बुधवार, २३ जून, २०२१

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿                                        

                  *स्वराज्यजननी*

               *राजमाता जिजाऊ*

*(जिजाबाई शहाजीराजे भोसले)*


   *जन्म : १२ जानेवारी १५९८*

(सिंदखेडराजा,बुलढाणा,महाराष्ट्र)


        *मृत्यू : १७ जून १६७४*

        (पाचड,रायगडचा पायथा)


वडील : लखुजीराव जाधव

आई : म्हाळसाबाई उर्फ 

           गिरिजाबाई

पती : शहाजीराजे भोसले

संतती : छत्रपती शिवाजीराजे भोसले, संभाजी शहाजी भोसले

राजघराणे : भोसले

चलन : होन


जिजाबाई (इतर नावे: जिजामाता,जिजाऊ,राजमाता,माँसाहेब,इत्यादी) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या.सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.


🔱 *भोसले व जाधवांचे वैर*


पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व शरफोजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले. हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.


या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.


🌀 *अपत्ये*


जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.


जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.


⚜ *मुलाचे संगोपन व राजकारभार*


शिवाजी राजे १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला.सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजी राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजी राजांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि  रामायण,महाभारतातील गोष्टी सांगितल्या.सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता,वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले.जिजाबाईंनी नुसत्याच गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.


शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.


🔮 *जीवन*


शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.


राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.


राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.


शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.


जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.


📚 *पुस्तके*


राजमाता जिजाबाईंचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही-


जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री - मेधा टिळेकर

जेधे शकावली

शिवभारत

जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले )

जिजाई : मंदा खापरे 

गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव

अग्निरेखा


🎞 *चित्रपट*


जिजाबाईंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. शिवाजी राजांवरच्या चित्रपट-नाटकांत जिजाबाईंचे पात्र बहुधा असते. परंतु जिजाबाईंवर स्वतंत्र असे फारच थोडे चित्रपट निघाले, त्यांपैकी काही हे :-


राजमाता जिजाऊ (दिग्दर्शक - यशवंत भालकर)

स्वराज्यजननी जिजामाता (दूरचित्रवाणी मालिका,निर्माते : अमोल कोल्हे)


  *जय जिजाऊ...जय शिवराय*


 *🚩🚩हर हर महादेव...🚩🚩*

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

बुधवार, १६ जून, २०२१

मित्रप्रेम कविता) :गजानन गोपेवाड

 *मित्र वेडेच असतात !!*


केंव्हाही येतात केंव्हाही जातात

मनाची दारं उघडीचं टाकतात  

आपल्या सुखात खळखळून हसतात

आपल्या दुःखात पिळवटून रडतात

                  मित्र   वेडेच असतात.!!


 जवळची नातीसुद्धा परकी होतात 

 दिलं ,घेतलं हिशाोबातअडकतात

 तिथं हेच सावरायलाच असतात

 सावरलंकी अलगद बाजुलाही सरकतात

                 मित्र  वेडेच असतात.!!


रक्ताच्या नात्याचे नसतात .

अग्निसमक्ष जोडलेले नसतात

 एखाद्या अवचित हळव्या क्षणी

 अद्वैत साधून मनात शिरतात

                 मित्र वेडेच असतात.!!


  सारे माझे तयांना ठाऊक असते

  सारे तयांचे मला ठाऊक असते

  कोठे काय बोलायचे उमजलेले असते

  काय ओठांच्या आत हवे माहित असते.

              मित्र वेडेच असतात.!!


 बालपणीचे निरागस बंध

 तारुण्यातील उनमत्त  गंध

 प्रौढपणीचा समजदार संग

 अवघे आयुष्य माझे रंगारंग 

              मित्र  वेडेच असतात.!!


मैत्री  खरंच अशी अनमोल असते. 

प्रत्येक जीवाने अनुभवायाचीअसते.

पण....पण.....

खुळ्या सोनेरी उन्हासारखी

आयुष्यात मैत्री जुळावी लागते.

               मित्र वेडेच असतात !!


असे मित्र आणि  मैत्री हि कोठेही विकत मिळत नाही , तेंव्हा आपल्या जवळच्या मित्रांना जपा 

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 



झाडे लावा झाडे जगवा

 *इवलंसं रोपटं मी*

*तू म्हणालास तर मरून जाईन,*


*ओंजळभर पाणी दे मला*

*आयुष्यभर तुझ्या कामी येईन,*


*दिलं जीवदान मला तर*

*तुला जगायला प्राणवायू देईन,*


*जगवलंस मला तर* 

*तुझ्या देवांसाठी फुलं देईन,*


*फुलवलंस मला तर*

*तुझ्या मुलांसाठी फळं देईन.*


*तळपत्या उन्हामध्ये* 

*तुझ्या कुटुंबाला सावली देईन,*


*तुझ्या सानुल्यांना खेळावया*

*माझ्या खांद्यावर झोका देईन,*


*तुझ्या आवडत्या पाखरांना*

*मायेचा मी खोपा देईन,*


*कधी पडला आजारी तर* 

*तुझ्या औषधाला कामी येईन,*


*झालो बेईमान जरी मी* 

*शेवटी तुझ्या सरणाला कामी येईन.*

        

             *🌿एक रोपटं🌿*


 *🌴🌴झाडे लावा झाडे जगवा*🌴🌴

ऐक जनजागृती आव्हान गजानन  गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 



मंगळवार, १५ जून, २०२१

गाथाबलीदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿                    


        *देशबंधू चितरंजन दास*


         *जन्म : ५ नवम्बर १८७०*

   (तेलीरबाग,ढाका,ब्रितानी भारत)


     *मृत्यु : १६ जून १९२५*

                   (उम्र ५५)

                  (दार्जिलिंग)


राष्ट्रीयता : भारतीय


व्यवसाय : वकील (बैरिस्टर)

पदवी : "देशबन्धु"


प्रसिद्धि कारण : भारतीय स्वतन्त्रता आन्दोलन के प्रमुख नेताओं में से एक


राजनैतिक पार्टी : भारतीय राष्ट्रीय कांग्रेस (१९२३ से पहले)

स्वराज पार्टी (१९२३–१९२५)


जीवनसाथी : बसन्ती देवी


देशबन्धु चितरंजनदास सुप्रसिद्ध भारतीय नेता, राजनीतिज्ञ, वकील, कवि, पत्रकार तथा भारतीय स्वतंत्रता आन्दोलन के प्रमुख नेता थे। उन्होंने कई बड़े स्वतंत्रता सेनानियों के मुकद्दमे भी लड़े।


चितरंजन दास का जन्म ५ नवंबर १८७० को कोलकाता में हुआ। उनका परिवार मूलतः ढाका के बिक्रमपुर का प्रसिद्ध परिवार था। चितरंजन दास के पिता भुबनमोहन दास कलकत्ता उच्च न्यायालय के जाने-माने वकीलों में से एक थे। वे बँगला में कविता भी करते थे। उनका परिवार वकीलों का परिवार था।


सन्‌ १८९० ई. में बी.ए. पास करने के बाद चितरंजन दास आइ.सी.एस्‌. होने के लिए इंग्लैंड गए और सन्‌ १८९२ ई. में बैरिस्टर होकर स्वदेश लौटे। शुरू में तो वकालत ठीक नहीं चली। पर कुछ समय बाद खूब चमकी और इन्होंने अपना तमादी कर्ज भी चुका दिया।


वकालत में इनकी कुशलता का परिचय लोगों को सर्वप्रथम 'वंदेमातरम्‌' के संपादक श्री अरविंद घोष पर चलाए गए राजद्रोह के मुकदमे में मिला और मानसिकतला बाग षड्यंत्र के मुकदमे ने तो कलकत्ता हाईकोर्ट में इनकी धाक अच्छी तरह जमा दी। इतना ही नहीं, इस मुकदमे में उन्होंने जो निस्स्वार्थ भाव से अथक परिश्रम किया और तेजस्वितापूर्ण वकालत का परिचय दिया उसके कारण समस्त भारतवर्ष में 'राष्ट्रीय वकील' नाम से इनकी ख्याति फैल गई। इस प्रकार के मुकदमों में ये पारिश्रमिक नहीं लेते थे।


इन्होंने सन्‌ १९०६ ई. में कांग्रेस में प्रवेश किया। सन्‌ १९१७ ई. में ये बंगाल की प्रांतीय राजकीय परिषद् के अध्यक्ष हुए। इसी समय से वे राजनीति में धड़ल्ले से भाग लेने लगे। सन्‌ १९१७ ई. के कलकत्ता कांग्रेस के अध्यक्ष का पद श्रीमती एनी बेसंट को दिलाने में इनका प्रमुख हाथ था। इनकी उग्र नीति सहन न होने के कारण इसी साल श्री सुरेंद्रनाथ बनर्जी तथा उनके दल के अन्य लोग कांग्रेस छोड़कर चले गए और अलग से प्रागतिक परिषद् की स्थापना की। सन्‌ १९१८ ई. की कांग्रेस में श्रीमती एनी बेसंट के विरोध के बावजूद प्रांतीय स्थानिक शासन का प्रस्ताव इन्होंने मंजूर करा लिया और रौलट कानून का जमकर विरोध किया। पंजाब कांड की जाँच के लिए नियुक्त की गई कमेटी में भी इन्होंने उल्लेखनीय कार्य किया। इन्होंने महात्मा गांधी के सत्याग्रह का समर्थन किया। लेकिन कलकत्ते में हुए कांग्रेस के विशेष अधिवेशन में इन्होंने उनके असहयोग के प्रस्ताव का विरोध किया। नागपुर अधिवेशन में इन्होंने उनके असहयोग के प्रस्ताव का विरोध किया। नापुर अधिवेशन में ये २५० प्रतिनिधियों का एक दल इस प्रस्ताव का विरोध करने के लिए ले गए थे, लेकिन अंत में इन्होंने स्वयं ही उक्त प्रस्ताव सभा के सम्मुख उपस्थित किया। कांग्रेस के निर्णय के अनुसार इन्होंने वकालत छोड़ दी और अपनी सारी सपत्ति मेडिकल कॉलेज तथा स्त्रियों के अस्पताल को दे डाली। इनके इस महान्‌ त्याग को देखकर जनता इन्हें 'देशबंधु' कहने लगी।


असहयोग आंदोलन में जिन विद्यार्थियों ने स्कूल कॉलेज छोड़ दिए थे उनके लिए इन्होंने ढाका में 'राष्ट्रीय विद्यालय' की स्थापना की। आसाम के चाय बागानों के मजदूरों की दुःस्थिति ने भी कुछ समय तक इनका ध्यान आकर्षित कर रखा था।


सन्‌ १९२१ ई. में कांग्रेस ने असहयोग आंदोलन के लिए दस लाख स्वयंसेवक माँगे थे। उसकी पूर्ति के लिए इन्होंने प्रयत्न किया और खादी विक्रय आदि कांग्रेस के कार्यक्रम को संपन्न करना आरंभ कर दिया। आंदोलन की मजबूत होते देखकर ब्रिटिश सरकार ने इसे अवैध करार दिया। ये सपत्नीक पकड़े गए और दोनों को छह छह महीने की सजा हुई। सन्‌ १९२१  ई. में अहमदाबाद कांग्रेस के ये अध्यक्ष चुने गए। लेकिन ये उस समय जेल में थे अतएव इनके प्रतिनिधि के रूप में हकीम अजमल खाँ ने अध्यक्ष का कार्यभार सँभाला। इनका अध्यक्षीय भाषण श्रीमती सरोजिनी नायडू ने पढ़कर सुनाया। ये जब छूटकर आए उस समय आंदोलन लगभग समाप्त हो चुका था। बाहर से आंदोलन करने के बजाए इन्होंने कांउसिलों में घुसकर भीतर से अड़ंगा लगाने की नीति की घोषणा की। गया कांग्रेस में ये अध्यक्ष थे लेकिन इनका यह प्रस्ताव वहाँ स्वीकार न हो सका। अतएव इन्होंने अध्यक्ष पद से त्यागपत्र दे दिया और स्वराज दल की स्थापना की। कांग्रेस को उनकी नीति माननी पड़ी और उनका कांउसिल प्रवेश का प्रस्ताव सितंबर, १९२३ ई. में दिल्ली में हुए कांग्रेस के अतिरिक्त अधिवेशन में स्वीकार हो गया।


प्रस्ताव के अनुसार ये काउंसिल में घुसे। इनका दल बंगाल काउंसिल में निर्विरोध चुना गया। इन्हांने मंत्रिमंडल बनाना अस्वीकार कर दिया और मंत्रियों के वेतनों को मान्यता देना नामंजूर कर मांटफोर्ड सुधारों की दुर्गति कर डाली। सन्‌ १९२४-२५ में इन्होंने कलकत्ता नगर महापालिका में अपने पक्ष के काफी लोग घुसाए और स्वयं मेयर हुए।


इन दिनों कांग्रेस पर इनके स्वराज्य दल का पूरा कब्जा था और ये स्वयं उसके कर्ता-धर्ता थे। पटना के अधिवेशन में इन्होंने कांग्रेस की सदस्यता के लिए सूत कातने की अनिवार्य शर्त को ऐच्छिक करार दिया। लगभग इसी समय गोपीनाथ साहा नामक एक बंगाली व्यक्ति ने एक अंग्रेज की हत्या की और सरकार तथा इनके दल में झगड़ा शुरू हुआ। सरकार ने एक विज्ञप्ति प्रकाशित की और संदेह में ८० लोगों की पकड़ा। कलकत्ता कार्पोरेशन ने भी सरकार की इस नीति का विरोध किया।


सन्‌ १९२४ में बंगाल की प्रांतीय परिषद् ने गोपीनाथ साहा के त्याग की प्रशंसा की तथा अभिनंदन का प्रस्ताव स्वीकार किया और इन्होंने उसे मान्यता दी। लेकिन इनकी इस नीति का भारत में तथा इंग्लैंड में गलत अर्थ लगाया गया।


सन्‌ १९२५ में उपर्युक्त सरकारी विज्ञप्ति की मुख्य धाराएँ बंगाल क्रिमिनल लॉ अमेंडमेंट बिल में सम्मिलित की गईं। स्वराज्य दल ने बिल अस्वीकार कर दिया किंतु सरकार ने अपने विशेष अधिकार से कानून पास करा लिया। इन्होंने राजनीतिक शस्त्र के रूप में हिंसा का प्रयोग करने की कटु आलोचना की और इस संबंध में दो पत्रक प्रकाशित किए। साथ ही इसी प्रकार का एक पत्रक इन्होंने सरकार के पास भी भेजा। सरकार ने इसे सहयोग की ओर पहला कदम समझा। इस दृष्टि से दोनों पक्षों में कुछ वार्ता शुरू होने की संभावना समझी जा रही थी कि ६ जून १९२५ को इनका देहावसान हो गया।


श्री चितरंजनदास के व्यत्तित्व के कई पहलू थे। वे उच्च कोटि के राजनीतिज्ञ तथा नेता तो थे ही, वे बँगला भाषा के अच्छे कवि तथा पत्रकार भी थे। बंगाल की जनता इनके कविरूप का बहुत आदर करती थी। इनके समय के बंग साहित्य के आंदोलनों में इनका प्रमुख हाथ रहा करता था। 'सागरसंगीत', 'अंतर्यामी', 'किशोर किशोरी' इनके काव्यग्रंथ हैं। 'सांगरसंगीत' का इन्होंने तथा श्री अरविंद घोष ने मिलकर अंग्रेजी में 'सांग्ज़ आव दि सी' नाम से अनुवाद किया और उसे प्रकाशित किया। 'नारायण' नामक वैष्णव-साहित्य-प्रधान मासिक पत्रिका इन्होंने काफी समय तक चलाई। सन्‌ १९०६ में प्रारम्भ हुए 'वंदे मातरम्‌' नामक अंग्रेजी पत्र के संस्थापक मंडल तथा संपादकमंडल दोनों के ये प्रमुख सदस्य थे और बंगाल स्वराज्य दल का मुखपत्र 'फार्वर्ड' तो इन्हीं की प्रेरणा और जिम्मेदारी पर निकला तथा चला। आपने "इंडिया फार इन्डियन" नामक प्रसिद्ध ग्रन्थ की रचना भी की थी।


राजनीतिक नेता के लिए आवश्यक सतत जूझते रहने का गुण इनमें प्रचुर मात्रा में विद्यमान था। ये परम त्यागी वृत्ति के महापुरुष थे। इन्होंने कवि का संवेदनक्षम हृदय और सज्जनोचित उदारता पाई थी। विरुद्ध पक्ष का मर्म-स्थान ढूँढ निकालने की असाधारण कुशलता इनमें थी। एक बार निश्चय कर लेने के बाद उसे कार्यान्वित करने के लिए ये निरंतर प्रयत्नशील रहते थे। इन्हें असाधारण लोकप्रियता मिली। बेलगाँव कांग्रेस में इन्होंने यह इच्छा व्यक्त की थी कि १४८ नंबर, रूसा रोड, कलकत्ता वाला इनका मकान स्त्रियों और बच्चों का अस्पताल बन जाए तो उन्हें बड़ी शांति मिलेगी। उनकी मृत्यु के बाद महात्मा गांधी ने सी.आर. दस स्मारक निधि के रूप में दस लाख रुपए इकट्ठे किए और भारत के इस महान्‌ सुपुत्र की यह अंतिम इच्छा पूर्ण की।


🪔 *मृत्यू*


जिस वक्त देशबंधु चितरंजन दास का राजनैतिक जीवन चरम पर था, उसी वक्त काम के बोझ तले उनका स्वास्थ्य बिगड़ गया। मई १९२५ में वो स्वास्थ्य लाभ लेने के लिए दार्जिलिंग चले गए, लेकिन उनका स्वास्थ्य बिगड़ता ही चला गया। इस बीच महात्मा गांधी भी खुद उनसे मिलने दार्जिलिंग आए थे। १६ जून १९२५ को तेज बुखार के कारण उनका निधन हो गया।


चितरंजन दास की अंतिम यात्रा कोलकाता में निकाली गई, जिसका नेतृत्व महात्मा गांधी ने किया। गांधी जी ने कहा, ”देशबंधु एक महान आत्मा थे। उन्होंने एक ही सपना देखा था… आजाद भारत का सपना… उनके दिल में हिंदू और मुसलमानों के बीच कोई अंतर नहीं था।”


देशबन्धु चितरंजन दास के निधन पर विश्वकवि रवीन्द्रनाथ ठाकुर ने लिखा-


एनेछिले साथे करे मृत्युहीन प्रान।

मरने ताहाय तुमी करे गेले दान॥


अपने निधन से कुछ समय पहले देशबन्धु ने अपना घर और सारी जमीन राष्ट्र के नाम कर दी। जिस घर में वे रहते थे, वहां अब चितरंजन दास राष्ट्रीय कैंसर संस्थान है। वहीं दार्जिलिंग वाला उनका निवास अब मातृ एवं शिशु संरक्षण केंद्र के रूप में राज्य सरकार द्वारा चलाया जा रहा है। दिल्ली का प्रसिद्ध आवासीय क्षेत्र 'सीआर पार्क' का नाम भी देशबंधु चितरंजन दास के नाम पर रखा गया है और यहाँ बड़ी संख्या में बंगालियों का निवास है, जो बंटवारे के बाद भारत आ गए थे। देशभर में उनके नाम पर कई बड़े संस्थानों का नाम रखा गया है। देशबंधु कॉलेज हो या फिर चितरंजन अवेन्यू ऐसे कई संस्थान हैं, जिनका देश को एक सूत्र में पिरोने वाले देशबंधु चितरंजन दास के नाम से पहचान मिली है।🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

*🙏🌹🙏 शत् शत् नमन🙏🌹🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

ज्येष्ठा मास,शुक्ल पक्ष, *षष्ठी*,मघा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, १६ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


         प्रगाढ़ सम्बंधों के लिए सुन्दर उपाय ...


१. यदि हम नहीं जानते हैं तो हमे पूछना चाहिये।

२. यदि हम किसी बात से सहमत नहीं है तो चर्चा करनी चाहिए।

३. यदि हमें कुछ प्रिय नहीं है तो बताइये।


किन्तु चुप रहकर किसी निर्णय अथवा निष्कर्ष पर नही पहुँचना चाहिए।

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*


  • ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आदर्श बोधकथा

 नक्की वाचा 👌🏻👌🏻१०१% आवडेल.


      एक खुप श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे ५-६ बंगले, 🏘 महागड्या गाड्या 🚘🏎🏍 त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. प्रत्येक दिवशी तो खुप सारा पैसा कमवत असे💳💰. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला.🛌 सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे.👹 तो माणुस थोडा दचकला. यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ आली आहे🕛. त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला १० करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या. त्यावर यमराज म्हणाले की, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला ५०💰 करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे.👪 त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात.तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो मला फक्त ५ मिनिट द्या.त्यावर परत यमराज म्हणाले. तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी,तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणुस खुप रडू लागला आणि म्हणाला मला काहीच संकेड द्या मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचं आहे. यावर यमराज म्हणाले हा लवकर लिहा जे लिहायचं आहे ते, त्यावर त्या श्रीमंत माणसाने लिहिलेलं ते पत्र.


            *प्रिय मित्रहो..*

  *आज माझ्याकडे खुप पैसा आहे. मला कश्याचीच कमी नाही आहे. पण तो पैसा काय कामाचा ज्याने मी माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा विकत नाही घेऊ शकत. मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट मी पैसा कामविण्यात घालवला. आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा मला देऊ नाही शकला. म्हणुन सांगतोय तुम्ही एन्जॉय करा. कुणी वेडा म्हटलं तरी चालेल पण आयुष्य बालपणासारख एन्जॉय करून जगा. शेवटी कमावलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली. जगा मनसोक्त जगा.*

          *मित्रानो माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा. आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ नाही शकत.*

 ➖➖➖➖➖➖➖

 *घरातून बाहेर पडताना आपल्या* *देवघरातील देवाला* *नमस्कार* *करूनच बाहेर पडा आणि घरी* *परत आल्यावरही देवाचं दर्शन* *घ्या. कारण तो भगवंत तुम्ही घरी* *यायची वाट पहात असतो.* *आपल्या घरी असा नियम बनवा* *की जेव्हा कधी तुम्ही घरातून* *बाहेर पडता, तेव्हा देवासमोर* *क्षणभर थांबून 'हे परमेश्वरा* *तुम्हीही माझ्यासोबत चला' अस* *म्हणां कारण* *- तुमच्या* *हातामध्ये* *भलेही* *लाखांच* *घड्याळ* *असेल परंतू त्यावर दाखवणारी* *वेऴ* *ही फक्त त्या*  *भगवंताच्याच हातात आहे...*


आवडलं तर शेअर करायला विसरु नका




🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

बेंजामिन फ्रेकलीन आकाशातील वीज संशोधन

 *💥⚡💥१५ जून १७५२💥⚡💥*

⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡

*वैज्ञानिक बेंजामिन फ्रँकलिनने आकाशातील वीज ही वीज असल्याचे सिद्ध केले*

⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡

बेंजामिन फ्रैंकलिन हे संशोधक, वैज्ञानिक, राजकीय विचारक, राजकारणी, लेखक, व्यंगकार होते. बेंजामिन फ्रैंकलिन यांनी संयुक्त राष्ट्रांचे प्रारुप आणि संविधान बनविण्यासाठी सहाय्य केले. तसेच  वैज्ञानिक कार्यामध्ये  इलेक्ट्रिसिटी, गणित आणि नकाशे बनवणे सामील आहेत. बेंजामिन फ्रैंकलिन सारखे लेखक आपल्या बुद्धी आणि ज्ञानामुळे आळखले जातात. त्यांनी रिचड्स यांचे अल्मनैक प्रसिद्ध केले. त्यांनी बायोफोकल ग्लास चा शोध लावला आणि पहिली यशस्वी अमेरिकन लेंडींग लायब्ररी ची स्थापना केली.


अमेरिकन इतिहासातील एक मोठे मिथक म्हणून आजही ज्याची नोंद आहे, ते म्हणजे बेंजामिन फ्रॅंकलिन आणि त्यांचा  पतंग. शाळेच्या पुस्तकातून आपण वाचत आलो, की बेन्जामिन महाशय एकदा बाहेर पडले असतांना, अचानक आलेल्या भर वादळात त्यांनी आपला पतंग उडवला आणि त्या पतंगावर वीज कोसळली. अशा प्रकारे बेंजामिन यांनी अपघाताने का होईना, विजेचा शोध लावला.


जर ती वीज खरोखरच त्या पतंगावर पडली असती, तर आमचे बेंजामिन महाशय त्यानंतर झालेल्या अमेरिकेच्या ऐतिहासिक स्वातंत्र्य जाहीरनाम्यावर सही करण्यास उपस्थित राहू शकले नसते. एवढेच नव्हे १७३२ ते १७५८ या काळात दर वर्षी प्रसिद्ध होणारे Poor Richard’s Almanac हे बेंजामिन यांनी टोपण नावाने लिहिलेले पंचांगही निघाले नसते. स्पष्ट म्हणायचे झाले तर त्या वादळी हवामानात पतंग उडवण्यातून त्यांचा वेडेपणा दिसून आला असता.


गंमत म्हणजे अशा प्रकारचा विजेचा प्रयोग करू पाहाणारा बेंजामिन हे काही पहिलेच शोधक नव्हते. आणि या संबंधातील सत्य काय ते काळजीपूर्वक तपासले असता असे आढळून आले की बेंजामिन यांच्या कोणत्याही खासगी डायरीत आपल्या या पतंग उडवण्याच्या प्रयोगाची नोंद नाही. 


एक मात्र खरे की फ्रॅंकलिन यांनी एक ऑक्टोबर १७५२ रोजी लिहिलेल्या एका पत्रात पतंग कसा तयार करावा आणि वादळाच्या वेळी कसा उडवावा, याचा  बारीकसारीक तपशील दिलेला आहे. एक उत्तम शास्त्रज्ञ या नात्याने त्यांनी असा कोणताही प्रयोग केल्याचे लिहून ठेवलेले नाही. आणि तसे त्यांनी केलेही नसते. त्यांनी जे काही तोंडी वर्णन केले, ते जोसेफ प्रिस्टले या तत्कालीन नावाजलेल्या संशोधकाने लिहून घेतले होते. ही नोंद इतिहासकारांना पुरेशी आहे.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

ज्येष्ठा मास,शुक्ल पक्ष, *पँचमी*,अश्लेशा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, १५ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"सच्ची साधना का अर्थ किसी को पकड़ना नहीं है, वरन् सारी पकड़ को एक साथ छोड़ना है। सारी अतियों से, सभी द्वंद्वों से ऊपर उठना-उबरना है। इस सच्ची साधना से जो अपनी चेतना की लौ को द्वंद्वों की आँधियों से मुक्त कर लेते हैं, वे उस कुंजी को पा लेते हैं, जिससे सत्य का द्वार खुलता है और तभी वह साधुता प्रकट होती है, जिसकी अलौकिक सुगंध से अनेकों दूसरी सुप्त और मुरझाई आत्माएँ भी जाग्रत् होकर मुस्कराने लगती हैं।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


सोमवार, १४ जून, २०२१

अरे अरे देवा कविता गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र


विषय : - बालदिनानिमित्त चित्र काव्यलेखण .

दि . १५ / ६ / २०२१ .


शिर्षक : - *अरे अरे दैवा ...* 


अरे अरे दैवा आमच्या

हातुन काय पाप घडले ?

नशिबी बालपणीच कष्ट

करण्याला भाग पडले .


श्रीमंताच्या या मुलांना

भारी गणवेश बुट असे

 उन्हाला कहार झालायं

अनवाणी पाय भाजतसे


शिक्षणाची ओढ फार

शिकावं वाटतं आम्हा

कुटूंबाच्या भाकरीचा

पडतोच प्रश्न हा पुन्हा


प्लास्टिक अणं भंगार

जमवण्याला भटकंती

चार पैसे मिळवता मग

वाटतेच मनाला शांती


हे विश्वंभरा कृपा करावी

प्रार्थना करतोत मनोमनी

दुःख असे कोणाच्याही

वाटयाला न येवो जिवनी .

कवि :)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

आर्यभट यांची आज जयंती निमित्त लेख

 #पृथ्वीस्वत:भोवती एकसारखी फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिन गती आहे हे सांगणारा पहिला शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांची आज जयंती 

ते भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते . ११ ऑगस्ट इ.स. ५१९ चे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिल्याबद्दल आर्यभट्टाना  काही काळ बहिष्काराला सामोरे जावे लागले होते. लोकांच्या अज्ञानामुळे आर्यभट्टास उपेक्षा भोगावी लागली.

आर्यभटानि  ० अंशापासून ते ९० अंशापर्यंत ३/१११ अंशाच्या फरकाने सर्व कोन घेऊन त्यांचे ज्यार्ध कसे काढावेत हे सांगितलेले आहे. तसेच पृथ्वी स्वत:भोवती एकसारखी फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिन गती आहे हे सांगणारा पहिला शास्त्रज्ञ होय. वर्षाचे दिवस ३६५, घटी १५, पळे ३९, विपळे १५ इतक्या सूक्ष्म भागांपर्यंत कालमापन नोंदवून ठेवले आहे. तसेच 'पाय' नावाची गणित संकल्पनेची किंमत ६३,८३२/२०,००० आहे असेही नोंदवले आहे सूर्य सिद्धान्तावर याने लिहिलेला एक टीका ग्रंथ 'सूर्य सिद्धान्त-प्रकाश ' या नावाने प्रसिद्ध आहे.

आर्यभट्ट यांना ग्रहणाची शास्त्रीय कारणमीमांसा ज्ञात होती. अमावस्येला सूर्यग्रहण व पौर्णिमेस चंद्रग्रहण यांचा संबंध चंद्र व पृथ्वी यांच्या सावल्यांशी आहे, हे त्यांना माहीत होते. तसे त्यांनी नोंदवून ठेवले आहे. पहिला आर्यभट्ट याने सूत्रांचा उपयोग खगोलशास्त्र विषयक ग्रंथांत मोठ्या प्रमाणावर केला. अशा ग्रंथांत आकडेमोड द्यावी लागते परंतु मजकूर तर मुख्यत्वे काव्यमय व यमकात असतो. मग संख्या पद्यात बसवण्यासाठी त्या अक्षराने निर्दिष्ट करायच्या व ती अक्षरे वृत्तात बसवून श्लोकात लिहावयाची असा मार्ग आर्यभट्टाने अवलंबला. त्यामुळे अक्षरसंख्या कमी होते, शिवाय वृत्तबद्ध लिखाण होते. त्यावेळी लेखनाची साधने उपलब्ध नसल्याने त्या संख्या अशा प्रकारे लक्षात ठेवणेही सोपे जात असे. जसे --वर्गाक्षराणि वर्गेऽ वर्गेऽ वर्गाक्षराणि कात्‌ ङ मौ यः । खद्विनवके स्वरा नववर्गेऽ वर्गे नवान्त्यवर्गे वा ॥ (विकिपीडिया मधून )

आर्यभट्ट यंचे कालखंडा बाबत तसेच जन्मठिकाणा बद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही 

खाली आयुका मधील पुतळ्याचा फोटो "

संकलन :)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

**************************************


दुःखाचे खरे कारण??

 


*🌹👉दुःखाचे खरे कारणं -  अपेक्षा* 


समजा आपण  एखाद्या दिवशी दोनशे रुपयांचा माठ  आणि अडीचशे रुपयांचा पुष्पगुच्छ घेऊन आलो आणि  घरी आल्या आल्या माठ हातातून पडून फुटला  तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण माठ इतक्या लवकर फुटेल अशी अपेक्षाच आपण केलेली नसते.

त्याउलट 250 रुपयांचा पुष्पगुच्छ संध्याकाळपर्यंत सुकला तरी आपल्याला वाईट वाटत नाही त्याचे कारण फुले सुकणारच हे आपल्याला माहीत असते .

माठ इतक्या लवकर फुटेल असे वाटले नव्हते आणि फुटला त्यामुळे आपल्याला दुःख झाले.

परंतु फूलांकडून ती टवटवीत राहण्याची अपेक्षाच नव्हती त्यामुळे ती सुकली तरी त्याचे दुःख झाले नाही.


 👉मतितार्थ असा आहे  की,

ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त त्याच्याकडून तितके दुःख वाट्याला येते आणि ज्याच्या कडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख नाही यामुळे कोणाकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवू नका आनंदी राहा मस्त रहा.

*🌹!! भवतु सब्ब मंगलम !!🌹*

👏👏🙏🙏💐💐🌹🌹

आपला दिवस ...

सुखमय , उल्हासवर्धक व आनंदी जाओ ...


*शुभेछूक :*

  गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 


आठवणीचा पाऊस कवी गजानन गोपेवाड

 🌹अवकाळी पाऊस 🌹


आज अचानक त्याच आगमन

मोठया झपाट्यानं झालं होत

गारीच,वादळाचआणि विजेचा चमकिन 

ढगाच ढोल वाजत आलं होत


असं कधी तो नेहमी याच

आज मात्र जरा वेगळं रूप पाहिलं

रागात असावा जणू काही

सार काही हानी हानी करून गेलं


आठवणीच ठरल तो पाऊस

सर्वांच्या मनी भीती दाटविणारा

काळ कसा येतो जणू

सार जीव घेऊ पाहणारा


त्याला आवर घालणार

कुणी तरी आहे का

त्याला शांत करण्याची

बळ कुणात नाहीका


हात जोडूनि मी विनवणी केली

तरी राग त्याच्या प्रत्येकावर होता

मानवाणीच केल सार काही

असा ओरडून सांगत होता


माझ्या जीवाला भावला

तो वेडा पिसा पाऊस जणू

त्याच्या रागभरात भावना

आणि काय मी जाणू

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 



व्यथा शेतकरी गजानन गोपेवाड

 *सप्तरंग काव्यस्पर्धा*

*वऱ्हाडी कविता -*

*शिर्षक - व्यथा शेतकऱ्याची*

काय सांगु तुले बा

व्यथा शेतकऱ्याची

अन कास्तकाराची

गाथा गरीबीची... !!

सरकी खत अन

 बी मायगाच

 मायगाच्या जमान्यात

 ससत कवा वायाच... !!

 मनामदी माह्या बाप

 एकच गिरवतो कित्ता

  मिरगाच्या पावसाची

  लागली चिंता... !!

 बंदयाच आवडात

सरकी का सोयाबिन

तूरच पेराव मनतो

साऱ्या वावरातीन... !!

अमदाच्या सालात

गराडान घातल थैमान

 मिरगाचा पावस

मावरच लई बैमान... !!

 म्या फाडतो आता

सारे पेरणी डोबणीले

येसीन त ये बा नायत

 येजो सरणाले.... !!

 जेथ पाव तेथ पैसा

 अदल्याचा बजार

  चोपणले वाई कराले

पुडल्या सालात दाहजार... !!

 अन्नाचा घास नाय

 भेटत जीवाले

अमदाच साल सारे

 पाये आभायाले.... !!

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 


कविता आठवणीचा पाऊस

 🌦️*आठवणीतला पाऊस*🌦️

🐛🍃☔☂️🌲🌱🐛

_________________________


  घोंगवणाऱ्या माट्यासह

सुसाटयाचा वारा

उंच उंच उडे गगनी

पाला आणि पाचोळा


वेग वाऱ्याचा

पडझड पानांची

घराकडे धाव

राबणाऱ्या पावलांची


अचानक गडगडाट

कडकडाट विजांचा

रिमझिम रिमझिम

पाऊस पडू लागे थेंबाचा


पावसाच्या थेंबानी

धरणी झाली चिंब

मातीच्या सुगंधाने

उन्मादला सांड


सुखावली वसुंधरा

बहरले सारे रान

वनराईत मयुर नाचे

पिसारा फुलवून छान


डराव डराव करी

बेडूक बिळात

बळीराजाची तिफन

चाले शेतात


आवासून चातकाने

पाहिलेली वाट

पहिला थेंब गिळून

सुरू झाली बरसात


चहूकडे बहरले रान

झाले पशु,पक्षी तृप्त

उन्हाची ल्हाई संपली

पडता पहिला नक्षत्र


सुगी झाली सुरू

जनमनाची लगाबगाई

पहिला पाऊस पडला

गड्या चाला घाई घाई


समज आली तेव्हाचा

हा आठवणीतला पाऊस

आली सर बिलगून

झाली भिजण्याची हाऊस

*🐸🪳🌱🪴🎋🌴🌳


कवि, गजानन गोपेवाड 



रविवार, १३ जून, २०२१

क्षय म्हणजे काय तो बरा होतो का


═════════════

   @ संकलन:गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

═════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📙 *क्षयरोग (टीबी) म्हणजे काय ?*

       *तो बरा होतो का ?* 📙 

       

क्षयरोग वा टीबी म्हटलं म्हणजे अजूनही काही जणांना भीती वाटत असेल. सुदैवाने आज क्षयरोग हा तेवढा भयंकर रोग राहिलेला नाही. १९४० पर्यंत क्षयरोगावर पुरेशी औषधे उपलब्ध नसल्याने हा रोग असाध्य असाच होता. माधवराव पेशवे हे क्षयरोगाने वारले. पंडित नेहरूंची पत्नी देखील क्षयरोगाने वारली. यावरून त्या काळातील क्षयरोगाची भयानकता लक्षात येईल. आज मात्र तो खात्रीने बरा होतो.


मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जंतूमुळे हा रोग होतो. हा रोग सामान्यतः फुप्फुसांना होतो. शरीरातील लिम्फग्रंथी मेंदू, मणके, हाडे, त्वचा, आतडे, यकृत अशा इतर अवयवांनाही क्षयरोग होऊ शकतो. फुप्फुसाचा क्षयरोग खूप महत्त्वाचा, यासाठी की तो एकापासून दुसऱ्याला होऊ शकतो. भारतात दर हजार लोकसंख्येमागे क्षयाचे चार ते पाच रोगी सांसर्गिक अर्थात रोग प्रसार करणारे असतात. क्षयरोगाच्या बेडक्यात क्षयाचे जंतू असतात. थुंकताना, खोकताना, बोलताना ते हवेत सोडले जातात. निरोगी व्यक्तीच्या श्वासाबरोबर हे जंतू फुप्फुसात प्रवेश करून त्या व्यक्तीला क्षयरोग होतो. शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवरच हा रोग होणे वा न होणे अवलंबून असते. क्षयाच्या रुग्णात खोकला व बेडका कधी कधी बेडक्यात रक्त पडणे, ताप येणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, दम लागणे, रात्री घाम येणे ही लक्षणे दिसून येतात. बेडक्याच्या तपासणीद्वारे या रोगाचे खात्रीने निदान होऊ शकते. काही वेळा क्ष-किरण तपासणी व रक्ताची तपासणी करतात. 


क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर तात्काळ उपचार सुरू केल्यास क्षयरोग सहा महिन्यांत बरा होतो. कधी कधी नऊ ते बारा महिने उपचार घ्यावे लागतात. क्षयरोगाची आपल्या देशातील कारणे पाहिल्यास त्याचे मूळ आपल्याला दारिद्र्य व पर्यावरण अस्वच्छतेत सापडेल. त्यामुळे जोपर्यंत देशाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही तोपर्यंत क्षयरोगावर कायम स्वरूपी तोडगा निघणे अशक्यच आहे. 

क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी लहान मुलांना बीसीजीची (क्षयरोग प्रतिबंध लस) लस देणे, पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला, बेडका, ताप असलेल्या रुग्णांच्या बेडक्याची तपासणी करून तात्काळ उपचार सुरू करणे; रुग्णांने खोकताना तोंडावर रुमाल ठेवणे, इतस्तः बेडके न टाकणे; हे उपाय करणे आवश्यक ठरते.


 एड्स झालेल्या ७०% व्यक्तींना क्षयरोगाची लक्षणे दिसतात. त्यामुळे एड्सच्या वाढत्या प्रसाराबरोबर क्षयरोगही वाढत जाण्याची शक्यता आहे. क्षयरोग प्रतिबंध व एड्स प्रतिबंधाचे उपाय यासाठीच एकत्रितपणे राबवले के गेले पाहिजे. दरवर्षी देशात साडेसहा लाख लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी व्यक्ती, समाज व देश अशी सर्वच पातळ्यांवर भरीव प्रयत्न होणे गरजेचे आहे.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═════════════



विनायक पांडुरंग करमरकर स्मृतिदिन

 *विनायक पांडुरंग करमरकर,*

   ऊर्फ नानासाहेब करमरकर,

🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎

 *जन्म -) २ ऑक्टोबर  १८९१;* 

सासवणे,रायगड जिल्हा-महाराष्ट्र

 *मृत्यु -) १३ जून  १९६७*

🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎      

       हे मराठी शिल्पकार होते. मुंबईच्या सर जे.जे.कला विद्यालयात ते शिल्पकला शिकले.शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६२ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.


*कार्य*

भारतातील वास्तववादी शिल्पकारांमधील अग्रगण्य शिल्पकार म्हणून महाराष्ट्रातील नानासाहेब ऊर्फ विनायक पांडुरंग करमरकर ख्यातनाम आहेत. अश्र्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझमधील साडेतेरा फूट उंचीचा एकसंध पुतळा त्यांनी घडवला. अशा प्रकारचा पुतळा घडवणारे ते भारतातील पहिले शिल्पकार ठरले. सजीवता आणि सादृश्यता ही त्यांच्या शिल्पांतील वैशिष्ट्ये मानली जातात.


*जीवन*

करमरकरांचा जन्म इ.स. १८९१ साली महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सासवणे इथे झाला. समुद्रकिनारी वसलेल्या या गावातच त्यांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा उद्योग होता. त्यामुळे चित्र काढण्याचा नाद असलेल्या करमरकरांना मूर्ती घडवण्याचेही शिक्षण घरीच मिळाले. गावातील देवळाच्या भिंतीवर त्यांनी काढलेले शिवाजी महाराजांचे चित्र पाहून ऑटो रॉथफिल्ड या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याने पुढाकार घेऊन त्यांना मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल केले.


*व्यावसायिक कारकीर्द*

मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी कलकत्ता इथे स्टुडिओ थाटून व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्या काळात त्यांनी रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजनदास, महात्मा गांधी, पी.सी. रे प्रभृतींची व्यक्तिशिल्पे घडवली. त्यानंतर 'लंडन रॉयल अ‍ॅकेडमी'मध्ये पुढील शिक्षणासाठी गेल्यावर त्यांना इटली, फ्रान्स, स्वित्झरलंड या देशांमधील कलाकृतींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. तसेच ब्राँझ कटिंग, 'स्टोन क्रशिंग' ही तंत्रेही आत्मसात करून १९२३ साली ते कलकत्यास परतले.


*व्यावसायिक यश*

इ.स. १९२४ साली कलकत्यातील ईडन गार्डनमध्ये 'सोसायटी ऑफ आर्टिस्ट्‍स'च्या वतीने आयोजित केलेल्या प्रदर्शनात करमरकरांची 'शंखध्वनी' ही कलाकृती प्रदर्शित झाली आणि त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे त्यांनी मुंबईत देवनारला स्टुडिओ उभारला. याच काळात पुण्यातील 'श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल' मधील शिवाजीचा अश्र्वारूढ एकसंध 'पुतळा' ब्रॉन्झमध्ये बनवायची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आणि त्यासाठी १९२५ साली ते मुंबईत आले. त्यानंतर मुंबईतच त्यांचे वास्तव्य कायम राहिले. 'एका पुतळयाची आत्मकथा' या आपल्या लेखात या अवाढव्य पुतळयाच्या निर्मितीची पूर्ण कहाणी करमरकरांनी वर्णन केली आहे. या आठ टन वजनाच्या आणि साडेतेरा फूट उंच पुतळयाच्या ओतकामाचे कार्य मुंबईतील माझगाव डॉकमध्ये झाले. आपले सगळे तांत्रिक कौशल्य, अध्ययनशीलता, आत्मविश्र्वास पणास लावून आणि सहकाऱ्यांसमवेत अथक परिश्रम करून त्यांनी ही शिल्पाकृती साकार केली, आणि इतका प्रचंड एकसंध पुतळा ब्रॉन्झमध्ये घडवणारे भारतातील समकालीन शिल्पकारांमधील ते पहिलेच शिल्पकार ठरले. हा पुतळा रेल्वे वॅगनमधून पुण्यात नेला गेला व १९२८ साली त्याची स्थापना झाली. पुतळा पुण्याला आणताना कमी उंचीचा बोगदा आला की आगगाडी थांबवून पुतळा थोडा तिरपा करत आणि गाडीने बोगदा पार केला की परत सरळ करीत. या स्मारकशिल्पामुळे करमरकरांची अग्रगण्य शिल्पकारांमध्ये गणना होऊ लागली.


या संस्मरणीय कामगिरीनंतर करमरकरांनी अनेक उत्तमोत्तम कलाकृती घडवल्या. विठ्ठलभाई पटेल, आचार्य कृपलानी, ऑटो रॉथफिल्ड यांच्या पुतळ्यांसह त्यांची 'मत्स्यगंधा', 'मोरू' ,'प्रवासी', नमस्ते' आदी शिल्पेही लक्षणीय ठरली. याव्यतिरिक्त करमरकरांनी भारतातील अनेक संस्थानिक व त्यांच्या घराण्यातील व्यक्तींचीही शिल्पे घडवली.


'नानासाहेब' या आदरार्थी संबोधनाने परिचित असलेल्या करमरकरांचे कौशल्य लक्षात घेऊन १९४९ साली त्यांना अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विश्र्वविद्यालयात प्रात्यक्षिकाकरिता निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या शिल्पकलेतील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने १९६२ साली त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले. तसेच १९६४ साली ललित कला अकादमीने त्यांना फेलोशिप देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.


१९३० च्या दशकात रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीजवळील वाघ्या कुत्र्याच्या पुतळाही करमरकरांनी बनवला होता.


या थोर शिल्पकाराचे १९६६ साली म्हणजे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.


*करमरकर शिल्पालय*

अलिबाग ते मांडवा रस्त्यावर आवास फाट्यापासून तीन किमी अंतरावर नानासाहेब करमरकर शिल्पालय आहे. हे सासवणे गावात आहे. येथे सुमारे दोनशे कलाकृती आहेत.


*करमरकरांचे चरित्र*

सुहास बहुळकर यांनी ‘शिल्पकार करमरकर‘ या नावाचे चरित्र लिहिले आहे.

========================

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

संकलन :-गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

ज्येष्ठा मास,शुक्ल पक्ष, *तृतीया*,पुनर्वसु नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, १३ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"सत्य वह पूंजी है, जिसे पहले व्यय करना पड़ता है किन्तु जीवन भर आनंद की प्राप्ति होती है। जबकि असत्य  ऋण है, जिससे क्षणिक सुख प्राप्त तो हो जाता है किंतु आजीवन ब्याज सहित ऋण चुकाना पड़ता है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*श्री महाराणा प्रताप जयंती*


शनिवार, १२ जून, २०२१

पिठात किडे का पडत नाही

 *ब्रँडेड पिठ* 

पिठात किडे का होत नाहीत हे प्रश्न आपल्याला कधी न कधी पडला असेल परंतु पण या कडे जास्त लक्ष दिले नसेल.

                              आपण एक प्रयोग करा की गव्हाचे पीठ दळून आपण ते 2 महिन्यांपर्यंत संचयित करण्याचा प्रयत्न करा,

 पिठात किडे होणे नैसर्गिक आहे, आपण पीठ ठेवू शकणार नाही.

 मग हे मोठे ब्रँड पीठ ठेवण्यास सक्षम कसे आहेत?  ही विचार करण्यासारखी बाब आहे.

 एक रसायन आहे:

 बेंझोयल्पर ऑक्साईड, ज्याला 'फ्लोअर इंप्रूव्हर' म्हणून देखील ओळखले जाते.  त्याची परवानगी मर्यादा 4 मिलीग्राम आहे,

 परंतु पीठ तयार करणार्‍या कंपन्या 400 मिलीग्रामपर्यंत ढकलतात.(जसे मॅगी मध्ये प्रमाणापेक्षा जास्त सिसे नावाचे तत्व सापडले होते.)

 कारण काय आहे?  पीठ खराब होण्यापासून दीर्घकालीन संरक्षण.

 नक्कीच, ग्राहकाची मूत्रपिंड बँड वाजली पाहिजे.

 अशी व्यवस्था केली गेली आहे की रस्त्याच्या कोपऱ्यापासून शहरापर्यंत आपल्याला रक्त तपासणी प्रयोगशाळा मिळेल परंतु पीठ आणि दुधाची तपासणी करण्यासाठी तुम्हाला एकसुद्धा मिळणार नाही.

 प्रयत्न करा आणि थेट शेतकऱ्यांकडून गहू,दूध व इतर शेतमाल खरेदी करा आणि मात्र पीठ स्वतः घरी दळूनच खा.

 *ताजी खा आणि निरोगी रहा* 

 *आपलं कुटुंब सुरक्षित ठेवा* 

शास्त्रानुसार पीठ(आटा)वेळ

 थंड दिवसात 30-83 दिवस

 उन्हाळ्यात 20-22 दिवस

 पावसाळ्यात 15-25 दिवस नमूद केले गेले आहेत.


जैविक शेतकरी

श्रीधर आजगांवकर वैधकशास्त्र स्मृतिदिन

 *🕳️👳🏻‍♂️👳🏻‍♂️श्रीधर आजगावकर👳🏻‍♂️👳🏻‍♂️🕳️*

👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️

*👳🏻‍♂️👳🏻‍♂️👳🏻‍♂️वैद्यकशास्त्रज्ञ👳🏻‍♂️👳🏻‍♂️👳🏻‍♂️*

👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️

*स्मृतिदिन - १२ जुन १९९४*


डॉ. श्रीधर शांताराम आजगावकर यांचा जन्म, तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवणमध्ये झाले. इंटर सायन्सपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत व वैद्यकीय शिक्षण पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झाले. त्यांनी उच्च वैद्यकीय शिक्षण डब्लिन व विएन्ना येथे घेतले. त्यांनी ‘डोळ्यांचे विकार’ या विषयात प्रावीण्य मिळविले. त्यानंतर मालवणला येऊन त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. पण ढोबळ व्यवसायापेक्षा वाचन व संशोधन यांत त्यांना विशेष रस वाटे. मालवणला १५ वर्षे व्यवसाय करत असताना, त्या काळात त्यांचे काका व वडील मधुमेहाने वारले. त्या वेळी भारतात मधुमेहाविषयी खास माहिती नव्हती. रुग्णही फार कमी होते. त्यामुळे आजच्यासारखे खास मधुमेहतज्ज्ञही नव्हते. आपले काका व वडील मधुमेहाने वारल्यामुळे डॉ.आजगावकरांना मधुमेहाविषयी कुतूहल वाटले व नंतर जिद्दीने त्या रोगावर  काम करण्यासाठी ते मुंबईत आले.


मुंबईत आल्यावर ते ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयामधील वैद्यकशास्त्राचे तज्ज्ञ डॉ.रा.वि. साठे यांना भेटले. डॉ.साठेंमध्ये त्यांना गुरू भेटला. डॉ.साठेंनी त्यांना सांगितले, ‘‘पश्चिम महाराष्ट्रात मला आता मधुमेही दिसू लागले आहेत. पण त्यांच्यावर उपचार करायला कोणी डॉक्टर नाहीत. तुम्ही नेत्रविशारद म्हणून काम न करता, मधुमेहावर लक्ष केंद्रित करा. चाचण्या, उपचार शोधून काढा.’’ १९४५ साली आजगावकरांनी नेत्रविकारतज्ज्ञ म्हणून करत असलेला व्यवसाय थांबवला आणि मधुमेहावर काम सुरू केले. त्या काळी अशी ध्येयाने प्रेरित झालेली खूप माणसे असायची. डोळ्याचे मर्यादित क्षेत्र सोडून मधुमेहासारखे विशाल क्षेत्र संशोधनाला मिळाले म्हणून डॉ.आजगावकर खूप समाधानी होते. संशोधन चालू असताना त्यांच्या लक्षात आले, की दृक्पटलावर (रेटायना) काही बदल दिसून आले होते, ते रुग्णाला झालेल्या मधुमेहामुळे असावेत. जसे वाचन व संशोधन वाढले, तसे त्यांच्या लक्षात आले की मधुमेह हा सर्व शरीरव्यापी रोग आहे. त्याचा शरीरावर होणारा प्रसार वेळीच नियंत्रित केला पाहिजे. त्यासाठी ते आयुर्वेदाकडे वळले. आयुर्वेदाने मधुमेहाबद्दल काय विचार केला आहे, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. आयुर्वेदातील जसद भस्माच्या उपचारपद्धतीचा डॉक्टरांनी अ‍ॅलोपथीच्या पद्धतीने अभ्यास सुरू केला. हे सर्व प्रयोग त्यांनी डॉ.साठेंच्या मार्गदर्शनाखाली जे.जे. रुग्णालयात केले. १९४५ ते १९६० या कालावधीत डॉ.आजगावकर सातत्याने मधुमेहावर काम करत होते. १९४८ साली प्रायोगिक पद्धतीवर त्यांनी स्वत:चे केंद्र सुरू केले. १९६० साली जे.जे. रुग्णालयात मधुमेह उपचाराचे केंद्र सुरू झाले. डॉ.आजगावकरांनी डॉ.साठेंचे स्वप्न पुरे केले. या केंद्रामुळे मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर्स तयार झाले. डॉ.आजगावकरांच्या संशोधनास १९६० साली ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने मान्यता दिली.


आजगावकरांचे कार्य ‘रोग्यांवर फक्त उपचार करणे’ एवढ्यापुरते मर्यादित नव्हते. त्या काळी सामान्य लोकांना मधुमेहाविषयी काहीच माहिती नव्हती. लोकांना मधुमेहाची सबंध माहिती देऊन सज्ञान करणे आवश्यक होते. ते काम त्यांनी हातात घेतले. मधुमेहाची लक्षणे कोणती, त्याचे निदान पक्के करण्यासाठी काय चाचण्या करायच्या, औषधे कोणती व कधी घ्यायची, आहारावरील पथ्ये काय असावीत, व्यायाम कसा, केव्हा व किती करायचा, ही सर्व माहिती त्यांनी भाषणरुपात देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मुंबई आणि नंतर सबंध भारतात फिरुन ते भाषणे देत असत. त्यासाठी त्यांनी स्लाइड्स केल्या होत्या व स्वत:चा स्लाइड प्रोजेक्टर बरोबर घेऊन जात असत. भाषणे मराठी व इंग्रजीतून असत. विशेषत: वैद्यकीय महाविद्यालये, इंडियन मेडिकल कौन्सिल व सामाजिक संस्था यांमध्ये जाऊन त्या काळी नवीन असणाऱ्या या रोगाविषयी माहिती देणे त्यांना फार आवडे. जणू या प्रेषणकार्याचे त्यांनी व्रतच घेतले होते. या कार्यात मानधनाची अपेक्षा न करता, त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते.


त्यांनी तज्ज्ञांसाठी चर्चासत्रे आयोजित केली. या कार्याची व्याप्ती वाढल्यावर त्यांनी ‘डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीझ’ची स्थापना केली. या संस्थेत त्यांनी कार्यवाह, उपाध्यक्ष, अध्यक्ष अशा निरनिराळ्या पदांवर काम केले. भारताच्या वेगवेगळ्या राज्यांत या संस्थेच्या ३२ शाखा काढल्या.


आजगावकरांनी मधुमेहावर मराठी व इंग्रजीत पुस्तके लिहिली. या पुस्तकांना पाठ्यपुस्तकांचे महत्त्व प्राप्त झाले. डॉक्टरांनी पुढाकार घेऊन मुंबईतील माहीम येथे खास मधुमेहींसाठी २०० खाटांचे अद्ययावत रहेजा रुग्णालय काढले.


‘आंतरराष्ट्रीय मधुमेह संस्थे’च्या कार्यकारिणीचे ते १९६४ सालापासून सभासद होते. त्यानंतरच्या २६ वर्षांमधील सर्व वार्षिक परिषदांना त्यांची उपस्थिती होती. त्यांच्या प्रयत्नाने १९७६ साली दिल्लीत आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद भरली होती. त्या परिषदेत आंतरराष्ट्रीय संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली व पुढे १९७९ साली अध्यक्ष म्हणूनही निवड झाली.


मराठी विज्ञान परिषदेच्या स्थापनेपासून (१९६६) ते परिषदेशी निगडित होते. कार्यकारिणी सभासदापासून विश्वस्त व सन्माननीय सदस्य अशी वेगवेगळी पदे त्यांनी भूषविली.


१९५२ साली आजगावकरांच्या पत्नीचा मृत्यू झाला.त्यानंतर त्यांनी मधुमेहाच्या संस्था, *‘मराठी विज्ञान परिषद’, ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’* इत्यादी संस्थांसाठी आयुष्य वेचले. - डॉ. शशिकांत प्रधान

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन-)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

ज्येष्ठा मास,शुक्ल पक्ष, *द्वितीय*,आद्रा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, १२ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"त्रुटियां कोई हो, किसी की हो किन्तु दूसरों को दोष देना, हमारा स्वभाव है। हम गिरने पर पत्थर को, डूबने पर पानी को, जलने पर आग और कुछ न कर पाने की स्थिति में भाग्य को दोष देते हैं। दूसरों को दोष देने का अर्थ है कि स्वयं की त्रुटियों को स्वीकार करने की सामर्थ्य न होना और अपने में सुधार की भावी संभावनाओं को स्वयं अपने हाथों से नष्ट कर देना।*

       *स्वयं के जीवन में दोष होने से भी ज्यादा घातक है, दूसरों को दोष देना। क्योंकि इसमें समय का अपव्यय व आत्मप्रवंचना दोनों होते हैं।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...