************************************
*९ सप्टेंबर - 'अमूल'चे संस्थापक व्हर्गिस कुरियन यांचा स्मृतिदिन*
************************************
जन्म - २६ नोव्हेंबर १९२१
(केरळ)
*स्मृती - ९ सप्टेंबर २०१२*
*(गुजरात)*
त्यांना दुध बिलकुल आवडत नव्हते, पण त्यांनी दूध उद्योगात 'अमूल' क्रांती घडविली अश्या व्हर्गिस कुरियन यांचे आज पुण्यस्मरण.
वर्गीज कुरियन यांचा जन्म ब्रिटिश भारतातील (वर्तमान केरळ राज्यातील) कोझिकोड गावात २६ नोव्हेंबर १९२१ रोजी झाला.
वर्गीज कुरियन १९४० साली मद्रास येथील लायोला कॉलेज येथून पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठातून बी.ई. (यंत्र अभियांत्रिकी) ही पदवी मिळवली. त्यापुढे वर्गीज कुरियन यांनी टाटा स्टील टेक्निकल इन्स्टिट्यूट, जमशेदपूर येथूनही पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी व्हर्गिस कुरियन सरकारी शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात दाखल झाले. तेथे ते विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण होत एम.एस्सी. (यंत्र अभियांत्रिकी) झाले.
ते म्हणत दूध मला आवडत नाही आणि त्यामुळे ते मी पीत नाही, इतक्या प्रामाणिकपणे कुरियन आपले मत नोंदवीत. पण म्हणून दूध पूर्णान्नाच्या जवळ जाणारे आहे, हे ते नाकारत नसत.
दुधाला भारतीय संस्कृतीत, समाजजीवनात विलक्षण महत्त्व आहे आणि त्यास योग्य बाजारपेठ मिळवून दिली तर देशातील कोटय़वधी ग्रामीण महिलांना स्थिर रोजगाराचे कायमस्वरूपी माध्यम उपलब्ध होईल याची डोळस जाण त्यांना होती. भारतात कितीही औद्योगिक प्रगती झाली तरी देशात रोजगाराचे मुख्य साधन हे कृषीविषयक उद्योग हेच असणार आहेत आणि १८ ते ५५ या वयोगटात असणाऱ्या कोटय़वधी महिलांना दुग्धजन्य पदार्थाचा व्यवसाय हा उपजीविकेचा स्वयंपूर्ण मार्ग असणार आहे, असा त्यांचा सिद्धांत होता. याच डोळस अभ्यासाने कुरियन यांना आयुष्यभराचे श्रेयस आणि प्रेयस मिळवून दिले.
केरळातल्या आताच्या कोझिकोड येथे अल्पसंख्य अशा सीरियन ख्रिश्चन कुरियन कुटुंबात जन्माला आलेल्या व्हर्गिस याने देश स्वतंत्रही झाला नव्हता तेव्हा एक स्वप्न पाहिले व पुढे आयुष्यभर त्या स्वप्नाच्या परिपूर्तीचा ध्यास घेतला. त्यातूनच आकाराला आली अशिक्षित, मातृभाषेतच शिकलेला, उच्चशिक्षणापासून दुरावलेला भारत काय करू शकतो याची एक अद्वितीय अमूल प्रेमकहाणी; जिने पुढे शहरांपुरतेच मिरवणाऱ्या, उगाचच आंग्लाळलेल्या इंडियालाही झाकोळून टाकले. (अक्षय मोरे पाटील यांचे ब्लॉग मधून)
एका सकाळी फेरफटका मारताना शीतगृहात त्यांना एक कामगार दुधाचे कॅन उघडून दूध पिताना दिसला. दूध त्याच्या दाढीवरून ओघळत होते. डॉ. कुरियन दिसताच तो दचकला आणि अडखळत 'नाही, मी दूध पीत नाही' असे म्हणाला.
डॉ. कुरियन काहीही न बोलता मान फिरवून झर्रकन निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दररोज अर्धा लिटर दूध देण्यात यावे, असा आदेश दिला. जो कर्मचारी भुकेल्या पोटी एवढे दूध हाताळतो, त्याचा या दुधावर पहिला हक्क आहे व तो नाकारून चालणार नाही, असा डॉ. कुरियन यांनी विचार केला.
*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*
संकलन -)गजानन गोपेवाड
उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६
**********************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा