➿➿➿➿➿➿➿➿➿➿
*🇮🇳👮♂️पोलिस स्मृती दिन👮♂️🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿➿
आज भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन आहे. दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. या दिवशी शहीद पोलिस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती.
देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन साजरा केला जातो.
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्यानंतरपासून २१ ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या २१ ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहिली जाते. जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये या निमित्ताने शहीद पोलिसांना अभिवादन करण्यात येते. यासोबतच विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येते.
२०१८ मध्ये, पोलिस स्मृतिदिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीमध्ये पहिल्याच राष्ट्रीय पोलिस स्मारकाचे उद्घाटन केले. त्यांनी पोलिस दलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अभिवादन केले आणि देशातील लोकांना पोलिस म्यूझियम भेट देण्याचे आवाहन केले. आज राष्ट्रीय पोलिस मेमोरियलने १९४७ नंतरपासून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व केंद्रीय आणि राज्य पोलिस दलाच्या ३४,८४४ पोलिस कर्मचाऱ्यांचे स्मरण केले.
महाराष्ट्र पोलिसांकडून अभिवादन
आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आदरांजली वाहण्यात येते.
'हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही.'
शहिद पोलिस जवानांना भावपुर्ण अभिवादन.....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गजानन गोपेवाड
उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा