मंगळवार, १५ मार्च, २०२२

ज्ञान-विज्ञान* 🌎 ═════════════ 📙 *कार्बनचक्र म्हणजे काय ?* 📙


═════════════

   @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड 

═════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

═════════════ 

📙 *कार्बनचक्र म्हणजे काय ?* 📙 

*******************

पृथ्वीवरील प्रत्येक सजीवामध्ये कार्बनचे अस्तित्व आहे. मात्र वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण अत्यल्प आहे. प्राणवायूशिवाय कोणताच सजीव जगात नाही, हे आपल्याला माहीत आहेच. हवेतील प्राणवायू कायम राखण्याचे महत्त्वाचे काम वनस्पती करत असतात. हे काम जर झाले नसते, तर वातावरणातील प्राणवायू कधीच संपला असता. रात्रंदिवस वनस्पती हे जे काम करत असतात, त्यातून कार्बनचक्र अव्याहत चालू राहते. क्लोरोफिल या हिरव्या द्रव्याचा या प्रक्रियेत महत्त्वाचा भाग असतो. बहुतांश वनस्पती क्लोरोफिलचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करतात. जमिनीतून मिळवलेले पाणी व अन्य अनेक रसायने यांचा यासाठी वापर होतो. मुख्यत: शर्करा तयार करताना वनस्पती सूर्यप्रकाशाचा दिवसा उपयोग करून घेतात. या क्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. ही क्रिया पुढील प्रमाणे होते -

Energy + 6H2O ⬆ 6CO2 »» C6H12O6 + 6O2 ⬆


 यातून ग्लुकोज तयार होऊन तिचा वनस्पती वापर करतात व हवेमध्ये ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. 

रात्रीच्या वेळी मात्र सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने ही क्रिया घडत नाही. फक्त वनस्पतींचे श्वसन चालू राहते. त्यात प्राणवायू आत घेतला जाऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारा कार्बन प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारेच मिळवला जातो. वनस्पतींच्या फांद्या, खोड, पाने बनवण्यात कार्बनचा मोठा वाटा असतो.

वनस्पतीचे आयुष्य संपल्यावर शिल्लक राहतो, तो कार्बनचाच मोठा भाग असतो. मात्र हवेतील प्राणवायूचे प्रमाण कायम राखण्यात या सार्‍या प्रक्रियेचा मोठा वाटा असतो.


*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

═════════════

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...