मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

पोपट का नक्कल का करतो


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री.गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🦜 *पोपट नक्कल का करतो?* 🦜

********************************

'पोपटपंछी चतुरकी जान, पढे पहाटे श्रीभगवान' असं आपण कितीही पोपटाचं कौतुक केलं, तरी पोपटपंची का केली जाते, याविषयीच्या आपल्या काही समजुती भ्रामकच आहेत. कारण आपल्या बोलांची सही सही नक्कल करण्यासाठी पोपटांच्या अंगी स्वरयंत्रच नसतं; पण त्यांची श्वासनलिका दुतोंडी असते. त्यामुळे तिच्यातून श्वास आत घेताना किंवा बाहेर सोडताना त्या नलिकेच्या स्वरूपात बदल करून पोपट आवाज काढू शकतात. थोडक्यात, ते शीळ घालत असतात. या शीळेचंच नियंत्रण करून ते निरनिराळे आवाज काढू शकतात. ऐकलेल्या आवाजाची नक्कल करण्याची क्षमता मुळातच पोपटांमध्ये असते. त्यामुळे रानावनात असताना ते इतर पक्ष्यांच्या आवाजाची नक्कलही करू शकतात. यात पोपटांच्या निरनिराळ्या जातींचा, तसंच त्यांच्या स्वतःच्या जातीचाही समावेश असतो. त्यामुळे मग कोणत्या पक्ष्याला साद घालून जवळ करायचं किंवा कोणाला किंवा डावलून दूर निघून जायचं, हे ठरवणं त्यांना शक्य होतं. आपल्याच जातीच्या दुसऱ्या पोपटाला साद घालून प्रतिसाद देत ते स्वतःच्या प्रदेशांचं रक्षणही करू शकतात. तसंच विणीच्या हंगामात आपला जोडीदार शोधण्यासाठीही त्यांना या क्षमतेची मदत होते.

जेव्हा असे पोपट घरात पाळले जातात तेव्हा ऐकलेल्या आवाजाची नक्कल करण्याच्या त्यांच्या अंगभूत क्षमतेपोटी मानवी आवाजाची नक्कल करणं त्यांना शक्य होतं. अर्थात, असं करताना ते शब्द मुळात मानवप्राण्याकडून काढले गेले आहेत, अशी मात्र त्याची समजूत नसते. तेराव्या शतकातल्या एका फारसी ग्रंथात, पोपटांना बोलायला कसं शिकवावं, हे सांगितलं आहे. त्यात असं म्हटलं आहे, की ज्या पोपटाला बोलायला शिकवायचं त्याच्यासमोर एक आरसा धरावा. त्या आरशाच्या आड मग त्याच्या मालकानं स्वतःला लपवावं. त्या पोपटाला त्यामुळे आपल्या मालकाचं दर्शन होत नाही. समोरच्या आरशात मात्र त्याला स्वतःचंच प्रतिबिंब दिसतं. त्यामुळं जेव्हा तो मालक काही शब्द उच्चारतो तेव्हा पोपटाला दुसरा एक आपल्यासारखा पक्षीच बोलत असल्याचं वाटून तो त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. त्यापोटीच काही शब्द असे पोपट तसेच्या तसे आपल्या गळ्यातून काढू शकतात. मानवीआवाजाची नक्कल करून आपलं मन रिझवण्याचं काम ते जरूर करतात; पण त्यापायी इतर पक्ष्यांची नक्कल करण्याची किमया ते हरवून बसल्याचं दिसून आलं आहे.

पोपटच फक्त असं करू शकतात, असं नाही. मैना पक्षीही अशी नक्कल करू शकतात. झालंच तर मॉकिंगबर्ड जातीचे इवलेसे पक्षी तर इतर कितीतरी पक्ष्यांची नक्कल करतात. तरीही पोपटांची बुद्धिमत्ता इतर पक्ष्यांच्या मानानं जास्त असल्याचा दावा काही मज्जाशास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळेच काही पोपट केवळ शब्दच नव्हे, तर वाक्यंच्या वाक्य बोलू शकतात. एवढंच नाही, तर त्यांचा अर्थही त्यांना समजत असल्यासारखी त्यांची वागणूक असते.


*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन* 


═════════════

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...