👮♂️🇮🇳👮♂️🇮🇳👮♂️🇮🇳👮♂️🇮🇳👮♂️🇮🇳👮♂️
*भारतातील पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ(सीडीएस अधिकारी)*
🇮🇳👮♂️🇮🇳👮♂️🇮🇳👮♂️🇮🇳👮♂️🇮🇳👮♂️🇮🇳
*सी.डि.एस.बिपिन रावत*
🇮🇳👮♂️🇮🇳👮♂️🇮🇳👮♂️🇮🇳👮♂️🇮🇳👮♂️🇮🇳
जन्म -) १६ मार्च १९६८
(डेहराडून)
मृत्यू -) ०८ डिसेंबर २०२१
निलगिरी पर्वत (कुन्नुर)
सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंग्टन येथील सशस्त्र दलाच्या महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी गेले होते. या ठिकाणी रावत यांचे व्याख्यान होते. हा कार्यक्रम आटोपून ते कुन्नूरला परतत होते. तेव्हा निलगिरी पर्वत रांगामध्ये आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली. तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे वातावरण खराब आहे. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
*बिपिन रावत यांचा अल्पपरिचय.*
२०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व केले
०१ जानेवारी २०२० रोजी CDS पदाचा पदभार स्वीकारला
CDS बिपिन रावत प्रोफाइल: आज (०८ डिसेंबर २०२१) कुन्नूर, तामिळनाडू येथे लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. ज्यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १४ जण जहाजावर होते.
आम्ही तुम्हाला सांगतो की सीडीएस बिपिन रावत यांच्या कारकिर्दीचा बराच काळ भारतीय लष्कराच्या सेवेत गेला आहे, ते उंचीवर युद्धे लढण्यात तज्ञ आहेत. जाणून घेऊया त्यांचे गुण...
> बिपिन रावत हे लष्करात उच्च उंचीवर युद्ध लढण्यात आणि बंडखोरीविरोधी कारवाया करण्यात तज्ञ म्हणून ओळखले जातात.
> वर्ष २०१६ मध्ये उरी येथील आर्मी कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानमध्ये स्थायिक झालेल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. ज्याची अंमलबजावणी बिपिन रावत यांनी ट्रेंड पॅरा कमांडद्वारे केली होती.
उरी येथील आर्मी कॅम्प आणि पुलवामा येथील सीआरपीएफवर झालेल्या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाल्यानंतर लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला होता.
लष्करी सेवेदरम्यान त्यांनी एलओसी, चीन बॉर्डर आणि उत्तर-पूर्व भागात बराच काळ घालवला आहे.
> बिपीन रावत यांनी काश्मीर खोऱ्यात प्रथम राष्ट्रीय रायफल्स आणि नंतर इन्फंट्री डिव्हिजनमध्ये मेजर-जनरल म्हणून ब्रिगेडियरची कमान सांभाळली.
दक्षिण कमांडचे नेतृत्व करताना त्यांनी पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर यांत्रिकी-युद्धाबरोबरच हवाई दल आणि नौदलाशी उत्तम समन्वय साधला.
बिपिन रावत यांनी चिनी सीमेवर कर्नल म्हणून इन्फंट्री बटालियनचे नेतृत्वही केले आहे.
> बिपिन रावत यांना इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) मध्ये 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' प्रदान करण्यात आला आहे.
रावत यांनी चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष तसेच भारतीय लष्कराचे २७ वे लष्करप्रमुख म्हणून काम केले आहे.
बिपिन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी उत्तराखंडमधील पौडी येथे गढवाली राजपूत कुटुंबात झाला होता. बिपिन रावत १९७८ मध्ये लष्करात दाखल झाले. बिपिन रावत यांनी २०११ मध्ये चौधरी चरण सिंग विद्यापीठातून मिलिटरी मीडिया स्टडीजमध्ये पीएचडी मिळवली.
*लष्करप्रमुख ते सीडीएस असा प्रवास*
बिपिन रावत यांनी ०१ सप्टेंबर २०१६ रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आणि ३१ डिसेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराच्या २६ व्या प्रमुखाची जबाबदारी स्वीकारली. त्याच नंतर , ३० डिसेंबर २०१९ रोजी, त्यांना भारताचे पहिले CDS म्हणून नियुक्त करण्यात आले.पुढे बिपिन रावत यांनी ०१ जानेवारी २०२० रोजी CDS चा पदभार स्वीकारला.
बिपिन रावत हे देशातील पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस अधिकारी) होते. सीडीएसचे काम लष्कर , हवाई दल आणि नौदल यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक होते. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे होती.
बिपिन रावत यांचे वडील एल एस रावत हेदेखील लष्करात होते आणि ते लेफ्टनंट जनरल एल एस रावत म्हणून ओळखले जात होते. बिपिन रावत यांचे बालपण सैनिकांमध्ये गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यातल्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले. त्यांची तिथली कामगिरी पाहून त्यांना पहिलं सन्मानपत्र मिळालं, ज्याला SWORD OF HONOURनं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला
बिपिन रावत अमेरिकेतून परतले आणि त्यानंतर त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना १६ डिसेंबर १९७८ रोजी यश मिळाले. त्यांना गुरखा ११ रायफल्सच्या ५ व्या बटालियनमध्ये सामील करण्यात आलं. येथून त्यांचा लष्करी प्रवास सुरू झाला. इथे रावत यांना सैन्याचे अनेक नियम शिकण्याची संधी मिळाली. रावत यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की गोरखामध्ये राहून त्यांना जे काही शिकता आले ते इतरत्र कुठंही शिकायला मिळालं नाही. इथं त्यांनी लष्कराची धोरणं समजून घेतली आणि धोरणं तयार करण्याचं कामही केलं. इथं त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आय एम ए देहराडून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केलं.
सैन्यात असताना बिपिन रावत यांना सैन्यात अनेक पुरस्कारही मिळाले होते. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली होते. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
रावत यांनी आपल्या आयुष्यातील ३७ वर्षे लष्करासाठी समर्पित केली होती. त्यांच्याकडे आणखी अनेक जबाबदाऱ्या होत्या आणि ते देशाच्या सुरक्षा मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी एक काम करत होते. बिपिन रावत म्हणत असतत, की त्यांनी एकट्याने काहीही केलं नाही. टीम वर्कमुळेच यश मिळालं. त्यांनी गोरखा बटालियनपासून सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी सैन्यात अनेक पदांचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते लष्करप्रमुख झाले, आता ते भारतातील पहिले सीडीएस अधिकारी म्हणूनही काम करत होते.
मधुलिका रावत या बिपीन रावत यांच्या पत्नी होत. मधुलिका रावत यांचे ही या अपघातात निधन झाले आहे.
🙏🇮🇳🙏शत् शत् नमन्🙏🇮🇳🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संकलन -)गजानन गोपेवाड
उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा