गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

बाळाची वाढ


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 



══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *बाळाची वाढ व विकास व्यवस्थित आहे वा नाही, हे कसे ओळखावे ?* 


बन्याचदा आईवडिलांना आपल्या मुलाच्या वाढीविषयी चिंता वाटत असते तो नीट खात नाही वा अमुकच करतो, अशा तक्रारी ते करत असतात. मुलाची वाढ व विकास व्यवस्थित आहे वा नाही, हे कसे ओळखायचे? हा पालकांपुढील महत्त्वाचा प्रश्न असतो. ५ वर्षापर्यंतच्या वयाच्या मुलाच्या वाढीचा त्याचे वजन हा उत्तम निदर्शक असतो. "Road to health" नावाचे तक्ते उपलब्ध असतात. यात दर महिन्याला मुलाचे वजन नोंदवण्याची सोय असते. मुलांच्या अपेक्षित वजनाच्या हिशोबाने तक्त्यावर एक 'आरोग्य पथ' दाखवलेला असतो. आपल्या बाळाचे वजन त्या आरोग्य पथावर असेल तर मुलाची वाढ चांगली आहे, असे समजावे. हा तक्ता असा असतो.


मुलाचा विकास योग्य आहे वा नाही, हे खालील निकषांवरून तपासून पाहता येईल. 


तीन महिने - आईकडे बघून ओळखीचे हसते.


चार महिने - मान पूर्णपणे सावरू शकते.


सहा-सात महिने - बसायला लागते.


नऊ ते दहा महिने - रांगायला लागते.


पंधरा महिने - बाबा, दादा असे बोलू लागते.


अडीच वर्षे - स्वतंत्रपणे चालू लागते. संडासवर नियंत्रण येते.


दोन ते अडीच वर्षे - छोटी वाक्य बोलते.


तीन ते साडेतीन वर्षे - लघवीवर नियंत्रण येते.


या विकासाच्या टप्यांवरून मूल योग्य प्रकारे वाढते आहे वा नाही, हे तपासता येईल. अर्थात वाढ व विकास यात मुलामुलांमध्ये थोडाफार फरक पडू शकतो, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या मुलामध्ये विकासाचे सर्वच


टप्पे उशीरा गाठले जात असतील, तर मात्र संपूर्ण तपासण्या करून घेणे गरजेचे आहे.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...