*28 मे जागतिक मासिक पाळी दिवस.....*
तिच्या मासिक पाळीतील वेदना,गरोदरपणातील दुखणे, गरोदरपणातील कळा, स्त्रीच्या उतार वयात पाळी जाताना उडालेला शरीराचा थरकाप पुरुषांना कधीच कळणार नाही.
आणि एवढे सर्व सोसूनही पुरुषाच्या बरोबर संसाराचा गाडा रेटायला ती सज्ज होते. म्हणूनच मला वाटते स्त्री-पुरुष तुला कधी होऊच शकत नाही. खर तर तिला मोठेपणा द्यायला हृदयात सागरा एवढी विशालता हवी.आणि तिच्या भावनांना जाणनारी सहृदयता हवी....!
*नायाब होते है वो मर्द,जो गुस्से मे भी औरत से बात करने की तमीज नही भुलते.*
खरतर स्त्री म्हणजे बुद्धीने विचार केला तर कधीच न समजणारा एक व्यक्तिमत्व पण प्रेमाने विचार केला तर एक सरळ अस्तित्व.
लेखक शिवाजी सावंत यांचे एक वाक्य विषयाला तंतोतंत लागू पडते ते म्हणतात..
*पराक्रमाचे मातृत्व पुरुषाकडे असतं,*
*पण मातृत्वाचा पराक्रम केवळ स्त्रीच करू शकते....!*
ही प्रक्रिया घडते त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात. परंतु निसर्गनियमाप्रमाणे सुंदर प्रक्रियेला अपवित्र चा डाग लावून समाजातील बराचसा वर्ग मोकळा होतो.मासिक पाळी ला नैसर्गिक प्रक्रिया म्हणून बघण्याची दृष्टी व या विषयावर जागृत राहण्याची नितांत गरज समाजास आहे.
आजवर आपण मासिक पाळी ही प्रक्रिया अशुद्ध,अपवित्र असते असे आपल्याला पदोपदी बिंबवण्यात आले. पण या विषयावर कधी जनजागृती चर्चा करावी असे कुणालाही वाटत नाही.
जगाच्या इतिहासात मला फक्त एकच देश या विषयावर घातलेला माझ्या वाचनात आला तो देश म्हणजे *"स्कॉटलंड"* हा देश आहे. या देशाच्या संसदेने या विषयाबाबत कायदा करून एकमताने मंजूर केला आहे. या देशात प्रत्येक दुकानावर *"सॅनिटरी पॅड*"उपलब्ध असतात आणि ते ही अगदी मोफत.
आपल्याही देशात एक दोन वर्षात दोन तीन *"सॅनिटरी पॅड"*एका कुटुंबाला आरोग्य यंत्रणेमार्फत मोफत मिळतात.आणि नंतर बाजारात मुबलक प्रमाणात विक्री होते की काय हा प्रश्न मला नेहमी सतावतो.
आमच्या घरात करती स्त्री म्हणजे आई.आणि बाबांनी तिला कधी मासिक पाळी मध्ये अपवित्र, अशुद्ध या नजरेने कधी पाहिलं नाही.आणि मी पण हीच परंपरा चालू ठेवली.अशुद्ध,अपवित्र कावळा शिवला हे शब्द मला बरेच सुशिक्षित कुटुंबाच्या घरी वावरताना कानी पडले. हे शब्द आजही जिव्हारी लागतात.
खरतर समाजातील सुशिक्षित स्त्री वर्गाची साथ असेल तर अनेक स्त्रिया पॅड चा वापर करतील. 14 जानेवारीला मकर संक्रांतीचे वाण म्हणून. वाट्या, फण्या,पिना, कंगवे वानात देण्यापेक्षा वर्षभर पुरतील एवढे पॅड द्या.आणि आपल्या देशातील 36 टक्के पॅड वापरण्याचे प्रमाण आहे. ते 100% टक्के व्हावे यासाठी संघर्ष करा.
म्हणून यापुढे कुठलेही दुमत न ठेवता सृष्टी कडून स्त्रीजातीला मिळालेला नैसर्गिक प्रक्रियेचा निसंकोचपणे स्वीकार करूया.
जागतिक मासिक पाळी दिनाच्या सर्व माय माऊलीना मनापासून शुभेच्छा......
शुभेच्छुक
गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा