रविवार, १९ सप्टेंबर, २०२१

डॉ एनी बेझंट

 ***********************************

*२० सप्टेंबर - डॉ. अॕनी बेझंट स्मृतिदिन*

***********************************


   जन्म - १ आॕक्टोबर १८४७ 

*स्मृती - २० सप्टेंबर १९३३*


जन्माने ब्रिटिश असूनही मनाने भारताशी व भारतीय तत्वज्ञानाशी जोडल्या गेलेल्या अॕनी बेझंट यांचा आज स्मृतिदिन.


अॕनी बेझंट बालवयातच भारतीय तत्वज्ञानाकडे ओढल्या गेल्या. शाश्वत सत्याचा मार्ग शोधायचा तर प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचाच आधार घ्यायला हवा, असे त्या मानीत असत.


तत्वज्ञानाच्या अतीव ओढीमुळेच त्या १८९३ मध्ये भारतात आल्या व भारताच्याच झाल्या. इतक्या की त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतात चालू असलेल्या आंदोलनातही भाग घेतला. १९१५ ला कोलकत्यात भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या.

लोकमान्य टिळकांनी १९१६ मध्ये होमरुल चळवळ सुरू केली. तिला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. ॲनी बेझंट सुद्धा या चळवळीत जोमाने उतरल्या.


हिंदू व बौद्ध तत्वज्ञानाचा अॕनींवर विशेष प्रभाव होता. *'मी जन्माने ख्रिस्ती व मनाने हिंदू आहे',* असे त्या म्हणत. आपल्या तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी 'थिआनॕसाॅफिकल सोसायटी'ची स्थापना केली. जागतिक थिआनॕसाॅफिकल संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.


ज्येष्ठ तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे ॲनी बेझंट यांच्या बरोबर जिव्हाळ्याचे संबंध होते. ॲनी त्यांना 'मानसपुत्र' मानीत. कृष्णमूर्ती आपल्या प्रवचनांत वारंवार ॲनींचा 'मदर' असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करत.


विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी कुटुंब नियोजनाचे महत्व ओळखले होत्या. त्यांनी 'फ्रुट्स आॅफ फिलाॅसाॅफी' हा याच विषयावर प्रबंध लिहिला. त्यामुळे ख्रिस्ती पुराणमतवादी खवळले. ॲनींना कोर्टात खेचण्याचे आले. ॲनींना सहा महिन्यांची शिक्षा झाली पण वरच्या कोर्टात ती रद्द झाली.


ॲनी बेझंट यांचे २० सप्टेंबर १९३३ रोजी निधन झाले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

*************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...