संकलन @📒📒📒*
*श्री. गजानन गोपेवाड
══════════════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
❤️❤️ *ह्रदयाचे कार्य कसे चालते ?*
***********************************
विहिरीवर पाणी उपसण्यासाठी बसवलेला पंप तुम्ही पाहिला असेल. या पंपामुळे विहिरीतील पाणी उपसले जाते व ते शेतात सोडले जाते. पंपाच्या शक्तीमुळे खोल असलेले पाणी वर खेचले जातेच, पण दाबाखाली नाळांवाटे दूरवर शेतात सोडलेही जाते. हृदय एखाद्या पंपासारखेच कार्य करते. हृदय स्नायूंचे बनलेले असते. हृदय सामान्यतः आपल्या डाव्या हाताच्या मुठीच्या आकाराइतके मोठे असते. हृदयाचे डावा व उजवा असे दोन भाग असतात. या दोहोंच्या मध्ये स्नायूंचा पडदा असतो. डाव्या बाजूला शुद्ध रक्त तर उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते. डाव्या व उजव्या भागाचे प्रत्येकी दोन कप्पे असतात. वरच्या कप्प्याला कर्णिका (Atrium), तर खालच्या भागाला जवनिका (Ventricle) असे म्हणतात. कर्णिका व जवनिका यांच्यामध्ये रक्त प्रवाहासाठी झडपा असलेला मार्ग असतो. या झडपांमुळे रक्त कर्णिकेतुन (Artium) जवनिकेत (Ventricle) जाऊ शकते, पण उलटे परत जाऊ शकत नाही.
उजव्या कर्णिकेत (Atrium) शरीराच्या सर्व भागातील अशुद्ध रक्त जमा होते. ते नंतर उजव्या जवनिकेत (Ventricle) जाते. तेथून रक्तवाहिन्यांद्वारे हे रक्त फुप्फुसामध्ये शुद्धीकरणासाठी नेले जाते. फुफ्फुसात रक्त शुद्ध होते. शुद्ध झालेले हे रक्त डाव्या कर्णिकेत (Artium) येते व डाव्या कर्णिकेतून डाव्या जवनिकेत जाते. तेथून अनेक धमन्यांद्वारे वा रोहिण्यांद्वारे ते शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवले जाते.
हृदय कायम आकुंचन व प्रसरण पावत असते. दर मिनिटाला सुमारे ७२ वेळा आकुंचन प्रसरण होत असते. हृदय प्रसरण पावल्यावर कर्णिकांमधील (Artium) रक्त जवनिकांमध्ये (Ventricle) येते. आकुंचन पावल्यावर जवनिकांतील रक्त फुफ्फुसात व शरीरभर पोहोचवले जाते. हृदयाचे हे कार्य न थकता, न थांबता अहोरात्र चालूच असते. हृदय काही मिनिटे बंद झाले तरी आपला मृत्यू होते होतो. असे हे हृदय !
*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून
स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज
═══════════════════════
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा