बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

ज्ञान विज्ञान


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *मुक्या माराचे वळ काळेनिळे का होतात?* 

***********************************

शरीरावर जेव्हा कोणत्याही हत्याराचा हल्ला होतो तेव्हा आपल्याला इजा होते. बहुधा या इजेमध्ये त्वचाच फाटते असं नाही, तर आतल्या मांसालाही जखम होते. अशा वेळी त्या स्ना च्या बनलेल्या मांसाला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्याही कापल्या जातात. साहजिकच त्यांच्यामधून सतत वाहणारं रक्त बाहेर सांडू लागतं. रक्तस्रावाला सुरुवात होते. कालांतरानं तो थांबतो किंवा जातो. रक्तवाहिन्यांची सुटी टोकं बांधली जातात. त्यांच्यामधून आणखी स्राव होणार नाही अशी व्यवस्था केली जाते किंवा नैसर्गिकरित्याच जर रक्तस्राव थांबला असेल तर झालेल्या रक्ताच्या गुठळीनं त्या वाहिन्यांची तोंड बंद केली जातात. मग त्या स्नायूंची दुरुस्ती आणि वरच्या त्वचेची भरपाई होत जखम भरून येते.


काही वेळा शरीरावर पडलेल्या घावानं त्वचा फाटत नाही पण त्या त्वचेखालच्या रक्तवाहिन्यांना मात्र तो आघात सहन न झाल्यानं त्या फाटतात. तुटतात. यालाच आपण मुका मार म्हणतो. म्हणजे इजा झालेली असते पण ती वर दिसत नाही. शरीराच्या आतच ती प्रकट झालेली असते. त्या आतल्या फाटलेल्या रक्तवाहिन्यांमधूनही रक्तस्राव होतो. ते रक्त साकळून आतच साचून राहतं. आपली त्वचा तशी पातळ असते आणि प्रकाशाला संपूर्ण अपारदर्शक नसते, म्हणून तर तळहातावर बॅटरीचा प्रकाशझोत टाकला तर आतल्या रक्तवाहिन्या लाल रंगाच्या दिसतात. तसंच हे न फाटलेल्या त्वचेच्या आत साचलेलं रक्त लाल रंगाच्या डागात दृग्गोचर होतं. कारण त्या रक्तात लाल पेशी असतात. त्यांचा रंग दिसतो. काही काळ गेल्यानंतर मात्र त्या रक्तपेशी सुकतात. त्यांच्यामधला ऑक्सिजन निघून जातो. त्यामुळं त्यांचा रंग बदलतो. तो निळसर दिसतो. काळ्या रंगाकडे झुकू लागतो. त्या काळ्या रंगाचा गडदपणाही हळूहळू कमी होत जातो. काही काळानंतर आतल्या त्या रक्ताचं विघटन होऊन संपूर्ण निचरा झाला की तो डागही दिसेनासा होतो.


दाराच्या फटीत सापडून बोट चिमटलं असलं तरी त्या चिमट्याचा आघात बोटाच्या त्वचेखालच्या

रक्तवाहिन्यांवर होतोच. त्या फुटतात आणि त्यांच्यातलं रक्त वाहून ते साकळून राहतं. त्या घावाचा डागही असाच काळानिळा दिसतो. त्या वेळी होणारी प्रक्रियाही अशीच असते.


*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?' या पुस्तकातून*

═══════════════════════


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...