🎯 *11 मे- महात्मा दिन* 🎯
*Whatever I have done for the Society,*
*It was My Duty -*
*Jotirao Fule,The Great*
*छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर प्रथम समाधी शोधून जगातली पहिली शिवजयंती साजरी करणारे* *आणि*
*विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरू* *राष्ट्रपिता, क्रांतीसूर्य* *,तात्यासाहेब जोतीराव फुले ह्यांनी .*उभी हयात सामाजिक प्रबोधन, सामाजिक परिवर्तन व समाजसेवेचे कार्य केले.*
*त्यासाठी त्यांचा भव्य सत्कार करण्यात यावा असे जनतेला वाटत होते.* *त्यांचे मित्र ,चाहते कामाला लागले.* *11मे,1888 ही तारीख निश्चित करण्यात आली.* *या समारंभासाठी अतिथी म्हणून बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांना निमंत्रण देण्यात आले.* *त्यांनी असे सुचवले की जोतीराव फुले यांना भारताचे बुकर टी वॉशिंग्टन या पदवीने सन्मानीत करण्यात यावे.*
*11 मे,1888 चा दिवस उजाडला. मुंबईतील मांडवी येथे कोळीवाड्यात भव्य व दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .संपूर्ण परिसर रंगीबेरंगी पताका, गुढ्या-तोरणे उभारून सुशोभित करण्यात आला होता.* *समाजातील सर्व स्तरातील सामान्य जनता व सत्यशोधक कार्यकर्ते मंडळी हजर होती.*
*सत्यशोधक कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे, भाऊ लाड यांसारखे जोतीरावांचे अनुयायी हजर होते.*
*त्यांच्या असंख्य चाहत्यांनी सभागृहात दाटी केली होती. त्यांच्या चेहर्यावर जोतीरावां विषयी प्रेम ,कृतज्ञता ,आदर व अभिमान दिसत होता.* *सर्व वक्त्यांनी जोतीरावांच्या कार्यावर स्तुतीसुमने उधळली .त्यांना रावबहादुर वड्डेदार यांच्या हस्ते "महात्मा " हि उपाधी देण्यात आली.*
*सत्काराच्या उत्तराप्रित्यर्थ भाषण करताना जोतीराव म्हणाले, "मी जे काही केलं ते उपकाराच्या भावनेतून केलं नाही तर ते माझे कर्तव्य होते.* *माझ्या बांधवांसाठी मी झगडलो, लढलो. सत्यशोधक समाजाच्या कार्याचा घराघरातून प्रचार व्हावा .खेड्यापाड्यात सत्यशोधक विचार पसरावे.*
*हीच अपेक्षा मी आजच्या दिवसी करतो* ...
*जोतीराव फुले यांना मिळालेली महात्मा* ही *पदवी कोणत्या* *शासनाने दिली नाही तर*
*जोतीराव फुले यांना महात्मा ही पदवी* *लोकांनी दिली होती. महात्मा* *हा विशाल अंतःकरणाचा* *धनी असतो, त्याचे* *हृदय करुणा आणि मैत्री यांनी* *भरलेले असते.*
*सध्या लाॅकडाऊनमधे सुद्धा महाराष्ट्रभर अनेक* *ठिकाणी लोकं* " *सत्यशोधक पद्धतीने विवाह* " *करत आहेत, हा तात्यासाहेब* *म.फुलेंच्या सत्यशोधक* *विचारांचा विजय आहे* , *प्रभाव आहे .*
*संत तुकाराम महाराज म्हणतात ** *जे का रंजले गांजले* । *त्यासी म्हणे जो आपुले* ।। *तोचि साधू ओळखावा* *देव तेथेचि जाणावा** ।।
*हा अभंग म. जोतीराव फुलेंना तंतोतंत* *लागू होतो .*
*सत्याचा पालनवाला ।*
*हा धन्य जोतिबा झाला ।।*
*पतितांचा पालनवाला ।*
*हा धन्य महात्मा झाला* ।।
🌹 *सत्य हीच निती* ।
*बाकिची कुनिती जोती म्हणे* ।। 🌹
*जे सत्य आहे, सत्यावर आधारित आहे* *तीच खरी निती* *होय.*
*बाकिची अनिती होय, पाखंड होय* , *थोतांड व कपट-कारस्थान होय - हा तात्यासाहेब* *म.जोतिराव फुलेंनी* *अखंडातून दिलेला सत्यशोधक* *विचार, संदेश आजही* *तेवढाच प्रासंगिक आहे* ...
संकलन गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र
🙏🙏🙏
🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा