला थेंब गिळून
सुरू झाली बरसात
चहूकडे बहरले रान
झाले पशु,पक्षी तृप्त
उन्हाची ल्हाई संपली
पडता पहिला नक्षत्र
सुगी झाली सुरू
जनमनाची लगाबगाई
पहिला पाऊस पडला
गड्या चाला घाई घाई
समज आली तेव्हाचा
हा आठवणीतला पाऊस
आली सर बिलगून
झाली भिजण्याची हाऊस
*🐸🪳🌱🪴🎋🌴🌳
कवि, गजानन गोपेवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा