सोमवार, ५ जुलै, २०२१

बिनधास्त जगा

 *बिनधास्त जगा मित्रांनो*

●एकदा का *चाळिशी* पार केली की "जास्त शिकलेला" आणि "कमी शिकलेला" दोघेही सारखेच ...

(कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल)


● *पन्नाशी* नंतर तर "सुंदर" आणि "कुरूप" हा भेदभावच नष्ट होतो....दोन्ही सारखेच 

(कोण कितीका सुंदर असेना या वयात सुरकुत्या, डोळ्यांभोवतालची काळी वलये लपता लपत नाही )


● *साठी* नंतर तर "मोठी पोस्ट" आणि "लहान पोस्ट" असेही काही उरत नाही....दोन्ही सारखेच

(निवृत्तीनंतर तर ऑफीसातला प्यूनदेखील साहेबाला बघायचे टाळतोच.)


● *सत्तरी* पार केल्यानंतर "मोठे घर" आणि "लहान घर" असा विचार सुद्धा मनात येत नाही....दोन्ही सारखेच

(सांधेदु:खी बळावून हालचाल करणे मुश्किल झाले कि बसण्यापूर्ती जागा असली तरी पूरे.)


● *ऐंशी* नंतर गाठीशी "भरपूर पैसा" असला काय अन् नसला काय.... दोन्ही सारखेच

(जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे अन् कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न ऊरतोच )


●नशीबाने *नव्वदी* पार केली (अभिनंदन) तर "झोपणे" आणि "उठणे" यांत सुद्धा फरक राहत नाही...दोन्ही सारखेच

(कारण उठून बसल्यावर आता करायचे काय हा गहन प्रश्न उरतोच)


अजुन *शंभरी* पार करायची ईच्छा आहे का ?


*जीवन साधे-सरळ-सोपे आहे.आनंदाने जगा...!*


उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडवल्याचा आइन्स्टाइनचा आव आणि भाव आणू नका.

मानसा पेक्षा सावली 

मोठी दिसली की,

     "समजावे"

संध्याकाळ जवळ

आली आहे.


*एक लक्षात ठेवा...!*


*लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत तेव्हा निर्भेळ आनंद लुटा, हसा.*


 *स्वतःसाठी काही वेळ तरी जगायला शिका, कारण......* 


 *मनुष्य जन्म पुन्हा नाही.*

 *आयुष्य खुप सुंदर आहे.*

*आनंदी राहा आनंदी जगा.*


*सुंदर दिवसाच्या आनंदी शुभेच्छा.*

लेखन, गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...