✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
*२९ जानेवारी १७८०*
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
जेम्स ऑगस्टस हिकी याने २९ जानेवारी इ.स. १७८० रोजी कोलकाता येथे कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर (इंग्लिश: Calcutta General Advertiser) या नावाने साप्ताहिक वृत्तपत्र सुरु केले. हेच वृत्तपत्र हिकीज बेंगाल गॅझेट (इंग्लिश: Hickey's Bengal Gazette) या नावाने ओळखले जात असे. या वृत्तपत्रानेच भारतीय पत्रकारितेस आरंभ झाला असे मानले जाते.
जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले.
२३ मार्च इ.स. १७८२ रोजी या वृत्तपत्राचे प्रकाशन बंद पडले.
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
संकलन -)गजानन गोपेवाड
उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा