शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

लिओनार्ड आँयलर शास्त्रज्ञ

 *🗻🗻लिओनार्ड ऑयलर🗻🗻*

📐📐📐📐📐📐📐📐📐📐📐

*इतिहासातले एक सर्वोच्च गणितज्ञ, आणि भौतिकशास्त्रज्ञ*

🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋

*स्मृतिदिन - १८ सप्टेंबर १७८३*


लिओनार्ड ऑयलर (जर्मन: Leonhard Euler, १५ एप्रिल १७०७ - १८ सप्टेंबर १७८३) हे     

       स्विस गणिती जगाच्या इतिहासातले एक सर्वोच्च गणितज्ञ मानण्यात येतात.त्यांनी लिहिलेल्या गणितातल्या संशोधनपर लेखांनी ७५ जाडजूड ग्रंथ व्यापलेले आहेत. ते ७६ वर्षे जगले, पण त्यांच्या तरुणवयापासूनच त्यांची दृष्टी काही व्याधीने मंदावली होती. अविश्वसनीय पण सत्यस्थिती अशी की आपल्या वयाच्या ५९व्या वर्षी त्यांची दृष्टी अजिबात गेल्यानंतर त्यानी आपले गणितातले अर्ध्याहून अधिक संशोधनपर लेख रचले.

त्यांची बुद्धिमत्ता इतकी अलौकिक होती की गणितातल्या कूट समस्या ते मनातल्या मनात सोडवू शकत, आणि गरज पडली तर ते ५० दशांश अंकांपर्यन्तची आकडेमोड अचूक करू शकत.



विज्ञानातील योगदान

त्या काळी गणिताच्या निरनिराळ्या शाखांतील कार्य काहीसे अर्धवट व असंबंधित स्वरूपाचे होते. ऑयलर यांनी त्यांत एकसूत्रता आणून त्याला पद्धतशीर स्वरूप दिले. आजच्या महाविद्यालयीन गणितातील बराचसा भाग, ऑयलर यांनी २०० वर्षांपूर्वी लिहिला होता, तो तशाच स्वरूपात अद्यापही आहे.

गणितातील योगदान

प्राथमिक भूमितीपासून तो उच्च विश्लेषणापर्यंत अनेक चिन्हे, पदावल्या व प्रमेये ऑयलर यांच्या नावाने ओळखली जातात. e, ∏ व I (=√-1) ही चिन्हे त्यांनीच प्रचारात आणली व त्यांना जोडणारे e∏I + 1 = 0 व हे समीकरणही शोधून काढले. त्रिकोणमितीय फलनांचे सध्या वापरात असलेली संक्षिप्त चिन्हे वापरण्यास व या फलनांचे विश्लेषणात्मक विवरण करून त्यांचा संख्यात्मक गुणोत्तरे म्हणून उपयोग करण्यास त्यांनी प्रारंभ केला. तसेच एकरूप समीकरणांच्या साहाय्याने त्रिकोणमितीय फलनांचे असत् घातांकांशी (ज्यात i या संख्येचा समावेश आहे) असणारे संबंध दाखविण्याचे कार्यही त्यांनी केले. घातीय स्वरूपात मांडून लॉगरिथमांची मूल्ये सुलभपणे काढता येतात व प्रत्येक संख्येला असंख्य स्वाभाविक लॉगरिथम असतात, असे त्यांनी सिद्ध केले.

कार्य व सन्मान

बीजगणित, तसेच ज्योतिषशास्त्र व भौतिकी या विषयांवरील त्यांचे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या सर्व कार्यांचे संकलन करण्याचे काम १९११ पासून लायपझीग येथे व १९४२ नंतर लोझॅन येथे चालू आहे. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो होते. पॅरिस व सेंट पिट्सबर्ग येथील अकॅडेमींतर्फे त्यांना अनेक सन्मान देण्यात आले. ते सेंट पिट्सबर्ग येथे मृत्यू पावले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...