🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭
*क्लाइड टॉमबॉ*
🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭
*खगोलशास्त्रज्ञ*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
*प्लूटो ह्या बटुग्रहाचा शोध लावला*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
*स्मृतिदिन - १७ जानेवारी १९९७*
क्लाईड टॉमबॉघ यांनी १९३० मध्ये प्लूटो शोधला. टॉमबॉघ यांनी प्लूटो शोधल्यापासून ही सौरमालेतील नेहमीच सर्वात वादग्रस्त गोष्ट राहिली आहे. त्याला खगोल शास्त्रज्ञांनी बरेच वेळा तो ग्रह, बटू ग्रह,नेपचूनचा भरकटलेला चंद्र तर कधी चक्क धुमकेतू असे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. न्यू होरायझन्स प्रथम जानेवारी २००६ मध्ये जेंव्हा टॉमबॉघ यांची रक्षा घेऊन प्लूटो कडे निघाले तोपर्यंत तो ग्रह म्हणूनच ओळखला जात होता. पण त्यानंतर फक्त काही महीन्यांनंतर तो एक बटू-ग्रह किंवा 'प्लुटॉईड' म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याची आता 'लघुग्रह संख्या १३४३४०' अशी नोंद करण्यात आली आहे.
"प्लूटो हा खडक आणि बर्फ यांपासून तयार झालेला आणि त्याला पाच उपग्रह असले तरी सूध्धा वर्गीकरणाचा वादविवाद अजूनही आहे."त्याचे तापमान -२३०C आहे आणि वातावरणात वर वर जावे तसा तो उबदार होत जातो.
प्लूटो १९३० मध्ये शोधला गेला तेंव्हा त्याला नाव देण्यासाठी एक स्पर्धा घेण्यात आली होती तेंव्हा ११ वर्षाच्या वेनेशिया बर्नी हिने प्लूटो हे नाव दिले. त्याबद्दल तिला पाच पौंडाची नोट बक्षीस म्हणून मिळाली होती,कैलीस्टो,आयोप्लूटो हा बुध आणि इतर चंद्र ग्यानिमिद,टायटन,युरोपा,ट्राइटन व चंद्र यांचापेक्षा लहान आहे.मागील २० वर्ष त्याच्या २४८ वर्षांच्या परिभ्रमण काळात प्लूटो हा नेपच्यून पेक्षा सूर्याच्या जवळ आला असून. त्यामुळे नेपच्यून ९ क्रमांकावर गेला असून प्लूटो ८ व्या क्रमांकावर आला आहेकाही खगोलशास्त्रज्ञाच्या गृहितकाप्रमाणे प्लूटो हा एक नेपच्यून चा भरकटलेला चंद्र असून त्याने नेपच्यून चे वातावरण ओढुन घेतले आणि स्वतःची कक्षा तयार केली.सूर्याचा प्रकाश प्लूटोवर पोहोचण्यासाठी ५ तास लागतात.त्याचे आकाश एवढे गडद दिसते की आकाशात दिवसा सुधा तारे दिसतात. पृथ्वीवारुन प्लूटोकडे बघने म्हणजे ३० मैलांवरून अक्रोड बघने असे आहे.
🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏
संकलन -)गजानन गोपेवाड
उमरखेड जिल्हा-यवतमाळ ४४५२०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा