▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬
══════════════════════
*📒📒📒 @ संकलन गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य
══════════════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
📕 *माणसाच्या शरीरात किरणोत्सर्गी पदार्थ असतात, हे खरे आहे का ?* 📕
किरणोत्सर्गी पदार्थ आणि शरीरात! काहीतरीच काय! असे तुम्हाला नक्की वाटेल; पण तुम्हाला कितीही आश्चर्य वाटले तरी ते खरे आहे. माणसाच्या सभोवताली असलेल्या पर्यावरणात नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असे अनेक किरणोत्सर्गाचे स्रोत
असतात. यात कॉस्मिक किरण पर्यावरणातील माती-दगड, यातील युरेनियम, थोरीयम, सोडियम, पोटॅशियम ४० क्ष किरण, अणुबॉब, दूरदर्शन संच, चमकणाऱ्या तबकडीची घड्याळे इत्यादींचा समावेश होतो. नैसर्गिक स्रोतांमुळे व्यक्तीला सुमारे १०० मिलीरॅड इतक्या किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागते.
आपल्या शरीरात वेगवेगळ्या उतींमध्ये किरणोत्सर्गी पदार्थ साठवले जातात. यात अत्यंत अल्प प्रमाणात असलेल्या युरेनियम, थोरीयम, पोटॅशियम ४०, स्ट्रॉन्शीयम ९० तसेच कार्बन-१४ यांचा समावेश होतो. या किरणोत्सर्गी पदार्थामुळे मानवाला दरवर्षी २५ ते ८० मिलीरॅड इतक्या किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागते. अर्थात किरणोत्सर्गाच्या इतर स्त्रोतांच्या मानाने हे प्रमाण फारच कमी असते. एकदा क्ष-किरण तपासणी केली, तर २००० ते ३००० मिलीरॅड इतक्या किरणोत्सर्गाला आपल्याला सामोरे जावे लागते.
किरणोत्सर्गाचे अनेक दुष्परिणाम असतात. यात रक्ताचा कर्करोग, लहान मुलांमध्ये निर्माण होणारी जन्मजात वैगुण्ये, (गर्भवती मातेची क्ष-किरण तपासणी केल्यास) तसेच गुणसूत्रांमध्ये होणारे बदल इत्यादी गंभीर परिणामांचा समावेश होतो.
किरणोत्सर्गाचा क्ष-किरण तपासणी व कर्करोगावरील उपचारात लाभदायक असा उपयोग करून घेतला जातो.
*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून
स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज
═══════════════════════
═══════════════════════
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा