शनिवार, २९ मे, २०२१

कंपोस्ट म्हणजे काय

 ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

     

══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *कम्पोस्ट म्हणजे काय ?* 📕


कम्पोस्टींगबद्दल तुम्ही वाचले असेल. केरकचरा व मलमूत्र यांची एकत्रितपणे विल्हेवाट लावण्याची ही एक पद्धत आहे. ही एक नैसर्गिक क्रिया आहे. यात जिवाणूंच्या मदतीने सेंद्रिय पदार्थांचे विघटन होते व अखेर खतासारखा पदार्थ, 'कम्पोस्ट' तयार होतो. या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड, पाणी तसेच उष्णता निर्माण होते. कम्पोस्टींगमध्ये उष्णता निर्माण होत असल्याने माशांची अंडी व अळ्या नष्ट होतात, तणाच्या विया व रोगकारक जंतू मरतात. या प्रक्रियेत तयार होणारे कम्पोस्ट जमिनीला चांगल्या प्रकारे धरून ठेवते... त्यात जमिनीसाठीची नायट्रेट व फॉस्फेट ही पोषक द्रव्येही असतात.


कम्पोस्टीगसाठी ३ फूट खोल, ५ ते ८ फूट रुंद व १५ ते ३० फूट लांबीचे चर खणतात. सुरुवातीला या चरात केरकचऱ्याचा ६ इंची थर टाकतात. त्यावर मलमूत्राचा २ इंची थर टाकतात. अशा प्रकारे एका आड एक, केरकचरा व मलमूत्र यांचे थर चरात टाकले जातात. जेव्हा जमिनीपासून हे घर १ फूट उंचीपर्यंत येतात तेव्हा त्याव इंच जाडीचा मातीचा थर टाकला जातो. मातीचा थर व्यवस्थित टाकल्यास त्यात आपला पाय रुतणार नाही. हे थर टाकल्यानंतर ७ दिवसांतच जिवाणूंच्या प्रक्रियेमुळे उष्णता निर्माण होते. ही उष्णता २ ते ३ आठवडे टिकते. यामुळे मलमूत्र व केरकचयातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन होते. ४ ते ६ महिन्यांत विघटन पूर्ण होऊन गंधहीन असे कम्पोस्ट खत तयार होते. १,००,००० हून कमी लोकसंख्या असलेल्या नगरपालिकांनी मलमूत्र व केरकचन्याच्या विल्हेवाटीसाठी कम्पोस्टींगचा वापर करावा. काही ठिकाणी कम्पोस्टींग यांत्रिक रीतीने केले जाते.


असे हे निसर्गाशी मैत्री साधणारे कम्पोस्टींग. घाणीची यामुळे विल्हेवाट आरोग्यपूर्ण पद्धतीने लागतेच; पण ज्वलनामुळे होणारे हवेचे व जंतूंमुळे होणारे माती, पाण्याचे प्रदूषणही टाळता येते.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

═══════════════════════


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...