शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

चंद्राला कला का पडतात?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🌖🌙 *चंद्राला कला का पडतात?* 

**********************************

चंद्र जसा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो तसाच तो स्वतःभोवतीही गिरकी घेतो, पृथ्वीही स्वतःभोवती गिरकी घेता घेता सूर्याभवतीही प्रदक्षिणा घालत असते, त्यामुळे चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्या एकमेकांच्या तुलनेत असलेल्या स्थानामध्ये सतत फरक पडत असतो. त्याशिवाय चंद्र आणि पृथ्वी यांच्या परिभ्रमणांमध्येही काही मूलभूत फरक आहेत. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या आणि सूर्याभोवतीच्या या अशा दोन परिभ्रमणांच्या कालावधीत खूपच फरक आहे. स्वतःभोवती एक गिरकी घ्यायला पृथ्वीला २४ तास लागतात; पण सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेला तब्बल एक वर्ष लागतो. चंद्राच्या बाबतीत मात्र त्याच्या दोन्ही परिभ्रमणांचा कालावधी सारखाच आहे -२९ दिवस. त्यामुळे चंद्राची एकच बाजू नेहमी पृथ्वीकडे तोंड करून असते, त्याच्या पृष्ठभागाचा अर्धाच भाग त्यामुळे केव्हाही सूर्याकडे असतो. तोच भाग प्रकाशमान होतो. चंद्राच्या या आगळ्यावेगळ्या परिभ्रमणामुळे त्याचा सूर्यप्रकाशाने उजळलेला भाग नेहमीच संपूर्णपणे पृथ्वीवरून दिसत नाही. केवळ पौर्णिमेच्या दिवशीच पृथ्वीकडे तोंड करून असणारा त्याचा भाग संपूर्णपणे उजळलेला असतो, अर्थातच त्या दिवशी संपूर्ण चंद्रच प्रकाशमान असल्यासारखा आपल्याला दिसतो. जसजसा तो आपली जागा बदलत पृथ्वीभोवती फिरु लागतो तसतसा त्याच्या पृथ्वीकडे तोंड करून असणाऱ्या भागापैकी काही भागच सूर्याच्या प्रकाशाने उजळुन निघतो. उतरलेला उजळलेला भाग पृथ्वीकडे तोंड करून नसल्यामुळे आपल्या नजरेला पडत नाही. साहजिकच त्या उजळ भागाचा काही अंशच आपल्या नजरेला पडतो. त्यानुसार या पूर्ण वर्तुळापासून तो कमी कमी होत जातो. 


अमावास्येच्या दिवशी त्याचा उजळ भाग पृथ्वीच्या विरुद्ध दिशेकडे असल्यानं आपल्याला अजिबात दिसत नाही. साहजिकच त्या दिवशी चंद्र आपल्याला दिसतच नाही. पूर्णचंद्र ते संपूर्ण काळोख या दोन टोकांच्या अवस्थांमधल्या स्थितींना आपण चंद्राच्या कला म्हणतो. त्याच आपल्याला दिसत राहतात. अष्टमीच्या दिवशी या दोन टोकांच्या स्थितींमधली नेमकी अर्धी स्थिती असते. त्या दिवशी आपल्याला अर्धचंद्रच दिसतो. बाकीच्या दिवशी त्यापेक्षा कमी किंवा जास्त असलेल्या चंद्राच्या कोरी दिसतात.


*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?' या पुस्तकातून*

═════════════

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...