रविवार, २७ मार्च, २०२२

बॅटरीसेल / घट


═══════════

   * @ संकलन @*

  *श्री. गजानन गोपेवाड 

═════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═════════════ 

📙 *बॅटरीसेल / घट* 📙 

***********************


टॉर्च किंवा बॅटरीचे नावीन्य सध्यातरी कोणालाच वाटत नाही, किंबहुना प्रत्येक घरातून दिवे गेले, तर रात्रीच्या वेळी वापरासाठी एक बॅटरी हजर असतेच. याच कारणाने बॅटरी तयार करणारी मोठी कंपनी स्वतःला 'एव्हरेडी' म्हणवून घेते. पण याखेरीजही बॅटरीसेल्सचा किंवा ड्रायसेल्सचा उपयोग आपल्या जीवनात नेहमीच होत असतो. ट्रान्झिस्टर रेडिओ असो, टेपरेकॉर्डर असो वा कोणतेही पोर्टेबल म्हणजे इकडून तिकडे सहज नेता येण्यायोगे मशीन असो, ते सहसा या ड्रायसेल्सवरच चालते. एखादा छोटासा पेन सेल असेल वा चार ते सहा मोठे सेल्स असतील; पण आपल्या जीवनातील काही जरुरीच्या क्षणी तेच उपयोगी पडतात.


 विद्युतऊर्जा विविध प्रकारे तयार केली जाते व साठवली जाते. विद्युतघट हा प्रकार मुख्यत: रासायनिक ऊर्जेच्या निर्मितीतुन तयार केला गेला. व्होल्टानी तयार केलेला विद्युतघट हा अवजड, हलवण्यास कठीण होता. त्याच्याच पुढील आवृत्त्या डॅनियल, लेक्लांशे यांनी काढल्या. याचाच सुटसुटीत अवतार म्हणजे ड्राय बॅटरीसेल किंवा निर्द्रव विद्युतघट.


या घटात जस्ताचे बाह्यावरण ऋण ध्रुवाचे काम करते. यात मध्यभागी जस्ताशी संपर्क न येता कार्बनची कांडी ठेवलेली असते. ही घन ध्रुवाचे काम करते. सर्व घट अमोनियम व झिंक क्लोराइडच्या विशिष्ट मिश्रणाने भरला जातो. कार्बनकांडीच्या जवळचा भाग ग्राफाईट व मॅगनीज डायऑक्साइडच्या मिश्रणाने झाकला जातो. तोंड सील केल्यावर घटत्या तयार होतो. हे झाले प्राथमिक वर्णन. अलीकडच्या घटात यापेक्षा अधिक विविध परिणामकारी संयुगेही वापरली जातात. पण त्याबद्दल प्रत्येक कंपनी गुप्तता पाळते. या प्रकारचे घट वापरायला सुरुवात झाली, तेव्हा ते पावसाळ्यात चिघळत असत. हल्लीचे घट संपूर्णपणे पॉलिमर कोटेड असतात. फक्त ऋण व घन भाराच्या जागा मोकळ्या सोडलेल्या असतात. बॅटरीच्या वापरासाठी, ट्रान्झिस्टरसाठी, एखाद्या यांत्रिक मोटारच्या वापरासाठी विविध प्रकारचे ड्रायसेल्स तयार करण्यातही काही कंपन्यांनी आघाडी मिळविली आहे. काही कंपन्यांनी तर काही फेरबदल सेलमध्ये करून हेच ड्रायसेल्स पुन्हा सक्षम करण्याची (Recharge) यंत्रणाही सज्ज केली आहे. सध्या विजेवर वापरल्या जाणाऱ्या अनेक छोट्या गोष्टींचा वापर आपण करतो. लॅपटॉप, आयपॅड, मोबाइल, डिजिटल कॅमेरा, कॅल्क्युलेटर यांसाठी पुन्हा पुन्हा चार्ज करता येणारे विविध आकारांचे, प्रकारांचे व क्षमतांचे सेल वापरात आले आहेत.


 आपल्या देशात सध्या उत्तम प्रकारचे बॅटरीसेल्स सहज उपलब्ध आहेत. वापरून झाल्यावर ड्रायबॅटरीसेल निरुपयोगी होतो.


*'सृष्टी विज्ञानगाथा' 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...