*भक्ती म्हणजे*
किती साधी सोपी सरळ
व्याख्या आहे पहा➖
भक्ती जेंव्हा *"अन्नात"* शिरते तेंव्हा तीला *"प्रसाद"*
म्हणतात
आणि भक्ती जेंव्हा *"भुकेत"* शिरते तेंव्हा तीला *"उपवास"* असे म्हणतात
भक्ती जेंव्हा पाण्यात शिरते तेंव्हा तीला *"तीर्थ"* म्हणतात
आणि भक्ती जेंव्हा *"प्रवासाला"* निघते तेंव्हा तीला *"यात्रा"* असे म्हणतात
भक्ती जर का *"संगीतात"* शिरली तर तीला *"भजन / कीर्तन"* म्हणतात
आणि हीच भक्ती जर का लोकसंगीतात शिरली तर तीला *"भारूड"* असे म्हणतात
भक्ती जेंव्हा *"माणसात"* प्रकटते तेंव्हा *"माणूसकी"* निर्माण
होत
आणि हीच भक्ती जर *"घरात"* शिरली तर त्या घराचे *"मंदिर"* होते
भक्ती जर का शांतपणे *"मनाच्या गाभाऱ्यात"* शिरली तर त्याला *"ध्यान"* म्हणतात
आणि भक्ती जर का *"कृतीत"* उतरली तर तिला *"सेवा"* असे म्हणतात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा