शुक्रवार, ४ जून, २०२१

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

वैशाख मास,कृष्ण पक्ष, *दशमी*,उ.भा.नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, ०४ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"धन की तरह ख्याति और मान-प्रतिष्ठा की महत्वाकांक्षा भी संसार में भारी विपत्ति उत्पन करने वाली सिद्ध होती है। पद, सत्ता और अधिकार के लोभ में उतने ही अनर्थ होते हैं, जितने धन-लिप्सा से होते हैं। सच बात यह है कि बिना पदाधिकारी बने कोई भी व्यक्ति किसी संस्था की अधिक ठोस सेवा कर सकता है, पर लोगों को सेवा की नहीं, प्रतिष्ठा की भूख रहती है, फलस्वरूप सार्वजनिक संगठनों को कलह का अखाड़ा बनाते और दुर्गतिग्रस्त होते आए दिन देखा जाता है।"*


          *श्रीराम शर्मा आचार्य जी*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Tree plantains

 *वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.......!*

*पक्षीही सुस्वरे आळविती.......!!*


जागतिक पर्यावरण दिन,  शनिवार 05 जुन 2021


झाडे,पाने,फुले,पक्षी,प्राणी नदी-नाले,जंगल यांची कायमची मैत्री असते.परंतु या अनोख्या मैत्रीत आपलाही सहभाग व्हावा या हेतूने माननीय संतोषभाऊ तिरमकदार यांनी निसर्गाशी एकरूप होण्यासाठी 5 मे जागतिक पर्यावरण दिन निवडला.खरंतर उन्हाळा संपला की पाऊस बरसणारच हे जितके सत्य आहे तितकेच फुलांचं फुलणं झाडांनी फळ देणं आहे. वेगळ्या प्रकारची फुले,मधमाशा, फुलपाखरे,वटवाघुळ असे हजारो जीव आपल्या परिसरात पाहण्यासाठी ही छोटेखानी बाईक रॅली निघणार आहे.त्यात आपण इच्छेने भाग घ्यायचा आहे.केवळ चित्रपटात निसर्गरम्य वातावरण पाहून मन मोहित होण्यापेक्षा प्रत्यक्षात उघड्या डोळ्यांनी असे अनेक दृश्य पाहून मनमुराद आनंद लुटूयात.आणि पर्यावरणाशी घट्ट नाते बांधूयात. आणि सर्वांच्या प्रयत्नातून निसर्गाचे रक्षण आणि जाणीव जागृती करूया.

पृथ्वी ती अनेक रत्नांची खाण आहे.येथील जीवसृष्टी किती अनोखी आहे. तिला कितीही वेळा पाहिलं तरी एखाद्या प्रियसी प्रमाणे प्रत्येक वेळी तिचं रूप मनमोहक करणार असतं.

चला तर मग स्वतःचे आयुष्य जगूया......!

निसर्गाच्या सानिध्यात जाऊया....!!


विशेष उपस्थिती 


मा. आत्माराम माटाळकर 

 - महागाव


मा. हेमंत ऊबाळे , RFO वन्यजिव,महागांव


मा. राजकुमार कोंडलवाडे , ऊमरखेड 

मा. अशोक लांडगे ऊमरखेड 


ऊमरखेड वरुन निघण्याची जागा गजानन गोपेवाड सर यांच्या घरून, ऊमरखेड 


वेळ - सकाळी ठीक 7:00 वा.


जंगल सफारीचा मार्ग - ऊमखेड ते, चुरमुरा रोड 


*प्रवासाला जाण्यासाठी साहित्य*


१)स्वतचा जेवणाचा डबा आणि पिण्याचे पाणी.

२)घरी जमा केलेल्या अनेक प्रकारच्या फळांच्या बिया.

३) नोंदवही तसेच पक्षाच्या माहिती विषयी असलेले एखादे पुस्तक सोबतीला घेणे.

4) स्वतःची मोटार सायकल सोबत एक सहप्रवासी असल्यास प्राधान्य 

5) कोव्हीड संदर्भातील नियम शिष्टाचाराचे पालन करावे.

6) पक्षी, प्राणी, जंगल निरीक्षणासाठी नोंदवही. फोटो चित्रिकरणासाठी कॕमेरा अथवा मोबाईल.

7) जमेल तेवढ्या जास्त विवीध फळझाडांच्या बिया, ईत्यादी


🙏🏻विनीत🙏🏻

Agnipankh foundation Maharashtra, umarkhed 445206

State Co ordinates 

Gajanan gopewad 



🌳🌴निसर्ग पर्यटन परिवार🌴🌳


टीप - पावसा मुळे काही व्यत्यय आल्यास आपणास कळविण्यात येईल.


गुरुवार, ३ जून, २०२१

अतुल चिटणीस संगणक शास्त्रज्ञ

 *🖥️🖥️🖥️अतुल चिटणीस🖥️🖥️🖥️*

🖱️⌨️🖱️⌨️🖱️⌨️🖱️⌨️🖱️⌨️🖱️

*भारतीय संगणक अभियंता*

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

*स्मृतिदिन - ३ जून २०१३*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

अतुल चिटणीस (२० फेब्रुवारी १९६२ - ३ जून २०१३ ) हे जर्मनीत जन्मलेले भारतीय संगणक अभियंता होते. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सना "लिनक्‍स सॉफ्टवेअर' वापराची ओळख करून देण्याचा मान प्रथम चिटणीस यांच्याकडे जातो. त्यांनी प्रसिद्ध नियतकालिक "पीसीक्वेस्ट'साठी सहा वर्षे सल्लागार संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

कारकिर्द

तंत्रज्ञानामुळे पारदर्शक कारभाराची गुरूकिल्ली हाती येते ; तरी कित्येकदा तंत्रज्ञानही मक्तेदारीमध्ये जखडून ठेवण्याची खेळी प्रस्थापितांकडून केली जाते. या जोखडातून कम्प्युटर तंत्रज्ञानाची सुटका करून ते सर्वांना उपलब्ध व्हावे ,याचा पाठपुरावा करण्यात ओपन सोर्सचे प्रणेते अतुल चिटणीस यांनी आपली कारकीर्द घडवली. फ्री आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे प्रणेते म्हणून १९९४पासून अतुल चिटणीस हे नाव भारताला ठाऊक झाले. साधारण त्याच काळात उद्योगव्यवहारांमध्ये वह्यापेन्सिली आणि कागदी फायलींची जागा कम्प्युटर घेऊ लागला होता. कदाचित त्यावेळी , सॉफ्टवेअर कुणा कंपन्यांच्या मक्तेदारीत बांधलेले नसावे , या विचाराचे मोल सर्वांना तितकेसे उमजत नसावे. नंतर भारतीय भाषांच्या वापरातील अडचणी , परवान्यासाठी मोजावी लागणारी किंमत तसेच भारतीय डेटाची सुरक्षितता व परावलंबित्वाचे प्रश्न यामुळे ओपन सोर्सची गरज सर्वांना पटू लागली. अतुल चिटणीस यांनी मात्र १९८०पासूनच कम्प्युटर तंत्रज्ञानावर हुकुमत मिळविली होती. त्यामुळेच लिनक्स सॉफ्टवेअर तसेच फ्री व ओपन सोर्सचा नारा त्यांनी पुकारला. अतुल यांचे वडील भारतीय , तर आई जर्मनीची. त्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षणही बर्लिनमध्ये झाले. त्यानंतर मात्र त्यांचे शिक्षण बेळगाव मिलिटरी स्कूलमध्ये झाले व गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी बीई-मेकॅनिकल केले. वर्षभरातच त्यांचा प्रवास कम्प्युटरनिगडित तंत्रज्ञानाकडे झाला. कम्प्युटरनिगडित अनेक गोष्टींचा प्रथम पुरस्कार त्यांनी केला. मोडेमचा वापर शिकविला. इंटरनेटचा प्रसार होण्यापूर्वीच्या काळात डेटाकम्युनिकेशन ,नेटवर्किंग यांची सुरुवात त्यांनी केली. सीआयएक्स- बुलेटिन बोर्ड सिस्टिम ही भारतातील पहिली ऑनलाइन सेवा त्यांनी सुरू केली. ऑनलाइन संपर्क आणि समूहसंवादाचे ते आद्य माध्यम होते. १९९३ ते १९९७ या काळात त्यांनी पीसी-क्वेस्ट या कम्प्युटरआधारित नियतकालिकातून कम्प्युटरजागृतीचा वसा घेतला. भारत सरकारने बुलेटिन बोर्ड सिस्टिमला करांच्या कक्षेत आणण्याचा घाट घातला असताना चिटणीस यांनी इलेक्ट्रॉनिक चळवळीद्वारे त्यावर प्रहार केले. ही पहिलीच ऑनलाइन चळवळ यशस्वी ठरली. विविध व्यासपीठांवर त्यांनी लिनक्स आणि ओपनसोर्सविषयी जनजागरण केले. २१व्या शतकातील नव्या तंत्रज्ञानानुसार त्यांनी मोबाइल कम्प्युटिंग , कन्व्हर्ज्ड कम्युनिकेशन यांतही उडी घेतली. पीसी क्वेस्टचे सल्लागार संपादक म्हणून विपुल लिखाण केले. ते स्वतः हौशी संगीतकारही होते व संगीताची तंत्रज्ञानाशी सांगड घालण्याचे कसबही त्यांच्या अंगी होते. रेडिओव्हर्व हे इंटरनेट रेडिओ स्टेशन त्यांनी सुरू केले होते. त्यांच्या अकाली निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.  त्यांना कर्करोग झाल्याचे निदान ऑगस्ट २०१२ झाले होते. त्यांचे केमोथेरपीच्या उपचारादरम्यान ३ जून २०१३ रोजी निधन झाले.


संकलन -)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

वैशाख मास,कृष्ण पक्ष, *नवमी*,पू.भा.नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, ०३ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"हम सब के पास समय है और यह हमारा निर्णय होता है कि हम अपने समय के साथ क्या करें, हम इसे प्रयोग करें या सदुपयोग करें, आनंद उमंग में व्यतीत करें अथवा व्यर्थ कलह प्रलाप में दुरूपयोग कर व्यर्थ जाने दें, परंतु यह निश्चित है कि एक बार समय व्यतीत हो जाने के उपरांत यह सदैव के लिए चला जाता है, एवं ये सभी जानते हैं कि गया समय पुनः वापिस नही आता।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~संकलन गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 


बुधवार, २ जून, २०२१

2 जुन ग्राहम बेल यांनी टेलीफोन चा शोध लावला

 *📞☎️📞२ जुन १८७५ ला📞☎️📞*

☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️

*अलेक्झांडर ग्राहम बेल यांना टेलिफोनचा शोध लागला.*

☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️

मूक-बधिरांसाठी शिक्षण सुलभ व्हावे, त्यांना इतरांचे बोलणे कळावे यासाठी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल सतत प्रयत्नशील होते. त्यासाठी बोस्टन विद्यापीठात स्वरयंत्राचे कार्यशास्त्र शिकविण्यासाठी नेमण्यात आले. तेथेच बधिरांसाठी यंत्र तयार करण्याचे प्रयत्न बेल करीत होते. असे यंत्र बनविण्याच्या पयत्नात बेल असतांनाच ते मेबल ह्यूबर्ड नावाच्या कर्ण बधिर मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नीला बेलच्या यंत्राविषयी कळल्यावर तिनेच ओठांची हालचाल वाचता येणे हाच बधिरांसाठी कसा सर्वोत्तम पर्याय आहे हे पटवून सांगितले. मग बेल यांनी तसे यंत्र बनविण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्यातच दूरध्वनी यंत्राचे कोडे उलगडले.

बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. दि. २ जून १८७५ या दिवशी आपले सहकारी वॉटसन यांच्यासह काम करीत असतांना दुसऱ्या खोलीतील वॉटसन यांच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून सहकारी वॉटसन यांना आपल्या खोलीत येण्याविषयी सांगितले. बेल यांचा तो संदेश सहकारी वॉटसन यांनी ऐकून तसा प्रतिसाद दिल्यावर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल दोघांची खात्रीच पटली. बेल आणि वॉटसन यांनी या यंत्रावर आणखी प्रयोग करून दि. १५-०२-१८७६ या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा पेटंट कार्यालयातच बेल यांना समजले की अशाच प्रकारच्या प्रयोगासाठी आणखी चार अर्ज पेटंट कार्यालयात पडून होते. हे पेटंट युद्ध बराच काळ सुरू होते, शेवटी बेल यांना दूरध्वनी यंत्राचे पेटंट मिळाले.


बेल यांनी तयार केलेल्या आपल्या यंत्राचे प्रयोग अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जावू लागली. दि. २ ऑगस्ट १९२२ या दिवशी बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीट बंद ठेवण्यात आले.

उल्लेखनीय

विज्ञान विषयक सर्व प्रकारची माहिती नियतकालिकारुपाने जगाच्या समोर यावी या हेतुने १८८२ साली बेल यांनी सायन्स नावाचे नियतकालिक सुरू करण्यात पुढाकार घेतला तसेच आपल्याजवळील पैसा लावून हे नियतकालिक आठ वर्षे सतत सुरू ठेवले. पुढे हे नियतकालिक अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अधिकृत नियतकालिक झाले.


संकलन -)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

वैशाख मास,कृष्ण पक्ष, *अष्टमी*,शतभिषा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, ०२ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                       *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 

असूयको दन्दशूको 

                निष्ठुरो वैरकृच्छठः। 

स कृच्छं महदाप्नोति 

                नचिरात् पापमाचरन् ॥


*भावार्थ :- अच्छाई में बुराई देखने वाला, उपहास उड़ाने वाला, कड़वा बोलने वाला, अत्याचारी, अन्यायी तथा कुटिल पुरुष... पाप कर्मो में लिप्त रहता है और शीघ्र ही मुसीबतों से घिरकर नष्ट हो जाता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


मंगळवार, १ जून, २०२१

कुत्राचाल्यास माणुस पिसाळतो का?

 ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

 

▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬


═════════════ @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

═════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *कुत्रा चावल्यास माणूस पिसाळतो, हे खरे आहे काय ?* 📕

***********************************

कुत्रा चावल्यास माणसाला जखम होते. ती जखम इतर जखमांप्रमाणेच औषधोपचाराने चार-पाच दिवसांत चरी होते. कुत्रा चावल्यास माणूस पिसाळतो, हा समज चुकीचा आहे. मात्र आपल्याला चावलेला कुत्रा जर पिसाळलेला असेल, (म्हणजे त्याला रेबीज वा पिसाळी हा रोग झालेला असेल) तर मात्र आपल्याला धोका असतो.


पिसाळी हा रोग सामान्यपणे कुत्रा, मांजर, कोल्हा, लांडगा अशा मांसभक्षक प्राण्यांना होतो. जंगलातील प्राण्यांना झालेला रोग ते मानवी वस्त्यांतील पाळीव प्राण्यांपर्यंत पोचवतात. नंतर कुत्रा वा मांजर असे पाळीव प्राणी आपल्याला चावल्याने हा रोग आपल्यालाही होतो. म्हणजे हा प्राण्यांचा आजार चुकून वा अपघाताने आपल्याला होतो.


पिसाळी हा रोग व्हॅन्डोव्हायरस या विषाणूमुळे होतो. दंशाच्या जागेपासून हे विषाणू प्रथम स्नायूपेशींमध्ये वाढतात व नंतर चेतातंतूंमधून मेंदूपर्यंत पोचतात. नंतर हे विषाणू शरीरभर पसरतात. लाळेतही हे जंतू येतात. लाळेत हे विषाणू असले तर असा प्राणी मानवाला चावल्यास मानवात पिसाळी हा रोग होऊ शकतो. येथे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, पिसाळी रोग झालेला कुत्रा वा मांजर, विषाणू त्याच्या शरीरात शिरल्यापासून फक्त दहा दिवसच जिवंत राहू शकतात. त्यामुळे आपल्याला चावलेला कुत्रा चावल्याच्या दिवसापासून दहा दिवसांनंतर जिवंत राहिला, तर तो पिसाळलेला नव्हता हे सिद्ध होते व त्यामुळे आपल्यालाही रोग होण्याची भीती नसते.


पिसाळलेला कुत्रा चावल्यास, त्याची लाळ जखमेला लागल्यास किंवा पिसाळलेल्या म्हशीचे दूध न उकळता पिल्यास आपल्याला पिसाळी रोग होण्याची शक्यता असते. विषाणू दंशाच्या ठिकाणापासून हळूहळू मेंदूपर्यंत पोचतात. यात मेंदूच्या पेशी अतिशय जास्त प्रमाणात उत्तेजित होतात. त्यामुळे आवाज, हवेची झुळूक अशा साध्या उत्तेजनांनीही व्यक्तीला झटके येतात. खूप घाम येतो, लाळ सुटते, डोळ्यांतून खूप पाणी येते, व्यक्ती चिडचिडी होते, पटकन चिडते. मानेचे व घशाचे स्नायू आखडल्यामुळे व्यक्तीला पाणी वा पातळ पदार्थ पिता येत नाहीत. पाण्याच्या नुसत्या आवाजानेही झटके येतात. म्हणून या रोगाला हायड्रोफोबिया (पाण्याची भीती वाटणारा रोग) असे म्हणतात. हा रोग माणसाला हमखास मारतो. आजवर जगात केवळ ३ रुग्ण वाचू शकले आहेत. या रोगात वर सांगितलेल्या कारणांमुळे माणूस कासावीस होतो, वेडापिसा होतो, पिसाळल्यासारखे करतो; पण एक लक्षात ठेवा, कुत्रे पिसाळलेले नसतात. चांगले कुत्रे चावल्यास काहीही धोका नसतो व पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतरही रोगप्रतिबंधक लस घेतल्यास रोग टाळता येतो व आपण सुरक्षित राहू शकतो.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

  अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य 

▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬


यशोगाथा

 *गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर*

(ज्यांना गोनीदा असेही म्हणतात)

(०८ जुलै १९१६ - ०१ जून  १९९८)

 *हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. .तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते.*


गो.नी. दांडेकर

शिक्षण  -) सातवी इयत्ता

आई  -) अंबिकाबाई नीलकंठ दांडेकर


वडिल -) नीलकंठ दांडेकर



जन्म नाव -) गो.नी. दांडेकर 

             गोपाल नीलकंठ दांडेकर टोपणनाव -) गो.नी.दा.


जन्म -)  ०८ जुलै १९१६

                   (परतवाडा)

मृत्यू  -) ०१ जून १९९८

                        पुणे

कार्यक्षेत्र -)

कादंबरीकार, ललितलेखक

साहित्य प्रकार -)

कादंबरी, ललित वाङमय, 

कुमार वाङमय, चरित्र, प्रवासवर्णन -)

वडील -) नीलकंठ दांडेकर

आई -) अंबिकाबाई नीलकंठ दांडेकर

पत्नी -) निराताई

अपत्ये -) वीणा देव

पुरस्कार -)

साहित्य अकादमी पुरस्कार 

महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार 

महाराष्ट्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार 

महाराष्ट्र गौरव पुरस्कार -१९९० 

जिजामाता पुरस्कार -१९९० 

केंद्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार

*जीवनप्रवास*


गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदांनी (गो. नी. दांडेकर यांनी) स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाहीत तर त्यानंतर ते गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी गावोगाव हिंडले. नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले. पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले. १९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले.


त्यांच्या पडघवली आणि शितू ह्या कादंबऱ्या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे दुर्गभ्रमणगाथा हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे.


१ जून १९९८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी वीणा देव (डॉ.वीणा विजय देव) ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची नात मधुरा देव हीसुद्धा ललित लेखन करते आणि दुसरी नात मृणाल देव-कुलकर्णी ही विख्यात अभिनेत्री आहे.


*कादंबरी अभिवाचन*


गो.नी. दांडेकरांच्या कादंबऱ्यांच्या वाचनाचा सार्वजनिक कार्यक्रम वर्षातून अनेकदा होतो. या उपक्रमाची सुरुवात १९७५मध्ये प्रत्यक्ष गोनीदांनी केली. संत ज्ञानेश्वरांच्या सातव्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी सर्वप्रथम 'मोगरा फुलला' या कादंबरीचे अभिवाचन केले होते. यामध्ये त्यांची कन्या डॉ. वीणा देव, जावई डॉ. विजय देव हे सहभागी झाले होते. कादंबरीतील कथानाट्य वाचनातून लोकांपुढे उभे करण्याच्या या अभिनव प्रयोगाचे त्या वेळी सर्वत्र स्वागत झाले होते


यानंतर गोनीदांच्या कुटुंबीयांनी या अभिवाचनाची एक चळवळच उभी केली. 'मोगरा फुलला'च्या पाठोपाठ मग शितू, पडघवली, मृण्मयी, पवनाकाठचा धोंडी, वाघरू, जैत रे जैत, देवकीनंदन गोपाला, हे तो श्रींची इच्छा अशा एकेक कलाकृती या अभिवाचन संस्कृतीतून वाचकांना भेटू लागल्या. गोनीदा हयात असताना सुरू झालेला हा उपक्रम त्यांच्या पश्चातही या कुटुंबाने अखंडपणे सुरू ठेवला. त्यांच्या या उपक्रमात पुढे देव कुटुंबीयांचे जावई रुचिर कुलकर्णी हेदेखील सहभागी झाले.


अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित केलेला या कादंबरी अभिवाचनाचा साडेसहाशेवा प्रयोग १८ फेब्रुवारी २०१५ रोजी पुण्यात ’निवारा’ सभागृहात झाला..


गो.नी.दां.चे दुर्गप्रेम संपादन करा

गो.नी.दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ’गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे. हे दुर्गप्रेम त्यांनी परोपरीने जागवले. त्यांनी स्वतः जन्मभर दुर्गभ्रमंती केलीच पण 'दुर्गदर्शन', 'दुर्गभ्रमणगाथा' ह्या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. मराठीतील ललित साहित्यात त्यांचे हे लेखन अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या लेखनामुळे हजारो माणसे दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली. त्यांतल्या अनेकांना गोनीदांनी स्वतः प्रत्यक्ष दुर्गदर्शनही घडवले. 'किल्ले' हे त्यांचे छोटेखानी पुस्तक दुर्गप्रेमींच्या मनात मानाचे स्थान मिळवून आहे. 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत', 'रानभुली', 'त्या तिथे रुखातळी', 'वाघरू', आणि 'माचीवरला बुधा' या त्यांच्या कादंबऱ्यांमधे त्यांनी प्रत्ययकारी दुर्गदर्शन घडवले आहे.


साहित्य / कथा


आईची देणगी (बालसाहित्य)

*कादंबरी* 


आम्ही भगीरथाचे पुत्र कृष्णवेध जैत रे जैत तांबडफुटी पडघवली

पद्मा पवनाकाठचा धोंडी पूर्णामायची लेकरं बिंदूची कथा माचीवरला बुधा

मोगरा फुलला मृण्मयी शितू सिंधुकन्या वाघरू

रानभुली त्या तिथे रुखातळी

ललित संपादन करा

छंद माझे वेगळे

त्रिपदी

चरित्र, आत्मचरित्र संपादन करा

आनंदवनभुवन

कहाणीमागची कहाणी

गाडगेमहाराज

तुका आकाशाएव्हडा

दास डोंगरी राहतो

स्मरणगाथा

*चित्रपट*


गो.नी. दांडेकरांच्या ‘माचीवरचा बुधा’ या कादंबरीवरून त्याच नावाचा एक मराठी चित्रपट बनला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विजयदत्त यांचे आहे.


*ऐतिहासिक*


कादंबरीमय शिवकाल : या जाडजूड पुस्तकात अनेक छोट्या कादंबऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे - झुंजार माची, दर्याभवानी, बया दार उघड, हर हर महादेव आणि हे तो श्रींची इच्छा.

*प्रवास आणि स्थळ*


किल्ले कुणा एकाची भ्रमणगाथा गगनात घुमविली जयगाथा

गोनीदांची दुर्गचित्रे (संकलन-संपादन वीणा देव) दुर्ग दर्शन दुर्गभ्रमणगाथा

नर्मदेच्या तटाकी आणि दक्षिणवारा निसर्गशिल्प महाराष्ट्र दर्शन

मावळतीचे गहिरे रंग शिवतीर्थ रायगड

धार्मिक आणि पौराणिक, *संतचरित्रे*


गणेशायन श्रीकृष्णगायन श्रीरामायण भावार्थ ज्ञानेश्वरी भक्तिमार्गदीप

श्रीगणेशपुराण श्रीकर्णायन श्री संत ज्ञानेश्वर श्री संत तुकाराम श्रीमहाभारत

श्री संत एकनाथ श्री संत नामदेव श्री गाडगेमहाराज श्री संत रामदास कहाणीसंग्रह

श्रीगुरुचरित्र (मूळ) सुबोध गुरुचरित्र सार्थ ज्ञानेश्वरी

कुमारसाहित्य संपादन करा

*गौरव*


अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, अकोला, १९८१

पुरस्कार संपादन करा

साहित्य अकादमी पुरस्कार १९७६ 'स्मरणगाथा' साठी महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार महाराष्ट्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार

महाराष्ट्र गौरव पुरस्कार -१९९० जिजामाता पुरस्कार -१९९० केंद्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार

*स्मृति पुरस्कार*


गो.नी. ऊर्फ अप्पासाहेब दांडेकर यांनी वयाच्या पंच्याहत्तरीला सुरू केलेला आणि चांगल्या लेखकाला देण्यात येणारा मृण्मयी पुरस्कार, १९९९ पासून दांडेकर कुटुंबीयांतर्फे गोनीदांच्या स्मरणार्थ दिला जातो. गोनीदांच्या पत्‍नी नीरा गोपाल दांडेकर यांच्याही स्मरणार्थ, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल नीरा गोपाल हा पुरस्कारसुद्धा दांडेकर कुटुंबीय देतात. रोख रक्कम रुपये दहा हजार आणि सोबत एक स्मृतिचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. सन २०११ च्या मृण्मयी पुरस्काराच्या मानकरी प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू या आहेत, आणि नीरा गोपालचे मानकरी रेल्वे प्लॅटफाॅर्मवरील मुलांना संस्कारित करण्याचे समाजकार्य करणारे श्री. विजय जाधव हे आहेत.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संकलन -)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

वैशाख मास,कृष्ण पक्ष, *सप्तमी*,घनिष्ठा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, ०१ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"किसी भी मनुष्य के अपनत्व का वास्तविक मूल्यांकन उसके आकर्षक चेहरे, सुन्दर वेशभूषा अथवा मीठी वाणी से नहीं हो सकता। कोई भी मनुष्य अथवा मित्र-सम्बन्धी तभी अपना है, जब वो आपके संकट अथवा कष्ट की घडी में आपके साथ खड़ा हो, बिना किसी लाभ-हानि के विचार के।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~~

सोमवार, ३१ मे, २०२१

काळा अवाक

 काळा अवाक (शास्त्रीय नाव: Pseudibis papillosa, स्यूडिबिस पॅपिलोसा ; इंग्लिश: Red-naped Ibis / Black Ibis, रेड-नेप्ड आयबिस / ब्लॅक आयबिस ;) ही अवाकाद्य पक्षिकुळातील दक्षिण आशियात आढळणारी एक प्रजाती आहे. हे पक्षी साधारण ६८ सें.मी. आकारमानाचे असतात. यांचा मुख्य रंग विटकरी काळा असून, चोच तपकिरी रंगाची आणि बाकदार असते. यांच्या खांद्यावर ठळक पांढरा भाग असतो. डोक्यावर पिसांचा अभाव असून डोक्याचा मुख्य रंग काळा, तर त्यावर मागील बाजूस साधारण त्रिकोणी आकाराचा ठळक लाल तुरा असतो. काळ्या अवाकांत नर व मादी दिसायला सारखेच असतात

संकलन ::

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य .





पशुपक्षाकडुन मिळणार पाउसाचे पूर्व सुतक

 *पशुपक्षांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत*

- मारुती चितमपल्ली

*1. चातक पक्षी -*

पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमखास समजावे.

*2. पावशा पक्षी -*

चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत.

*3. तित्तीर पक्षी -*

माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोडय़ान केको.. कोडय़ान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच पाऊस येणार असे खुशाल समजावे. जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही. परंतु मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.

*4. कावळा -*

कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही. आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात.

यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली, यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले.

*5. वादळी पक्षी -*

पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार.

*6. मासे -*

पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंडय़ांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा… उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.

*7. खेकडे -*

तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकडय़ांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकडय़ांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. परंतु त्यांची समुद्री धाव कशासाठी असते, याचा कोणी विचारही करीत नाही.

*8. हरीण -*

पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणी पिल्लांना जन्म देत नाहीत.

*9. वाघिण -*

आम्ही पाहिलेली ही वाघीण गर्भवती होती. तिला पिल्ले होणार होती. परंतु या वाघिणीने डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतला. हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात. या वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावणारे होते. यंदा पाऊस येणार नाही, त्यामुळे जंगलात गवत राहणार नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी आपल्या पिलांना भक्ष्य मिळणार नाही. त्यांची उपासमार होईल… याची पूर्वकल्पना आल्यानेच तिने गर्भपात करवून घेतला होता. वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे.

*10. वाळवी -*

जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी/ उधईला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढय़ा तयार होतात. त्या जंगलात वारुळे तयार करतात.

*11. काळ्या मुंग्यां -*

हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत.

बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठय़ा प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.

*मराठवाडय़ात प्रचंड संख्येने आढळणाऱ्या गोडंबा- म्हणजे बिब्याच्या झाडाला बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहेत.*

*खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो.*

*कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाऱ्याचे संकेत देतो.*

*बिचुलचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीचेच हाकारे देतो.*

*आपण वेली पाहतो. या वेलींचे तंतू अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे.*

संकलन गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

पाण्याखाली जातांना पाणबुड्या काही बदल होणार का?

 ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

    

▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬



   @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *पाण्याच्या खाली जाताना पाणबुड्यांच्या*

       *शरीरात काही बदल होतात का ?* 📕


समुद्र सपाटीच्या ठिकाणी वातावरणाचा दाव पायाच्या ७६० मि.मी. इतका असतो. माणूस नैसर्गिकपणे वातावरणाच्या या दावाशी जुळवून घेऊन कार्यरत असतो. समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे, तसतसे हवेचा वा वातावरणाचा दाब कमी होत जातो १,००,००० फूट उंचीवर हा दाव केवळ पायाच्या १० मि.मी. इतका असतो. याउलट जसजसे समुद्रसपाटीपासून खोलखोल जावे तसतसे वातावरणाचा दाब वाढत जातो. दर ३३ फुटाला हा दाव १ ने वाढतो. आजपर्यंत मानव ३३० फुटापर्यंत खोल गेलेला आहे. पाण्यात खाली जाताना पाणबुड्याला काही त्रास होतो का?


वातावरणाचा दाब वाढल्याने हवेतील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड व नायट्रोजन हे वायू रक्ता व उतींमध्ये दावाखाली विरघळले जातात. नायट्रोजनचे प्रमाण वाढल्याने मेंदूचे कार्य मंदावते व शुद्ध हरपते.. कार्बन डायऑक्साईडच्या वाढलेल्या प्रमाणामुळे मेंदूचे कार्य आणखीनच मंदावते. प्राणवायूचे प्रमाण अति वाढल्याने झटके येतात व मृत्यूही येऊ शकतो. जेव्हा पाणबुड्या समुद्राच्या पृष्ठभागावर येतो, तेव्हा हवेचा दाब कमी झाल्याने रक्तात विरघळलले हे वायू परत बाहेर पडतात. यामुळे हवेचे बुडबुडे रक्तात तयार होतात. परिणामस्वरूप फुफ्फुसे वा मेंदू यांच्या रक्तपुरवठ्यात कोठेतरी अडथळा निर्माण होऊन जीव दगावू शकतो. अशा प्रकारे पाणबुड्याच्या रक्तातील वायुमध्ये बदल घडत असतात.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═════════════

  


रविवार, ३० मे, २०२१

तापमान जास्त असल्यास थकवा का येते


▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬


═════════════

    @ संकलन *

  गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

═════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *तापमान जास्त असल्यास थकवा लवकर 

       *का येतो ?* 📕


शरीराचे तापमान वाढल्याने (ताप आल्यास) पेंशीच्या स्तरावर होणारा पायाभूत चयापचयाचा दर वाढतो. दर ०.५° इतक्या तापमानाच्या वाढीला चयापचयाचा हा दर ७ टक्क्यांनी वाढतो. वाढलेल्या तापमानामुळे शरीरात घडून येणाऱ्या सर्व रासायनिक प्रक्रियांचा वेग वाढतो. बऱ्याचदा प्रयोगशाळेत काही प्रयोग करत असताना परीक्षानळीतील घटकांना तापवल्यास रासायनिक क्रियांचा वेग वाढतो, हे आपण बघितले असेल. बाहेरील वातावरण थोड्या काळासाठी गरम झाले, तर शरीराच्या चयापचयावर फारसा परिणाम होत नाही. मात्र हे तापमान खूप काळ वाढलेले राहिले, तर शरीर चयापचयाचा दर कमी करते. सर्व परिस्थितीत म्हणजे थंडी, उष्णता इत्यादींमध्ये शरीर बाहेरील पर्यावरणाच्या बदलांना अनुरूप अशी स्थित्यंतरे घडवून आणते. थंडीच्या दिवसांत चयापचयाचा दर वाढून ऊर्जानिर्मिती वाढते व शरीराचे तापमान सामान्य पातळीवर राहण्यास मदत होते. याउलट उन्हाळ्यात घामाचे प्रमाण वाढते.


चयापचयाचा दर मंदावून ऊर्जानिर्मिती कमी केली जाते व शरीराचे तापमान योग्य त्या पातळीवर राखले जाते. त्वचेखालील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात व जास्त घाम येतो. या घामाच्या बाष्पीभवनाद्वारे शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाते. जर घामातून बाहेर पडणारे सोडियम व क्लोराइड यांची भरपाई करण्यात आली नाही, तर हातापायाला पेटके येतात. म्हणून पाणी व क्षार यांची भरपाई केल्यास हा थकवा कमी होतो. उन्हाळ्यात हेच काम वेगवेगळी सरबते, कैरीचे पन्हे करत असतात.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════


जागतिक तंबाखू विरोधी दिन

 *🍂🍂🍂🍂३१ मे🍂🍂🍂🍂*

🕸️🕸️🕸️🕸️🕸️🕸️🕸️🕸️🕸️🕸️

*🍃जागतिक तंबाखू विरोधी दिन🍃*

🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍

३१  मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देणारा हा लेख.


तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.


तंबाखू सेवन व्याप्ती आणि परिणाम

तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: १० लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: ३६ टक्के पुरुष व ५ टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.


राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, १८ वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेचा १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्याच्या सुचना देणे याचा अंतर्भाव होतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.


तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.


आपली जबाबदारी


व्यसनाधिनतेचे परिणाम आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध एल्गार केला आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे व भारताचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यास मदत होईल हीच अपेक्षा.


संकलन -गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

वैशाख मास,कृष्ण पक्ष, *षष्ठी*,श्रवण नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, ३१ मे २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 

सतां हि दर्शनं पुण्यं 

               तीर्थभूताश्च सज्जनाः,

कालेन फलते तीर्थम् 

               सद्यः सज्जनसङ्गतिः


*भावार्थः- सज्जनों के दर्शन से पुण्य होता है, सज्जन जीवित तीर्थ हैं, तीर्थ तो समय आने पर ही फल देते हैं, सज्जनों का साथ तो तुरंत फलदायी होता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शनिवार, २९ मे, २०२१

पल्स पोलोओ म्हणजे काय?

 ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

     

▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

══════════════════════

   *  संकलन  गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य *

  

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📙 *पल्स पोलिओ म्हणजे काय ?* 📙 


पोलिओ अर्थात बाल पक्षाघात हा सामान्यत: पाच वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांना होणारा एक सांसर्गिक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. हा विषाणू दूषित पाण्यामार्फत पसरतो. पोलिओच्या रुग्णाच्या विष्ठेचा पाण्याशी संपर्क येऊन ते दूषित होते. हेच पाणी निरोगी व्यक्ती प्यायल्यास तिला पोलिओ होऊ शकतो. 


पोलिओ हा रोग ९९% व्यक्तींमध्ये अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो. ९५% लोकांमध्ये तर कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाही. ३ ते ४% लोकांमध्ये ताप आढळून येतो. १% लोकांमध्ये मान व पाठ आखडणे, दुखणे अशी लक्षणे दिसतात. १% हून कमी रुग्णांमध्ये मात्र मज्जासंस्थेवर विषाणू आक्रमण करतो. याची परिणती एकतर श्वसन बंद पडून मृत्यू होण्यात किंवा हात पाय कायमस्वरूपी लुळे पडण्यामध्ये होते. 


पोलिओ हा गंभीर रोग असला तरी तो टाळणे सहज शक्य आहे. बाळाला जन्मल्यावर लगेच आणि त्यानंतर ते ६, १०,व १४ आठवडय़ांचे तसेच नंतर दीड वर्षांचे झाल्यावर पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन दोन थेंब पाजल्यास या रोगापासुन बाळाचे नक्कीच संरक्षण होऊ शकते. भारतात लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला गेल्याने या रोगाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे.


 जागतिक आरोग्य संघटनेने २००५ पर्यंत पोलियोचे जगातून निर्मूलन करण्यासाठी धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. याला 'पल्स पोलिओ' असे म्हणतात. या कार्यक्रमाअंतर्गत विविध देशातील पाच वर्षांखालील बालकांना विशिष्ट दिवसांना पोलिओची लस दिली जाते. त्यामुळे सर्व बालकांच्या आतड्यांमध्ये लसीतील (रोग निर्माण करू न शकणारा) विषाणू प्रस्थापित होतो. साहजिकच रोगकारक विषाणूला राहण्यासाठी कोणत्याच बालकांचे आतडे मिळत नाही. परिणामी तो पर्यावरणात येतो व काही आठवड्यांनी नष्ट होतो. पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवली गेल्यास जगातून निर्मूलन होणारा देवी नंतरचा दुसरा रोग पोलिओ ठरेल यात शंका नाही. दुर्दैवाने काही व्यक्ती गैरसमजापोटी आपल्या बाळांना पोलिओची लस देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांच्या बालकांना पोलिओ होण्याचा धोका निर्माण तर झालाच आहे पण पोलिओ निर्मूलनाच्या अभियानालाही खीळ बसत आहे. म्हणूनच अमिताभ बच्चन तसेच शाहरुख खान सारखे लोकप्रिय अभिनेते तसेच सचिन तेंडुलकरसारखे महान खेळाडू सर्व जनतेला पल्स पोलिओच्या दिवशी सर्व बालकांना 'दो बूंद जिंदगी के' देण्याचे टीव्हीवरून आवाहन करताना दिसत असतात ! 

 

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

═══════════════════════


खेळल्यानंतर खूप घाम का येतो?

 ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

     

▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬


══════════════════════

    @ संकलन गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

*खूप खेळल्यावर,धावल्यावर घाम का येतो?* 

************************************

खूप खेळल्याने, धावल्याने व्यायाम होतो. शरीरातील स्नायुंचे मोठ्या प्रमाणावर आकुंचन-प्रसरण होते. स्नायुंचे कार्य वाढते. साहजिकच या भौतिक श्रमांमुळे उष्णता निर्माण होते. अशा परिस्थितीत शरीराचे तापमान ठरावीक पातळीवर स्थिर राहण्यासाठी शरीरातून उष्णता बाहेर टाकण्याची आवश्यकता असते. व्यायामामुळे निर्माण झालेल्या उष्णतेच्या परिणामाने त्वचेखालचा रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे त्वचेचे तापमान हवेच्या तापमानापेक्षा जास्त होते व काही उष्णता वातावरणात सोडली जाते; परंतु उष्णतेतील या मार्गाने होणारी घट अल्प प्रमाणातच असते. व्यायामानंतर निर्माण होणारी उष्णता शरीराबाहेर टाकण्याचा महत्त्वाचा मार्ग घाम हाच होय. खूप व्यायाम केल्यानंतर घाम येण्याचे प्रमाण वाढते व त्याबरोबरच घामाचे बाष्पीभवन होण्याचेही प्रमाण वाढते. शरीरातील वाढलेली उष्णता व मेंदूतील प्रेरणा या दोहोंमुळे व्यायामानंतर आपल्याला खूप घाम येतो. विश्रांती घेतल्यावर हळूहळू घाम येण्याचे प्रमाण कमी होते. अशा प्रकारे घाम आल्याने शरीरात निर्माण झालेली उष्णता शरीराबाहेर टाकली जाते व शरीराचे तापमान सामान्य पातळीत राहते. त्यामुळेच खूप व्यायाम केल्यावर घाम येतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घाम आणखीनच येतो व हिवाळ्यात तेवढाच व्यायाम करून घाम कमी येतो, याचा अनुभव तुम्ही घेतला असेल.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

  

▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬


═══════════════════════


गँग्रीन म्हणजे काय?

 ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

     *📱तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र📱*

▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *गँग्रीन म्हणजे काय?* 

**************************

गैंग्रीन हा शब्द कधीतरी तुम्ही ऐकला असेल. डिक्शनरीमध्ये बघितल्यास 'Death and decay of a part of the body' अर्थात शरीराचा एखादा भाग सडणे किंवा मृत होणे असा Gangrene या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे.


शरीर विविध इंद्रिय संस्थांचे उतींचे बनले आहे. या सर्वांचा मूळ घटक पेशी हा आहे. पेशींना जीवंत राहण्यासाठी ऑक्सीजन तसेच ग्लुकोज व इतर पोषक पदार्थांची आवश्यकता असते. याच बरोबर चयापचयाद्वारे पेशीत तयार झालेले टाकाऊ पदार्थ पेशीतून बाहेर नेण्याची गरजही असते. रक्ताभिसरण संस्था, श्वसनसंस्था तसेच पचनसंस्था व उत्सर्जन संस्था यासाठीच कार्यरत असतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मज्जातंतूंच्या जाळ्याद्वारे मेंदूला एखाद्या स्नायू वा अवयवाचे अस्तित्व जाणवत असते. स्नायू वा अवयवाला मेंदूद्वारे आदेश पोहोचवण्याचे आणि तेथून मेंदूपर्यंत संदेश पोचवण्याचे काम मज्जातंतू करत असतात. एखाद्या अपघातात इजा झाल्याने किंवा कोणत्या रोगामध्ये हे मज्जातंतू नष्ट झाले तर त्यांच्याशी संलग्न असलेले स्नायू वा अवयव निष्क्रीय होतात. त्यांना रक्तपुरवठा केला जात नाही. जणू मेंदूच्या दृष्टीने ते भाग 'परके' होऊन जातात. परिणामी स्नायूंचा आकार लहान होणे वा ते झडणे अशा गोष्टी होतात.


काही रोगांमध्ये शरीरातील शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम होऊन त्यातून रक्तपुरवठा कमी होऊ लागतो किंवा बंद होतो. कधी कधी त्या अवयवातून हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या नीलांमध्ये अडथळे निर्माण होऊन रक्त साचून राहते. धूम्रपान करण्याने होणाऱ्या थ्रोम्बोअॅन्जायटीस ऑब्लीटरन्स या रोगात पायाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीवर परिणाम होऊन त्यातील रक्तप्रवाह कमी होतो. परिणामी सुरुवातीला पायाची बोटे बधीर होतात. तेथील उती नष्ट होतात. बोटे कापावी लागतात. धूम्रपान चालूच ठेवल्यास कालांतराने पूर्ण पायाला गैंग्रीन होऊन मांडीपासून पाय कापावाही लागू शकतो. रक्तवाहिन्यात अचानक येणाऱ्या गुठळ्यांमुळेही गँग्रीन होऊ शकतो. मधुमेहातही काही वेळा गॅग्रीन होऊ शकतो. एखाद्या अवयवावर प्रचंड दाब पडल्यास किंवा तेथे गंभीर जंतूसंसर्ग झाला, तरीही गँग्रीन होऊ शकतो. हातापायाची बोटे, हात, पाय किंवा आतड्याच्या भागाचा गैंग्रीन जास्त प्रमाणात आढळून येतात.


एकूण गँग्रीन होणे हा गंभीर प्रकार आहे, हे तुमच्या लक्षात आले असेलच. धूम्रपानाचे व्यसन टाळणे, मधुमेहासारख्या रोगाचे तात्काळ निदान करून घेऊन नियमीत उपचार घेणे, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागणे आदी उपायांनी गॅग्रीन होण्याची शक्यता बरीचशी कमी करता येईल.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

  


═══════════════════════


═══════════════════════

अश्रुधुर म्हणजे काय?

 ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

    

▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य व

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *अश्रूधूर म्हणजे काय ?* 📕

*********************************

दररोजच्या वर्तमानपत्रात कोठे ना कोठे तरी मोर्चे, संप, जमावाने केलेली जाळपोळ इत्यादी घटना छापून येत असतात. त्यासोबतच पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या असेही वाचायला मिळते. हे अधूर प्रकरण काय आहे असे तुम्हाला वाटले असेल.


अश्रूधूर हे एक प्रकारचे वायूच आहेत. यात क्लोर अॅसीटोफेनोन, ब्रोमो बेन्झील सायनाइड किंवा इथिल आयोडो अॅसिटेट हे द्रव्य असते. या वायुमुळे प्राणहानी होत नाही, कारण ते फार कमी प्रमाणात (Duliute स्वरूपात) वापरले जातात. या वायुमुळे डोळ्यांतून पाणी वाहते व व्यक्तीला समोरचे काही वेळ दिसत नाही. श्वासमार्गातही दाह होतो. नळकांडे फोडताना हे वायू पावडर स्वरूपात असतात, त्यामुळे स्फोट होताना पावडरशी संपर्क आल्यास त्वचेवर फोड येऊ लागतात. अश्रूधुरामुळे कायमस्वरूपी गंभीर परिणाम होत नसल्याने गर्दी हटवण्यासाठी वा जमावाला पांगवण्यासाठी पोलिस त्याचा परिणामकारकरित्या उपयोग करू शकतात. या वायूच्या दुष्परिणामावर उपचार म्हणून डोळे कोमट अशा मिठाच्या (सौम्य) द्रावणाने धुवावे व चेहरा खायच्या सोड्याच्या द्रावणाने धुवावा.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

  


═══════════════════════


माणसाच्या शरीरात कोरणोत्सर्ग असतात हे खरे आहे का?

 ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *माणसाच्या शरीरात किरणोत्सर्गी पदार्थ असतात, हे खरे आहे का ?* 📕


किरणोत्सर्गी पदार्थ आणि शरीरात! काहीतरीच काय! असे तुम्हाला नक्की वाटेल; पण तुम्हाला कितीही आश्चर्य वाटले तरी ते खरे आहे. माणसाच्या सभोवताली असलेल्या पर्यावरणात नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असे अनेक किरणोत्सर्गाचे स्रोत


असतात. यात कॉस्मिक किरण पर्यावरणातील माती-दगड, यातील युरेनियम, थोरीयम, सोडियम, पोटॅशियम ४० क्ष किरण, अणुबॉब, दूरदर्शन संच, चमकणाऱ्या तबकडीची घड्याळे इत्यादींचा समावेश होतो. नैसर्गिक स्रोतांमुळे व्यक्तीला सुमारे १०० मिलीरॅड इतक्या किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागते.


आपल्या शरीरात वेगवेगळ्या उतींमध्ये किरणोत्सर्गी पदार्थ साठवले जातात. यात अत्यंत अल्प प्रमाणात असलेल्या युरेनियम, थोरीयम, पोटॅशियम ४०, स्ट्रॉन्शीयम ९० तसेच कार्बन-१४ यांचा समावेश होतो. या किरणोत्सर्गी पदार्थामुळे मानवाला दरवर्षी २५ ते ८० मिलीरॅड इतक्या किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागते. अर्थात किरणोत्सर्गाच्या इतर स्त्रोतांच्या मानाने हे प्रमाण फारच कमी असते. एकदा क्ष-किरण तपासणी केली, तर २००० ते ३००० मिलीरॅड इतक्या किरणोत्सर्गाला आपल्याला सामोरे जावे लागते.


किरणोत्सर्गाचे अनेक दुष्परिणाम असतात. यात रक्ताचा कर्करोग, लहान मुलांमध्ये निर्माण होणारी जन्मजात वैगुण्ये, (गर्भवती मातेची क्ष-किरण तपासणी केल्यास) तसेच गुणसूत्रांमध्ये होणारे बदल इत्यादी गंभीर परिणामांचा समावेश होतो.


किरणोत्सर्गाचा क्ष-किरण तपासणी व कर्करोगावरील उपचारात लाभदायक असा उपयोग करून घेतला जातो.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

  


═══════════════════════


Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...