*संकटात संधी शोधली !आणि....अफजलखानाचा वध झाला.*
10 नोव्हेंबर 1659
आज या प्रसंगाला 362 वर्षे झाले तरी या प्रसंगाची उत्सुकता आजही कायम आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुर्हतमेढ रोवल्यानंतर पहिले मोठे संकट आले ते म्हणजे अफजलखानाचे ! अफजलखान हा विजापूर दरबारातील मातब्बर सरदार ... त्यांची दहशत मोठी होती. दख्खनच्या पठारावरील सर्वात मोठा योध्दा , ज्याला सिलोनचा [श्रीलंका] अधिपती घाबरत असे. तो स्वतःला बुतशिकन आणि कुफ्रशिकन म्हणजे मूर्ती आणि मूर्तिपूजेचा विध्वंस करणारा असे स्वतःला म्हणवून घेत असे. विजापूर दरबाराने शिवरायांच्या स्वराज्याला पायबंद घालण्यासाठी अफजलखानाला ३५००० हजारांची फौज देऊन महाराष्ट्रात पाठवले.याबाबत आदिलशाही दरबारातील समकालीन इतिहासकार नेरुल्ला आपल्या "तारीखे अली " पुस्तकात स्पष्ट म्हणतो की , खानाला निरोप देताना आदिलशाहने स्पष्ट सांगितले होते की, शिवरायांशी तह न करता ," त्यांच्या जीवनरुपी धान्याच्या राशीवर मृत्यूरुपी अग्नीचा वर्षाव करणे. " यावरुन खानाचा हेतू शिवरायांना ठार मारण्याचाच होता हे स्पष्ट होते. शिवराय त्यावेळी राजगडावर होते.*जिहादी आतंकवाद असा संपवा*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा