शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

पुणे येथील रहिवासी

 नमस्ते मित्रांनो ,

प्रति,

 शिक्षण विभागातील सर्व अधिकारी ,

प्राथमिक / माध्यमिक / उच्च . माध्यमिक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी*

       आपणास कळविण्यास आनंद होतो कि  शिक्षण विभागातील काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी /शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांना  पुण्यात आपल्या प्रशासकिय कामासाठी यावे लागते अशावेळी बऱ्याचवेळा मुक्काम करावा लागतो परंतु मुक्कामास स्वच्छ किफायतशीर किंमतीत सोय होत नसल्याने बऱ्याचजणांची गैरसोय होते त्यासाठी आपल्या सर्वांच्या सोयीकरता पुणे शहरात मध्यवर्ती ठिकाणी ( स्वारगेटपासून पाच मिनिटाच्या अंतरावर )मुक्कामाची  अगदी नाममात्र शुल्कात ( प्रत्येकी १०० रू . )सोय आपल्या *शिक्षक भवन* , *१९२ , नवी पेठ , गांजवे चौक , पत्रकार भवन, शेजारी , निवारा वृध्दाश्रमासमोर ,पुणे ३०  फोन नं. 02024537867* होते .


 *शिक्षक भवन वैशिष्टये :* 

१ ] *पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी उत्तम निवास व्यवस्था .* 

 २ ) *प्रशस्त पार्किंग व्यवस्था .* 

३ ) *अंगोळीसाठी गरम पाणी* 

४ ) *केवळ ओळखपत्राच्या / मुख्याध्यापक पत्राच्या आधारे प्रवेश* 


५ ) *प्रतिदिन प्रतिव्यक्ती केवळ १०० रु. निवास व्यवस्था.* 


६ ) *वैद्यकिय कारणास्त कुटुंबासह निवास व्यवस्था .* 

तरी सर्व शिक्षण विभागातील काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी / कर्मचाऱ्याने एक वेळ आवश्य भेट दया .

  इतर संपर्क क्रमांक 

स्वप्निल कांबळे सकाळी १० ते ६ भ्रमणध्वनी  9579252295

 सतिश मेंगडे  संध्याकाळी ६ ते ११ 

 भ्रमणध्वनी 9096392517

रात्री विनय काका 8669226259

      


सहायक संचालक , ( विद्या शाखा )

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय , पुणे ०१ 


( *सदरची पोष्ट शिक्षण विभागातील प्रत्येक गटावर / प्रत्येक शिक्षक , कर्मचारी , अधिकारी यांचेपर्यंत पोहचवावी ही विनंती .* )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...