************************************
*२३ सप्टेंबर - भौतिकशास्त्रज्ञ डॉ. राजा रामण्णा यांचा स्मृतिदिन*
************************************
जन्म - २८ जानेवारी १९२५
*स्मृती - २३ सप्टेंबर २००४*
भारतीय अणुकेंद्रकीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ.राजा रामण्णा यांचा आज स्मृतिदिन.
विख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ.राजा रामण्णा यांचा जन्म तुंकुर (म्हैसूर संस्थान) येथे २८ जानेवारी १९२५ साली झाला. शाळेपासूनच त्यांना साहित्य व संगीतात रस होता. १९४७च्या सुमारास ते मद्रास ख्रिश्चन कॉलेज मधून भौतिकशास्त्रात बी.एस्सी. आणि शास्त्रीय संगीतात बी.ए. झाले.
१९५४ साली, लंडन विद्यापीठातून अणुभौतिक पीएच.डी. मिळवली. तेथील आण्विक ऊर्जा संशोधन संस्थेतून ‘आण्विक इंधन व अणुभट्टी’ बाबत ते तज्ज्ञ झाले.
भारतात परतल्यावर BARC च्या (मुंबई) आण्विकशस्त्र प्रकल्पामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून डॉ.रामण्णा काम करू लागले. १९५८ साली, त्या कार्यकमाचे ते प्रमुख संचालक झाले. पोखरणच्या (राजस्थान) सैनिकीतळावर भूमिगत चाचण्यांसाठी त्यांनी बांधकाम सुरू केले.
इंधनाबाबतचा रचनात्मक कार्यक्रम १९७०च्या सुमारास डॉ. रामण्णांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला. पहिले अण्वस्त्रयान रामण्णांच्या पथकाने मुंबईहून पोखरणपर्यंत गुप्तता बाळगून वाहून नेले.
मे १९४७ च्या एके सकाळी, अण्वस्त्र चाचणी झाली. अण्वस्त्राचे सांकेतिक नाव होते, ‘हसरा बुद्ध'. त्या वर्षीचा भारताचा नागरी सन्मान त्यांना लाभला.
१९८० नंतरच्या दोन दशकात, संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे (डीआरडीओ) डॉ.रामण्णा संचालक होते. १९९० साली ते पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री होते. १९९७ ते २००३ या कालावधीत डॉ. रामण्णा राज्यसभेच खासदार होते.
१९९१ साली ‘यिअर्स ऑफ पिजग्रिमेज’ हे त्यांचे आत्मचरित्र आणि १९९३ साली पौर्वात्य व पाश्चात्य संगीतरचना’ ही त्यांनी लिहिलेली पुस्तके डॉ. रामण्णांचे विचार जगापुढे प्रकाशित करून गेले.
२००० साली ते संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार होते. अशातऱ्हेने अखेपर्यंत कार्यरत राहून, डॉ. राजा रामण्णा यांनी २३ सप्टेंबर २००४ रोजी जगाचा निरोप घेतला. देश रसिक संरक्षण शास्त्रज्ञाला मुकला.
डॉ.राजा रामण्णा यांना फाय फाउंडेशन, इचलकरंजी यांच्या तर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏
संकलन गजानन गोपेवाड
उमरखेड जिल्हा- यवतमाळ
४४५२०६
********************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा