*राजीव गांधी स्मृती दिन*
आज 21 मे भारताचे दिवंगत तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतिदिन.बरोबर तीस वर्षापूर्वी 21 मे,1991रोजी तामिळनाडू मधील श्रीपेरंबदूर येथे एलटीटीई अतिरेक्यांनी मानवी बॉम्ब वापरून राजीव गांधींची निर्घृणपणे हत्त्या केली. राजीव गांधी देशासाठी शहीद झाले. त्यांचे हौतात्म्य वाया जाणार नाही,ते देशाला सतत प्रेरणा देत राहील.
31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी देशासाठी शहिद झाल्या. त्या असाधारण परिस्थितीत राजीव गांधी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे घेतली. त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणूकीत राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने अभूतपूर्व यश मिळवले.
राजीव गांधी यांनी भारताला एकविसाव्या शतकाकडे नेणारी धोरणे आखली. त्यांनी अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केला. परदेशातील मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यासोबत टायप करून देशात उद्योगधंद्यात वाढ केली. केवळ राजदूत,एझडी,बुलेट मोटारसायकल असलेल्या आपल्या देशात त्यांनी दुचाकी व चारचाकी वाहन उत्पादनात क्रांती घडवून आणली, त्यामुळेच आज घरोघर दुचाकी आणि चारचाकी वाहने दिसताहेत. विशेष म्हणजे ही वाहने जास्त सुरक्षित आणि जास्त एव्हरेज देत आहेत.
त्यांनी सॅम पित्रोदा यांच्या साहाय्याने दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. संगणक हि तर राजीव गांधींचीच देणगी आहे,त्यांनी संगणकाचा सर्व क्षेत्रात वापर करायला प्रारंभ केला.
राजीव गांधी यांनी तरुणांवर विश्वास दाखवत मतदानाचा अधिकार 21 वर्षावरून 18 वर्षांवर आणला आणि सर्व तरुणांना देशाच्या निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले.
राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा करून आयाराम, गयाराम प्रवृत्तीला नियंत्रणात आणले.
1986 चे नवीन शैक्षणिक धोरण राजीव गांधींनी आणले आणि शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणला.
परराष्ट्र धोरणात शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करतांनाच त्यांनी दक्षिण आशियाई देशांचे नेतृत्व भारताकडे आणले,त्यासाठी भारत,पाकिस्तान, श्रीलंका, बांगला देश, भूतान,नेपाळ,मालदीव या सात राष्ट्रांची सार्क संघटना स्थापन केली.
संरक्षण शास्र सांगते ज्याच्याकडे अत्याधुनिक शस्र आणि अत्याधुनिक संरक्षण दल तोच देश परकीय आक्रमण परतवून लावू शकतो. परक्यांच्या भूमीवर आपले सैन्य तैनात करण्याचा धाडसी निर्णय राजीव गांधींनी घेतला,त्यासाठी त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठवली. मालदीव मध्ये नौदल पाठवून तेथील राजकीय बंड मोडून काढले व अब्दुल गय्युम सरकारला वाचवले.
बोफोर्स तोफा प्रकरणी राजीव गांधींची मिस्टर क्लीन ही प्रतिमा विरोधकांनी मलीन केली परंतु राजीव गांधी यांच्या पश्चात विविध कालखंडात सतरा वर्षे केंद्रात बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर होते आणि आहे त्यांनी बोफोर्स तोफातील गैरव्यवहार शोधण्यासाठी जंग जंग प्रयत्न करूनही ते काहीही शाबीत करू शकले नाही,उलट कारगिल युद्ध जिंकण्यात बोफोर्स तोफांचे योगदान मोठे आहे असे विधान तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीरपणे केले. देशात शस्र ,तोफा,विमान,हेलिकॉप्टर, रणगाडे,शवपेट्या इ .संरक्षण साहित्य खरेदी हा नेहमीच वादग्रस्त विषय ठरला आहे त्यात आजी माजी सगळ्याच पंतप्रधानांवर गैर व्यवहार केल्याचे आरोप झाले. देशाची सुरक्षा लक्षात घेता या विषयांवर अधिक पारदर्शी धोरण घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
राजीव गांधी यांनी देश आणि देशाची अर्थव्यवस्था आधुनिक व नव्या दिशेने नेली आहे. राजीव गांधींचे हौतात्म्य आणि देश उभारणीचे योगदान कधीच दुर्लक्षित करता येणार नाही.
*अब राजीवजी जैसे व्यक्ति कहॉं...*🙏🏻
*इस राजनीतिक अंधियारे में वो सूर्यमुखी अभिव्यक्ति कहॉं ?*
*भारत के नवनिर्माण की सत्ताधीशों में वो आसक्ति कहॉं ?*
*महिला-आरक्षण, नौजवानों को वोट,ऐसे सशक्तिकरण वाली तृप्ति कहॉं ?*
*जन्मभूमि पर प्राण न्योछावर करने वाली सबसे बड़ी देशभक्ति कहॉं ?*
*राजीव गांधी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन*
🙏🏻🙏🏻🌹
संकलन गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा