शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

अश्रु व घाम खारट का असतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📕 *अश्रू व घाम खारट का लागतात ?* 📕


घाम वा अश्रू खारट लागतात, याचा अनुभव तुम्हाला आलाच असेल. खूप रडल्यानंतर डोळ्यांतून काही अश्रू अश्रूपिंडातून नाकाच्या पोकळीत व तेथून घशात येतात. खारट चव लागते. घामातील मिठाची कल्पना तुम्हाला उन्हाळ्यांत येईल. उन्हाळ्यांत खूप घाम येतो. घामाने कपडे ओलेचिंब होतात. वाळल्यानंतर कपड्यावर घामाचे क्षारयुक्त डाग पडतात. कधी कपड्यांवर हात फिरवल्यास क्षाराचा थर लागतो.


शरीरातील पाणी व क्षार यांचा समतोल राखण्यासाठी घामाचा उपयोग होतो. डोळ्यांतील आवरण, नेत्रपटल हे भाग कोरडे होऊ नयेत; धूळ वगैरे गेल्यास ती वाहून डोळे स्वच्छ व्हावे, यासाठी अश्रू खूप उपयोगी ठरतात. अश्रु व घाम या दोहोंमध्ये सोडियम क्लोराईड हा क्षार असल्याने (मीठ म्हणजे सोडियम क्लोराईडच) ते खारट लागतात. हगवणीवर घरगुती उपाय म्हणून मीठ, साखर व पाणी यांचे द्रावण तयार करून ते पाजायला सांगतात. या द्रावणाची चव अश्रूंच्या इतकी खारट लागावी, असे सांगण्यात येते.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...