*🖱️🖱️डगलस एंगलबर्ट🖱️🖱️*
🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️
*🖱️संगणक माउस चे संशोधक🖱️*
🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️
*स्मृतिदिन - २ जुलै २०१३*
🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️
कॉम्पुटर माउस चे शोधक डगलस एंगलबर्ट यांचा आज स्मृतिदिन.
सगळ्याच माणसांना स्वप्न पडतात. पण जी माणसं स्वप्न पाहतात, ती स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा ध्यास घेतात आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आयुष्य वाहून घेतात. त्यांच्यामुळे प्रगतीचे नवे क्षितीज गाठले जाते, असीम शक्यतांचा एक नवा अवकाश खुला होतो.
आपल्या टेबलावरील संगणकाच्या मॉनिटरशी आपल्या हाताची आणि परिणामी मनाची, मेंदूची, विचारांची नाळ जुळवणारे जे ‘माउस’ नावाचे उपकरण आज आपल्या सवयीचे, परिचयाचे झाले आहे
त्या माउसचा १९६३ मध्ये शोध लावणारा डगलस एंगेलबर्ट असाच स्वप्ने प्रत्यक्षात आणू पाहणारा द्रष्टा संशोधक होता.
डगलसचा जन्म अमेरिकेतील ओरेगन मधील पोर्टलॅड येथे झाला. वडील कार्ल लुईस एंगेल्बर्ट रेडिओ मॅकेनिक तर आई ग्लेडिस गृहिणी होती. ओरेगन स्टेट युनिव्हसिटीतून विद्युत अभियंत्रिकीची पदवी डगलसने मिळवली. दुसर्या महायुध्दाच्या काळात रडार टेक्निशियन म्हणून त्यांनी काम केले होते. त्यानंतर नासामध्ये विद्युत अभियंता म्हणून काम करत होता पण लवकरच त्याने ही नोकरी सोडली आणि डॉक्टरेट मिळविण्यासाठी बर्कले येथील कॅलिफोर्निया विश्वविद्यालयात प्रवेश केला.
मानवाच्या बुध्दीविकासासाठी संगणक कसा उपयुक्त ठरू शकतो हा विचार त्यांना स्टॅनफोर्ड शोध संस्थेत घेवून गेला. स्टॅनफोर्ड मध्ये डगने आपली स्वतःची प्रयोगशाळा सुरु केली. इथे त्याच्या संशोधनाने एआरपीएनेटच्या विकासात सहयोग दिला यातूनच पुढे इंटरनेटचा जन्म झाला. १९६८ मध्ये सॅनफ्रान्सिको येथे त्याने माउस पहिल्यांदा सार्वजनिकरित्या दाखविला. याचवेळी त्याने पहिल्या व्हिडीओ टेली कॉन्फ्ररन्सचे देखील प्रदर्शन केले होते.३० जानेवारी १९८३ मध्ये हे संशोधन त्याने ४० हजार अमेरिकन डॉलर मध्ये अॅपलला विकले.
त्याच्या अवघ्या कारकीर्दीत माउसचा शोध हे एक मानाचे पान होते हे खरे, पण संगणकीय क्रांतीशी वा आज आपल्या टेबलवर, खिशात वा बॅगेत मावणाऱ्या संगणकीय अवताराशी निगडित जे काही शोध होते, संगणकाच्या उपयोगाच्या शक्यतांची जी काही पडताळणी होती ती या द्रष्टय़ाने पाहिलेल्या स्वप्नांमुळे, संशोधनामुळे शक्य झाली होती. त्या अर्थाने त्याच्या कारकीर्दीत अशी अनेक मानाची पाने लिहिली गेली. तरीही वापरणाऱ्या व्यक्तीची आणि त्याच्या वर्कस्टेशनची अर्थात संगणकाची वैयक्तिक नाळ जुळवणाऱ्या उपकरणाचा ‘माउस’चा आद्य अवतार जगासमोर आणणारा संशोधक म्हणूनच तो ओळखला जात होता.
प्रत्यक्षात डगलसने पाहिलेले स्वप्न वेगळेच होते. त्याला संगणकांच्या मदतीने मानवी बुद्धीच्या कक्षा विस्तारायच्या होत्या आणि एकूणच समाजाच्या बुद्धय़ांकात वाढ करायची होती. संगणकाच्या वैयक्तिक उपयोगापेक्षा संगणकाच्या माध्यमातून परस्पर संवाद आणि सहकार्यातून संगणकीय शक्यतांचा अवकाश आणखी विस्तारता येईल अशी त्याची धारणा होती. सॅन फ्रान्सिस्को येथे १९६८ मध्ये झालेल्या एका संगणक विषयक परिषदेत त्याने या शक्यता आणि संगणकीय उपयोगांविषयी जे काही महासादरीकरण केले त्यात आजघडीला आपल्या अंगवळणी पडलेल्या फाईल शेअरिंग, हायपरटेक्स्ट, एकाच वेळी अनेक विंडो सुरू करणे, मजकुराची दुरुस्ती आदी अनेक संगणकीय करामतीची, तंत्रांची बीजे होती.
तत्कालीन अवजड, बोजड, अस्ताव्यस्त पसरलेल्या आणि पंचकार्डाच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या पहिल्या पिढीतील संगणकाचे सुटसुटीत रूप डगच्या या सादरीकरणातूनच पुढे आले असे म्हटले तरी हरकत नाही. संगणकीय क्रांती या दिशेने झुकल्यामुळे मुळात डगलसला या सादरीकरणातून जे अभिप्रेत होते ते मागे पडले आणि फक्त ‘माउस’चे श्रेयच काय ते त्याच्या नावावर जमा झाले. तरीही आपण जे काही आज आपल्या संगणकांच्या मदतीने करू शकतो, इंटरनेट पाहतो, माहिती शेअर करतो हे सारे डगलसच्या द्रष्टेपणामुळेच शक्य झाले आहे, हे संगणक वापरणाऱ्या कुणालाही त्याच्या मेमरीतून डीलिट करता येणार नाही.
मूळ जर्मन असणार्या डगलसने बेलार्ड हिच्याशी विवाह केला होता. ४७ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात या दांम्पत्याला चार अपत्ये झालीत. बेलार्डच्या मृत्यूनंतर २६ जानेवारी २००८ ला त्यांना करेन हिच्याशी पुर्नविवाह केला. त्यादरम्यान २००७ ला डगलसला अल्जाएमर झाल्याचे कळले होते.
यकृताच्या आजाराने २ जुलै २०१३ ला डगलसचे निधन झाले. डगलसला त्याच्या आयुष्यात संशोधनाबद्दल नॅशनल मेडल फॉर टेक्नॉलॉजी, लेमेलसन एमआयटी पुरस्कार, टर्निंग पुरस्कार (१९९७), लोवेलास पदक, नोर्बेट विनर अॅवार्ड फॉर सोशल अॅण्ड प्रोफेशनल रिस्पॉसिबिलिटी, संगणक क्षेत्रातील संशोधनाबद्दल फेलो अॅवार्ड मिळाले आहेत.
🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏
संकलन -)गजानन गोपेवाड
उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा