8️⃣ *आजचा अभ्यास*
*26 सप्टेंबर*
*इयत्ता आठवी*
https://bit.ly/3sOt00R
🟣 *Learning With Smartness*🟣
8️⃣ *आजचा अभ्यास*
*26 सप्टेंबर*
*इयत्ता आठवी*
https://bit.ly/3sOt00R
🟣 *Learning With Smartness*🟣
*************************************
*२६ सप्टेंबर - ईश्वरचंद्र विद्यासागर जन्मदिन*
*************************************
*जन्म - २६ सप्टेंबर १८२०*
स्मृती - २९ जुलै १८९१
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा आज जन्मदिन.
त्यांनी स्त्री शिक्षणाला चालना दिली आणि विधवा विवाहाच्या विरोधात आवाज उठवला.
१८३९ मध्ये त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. १८४१ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी ते फोर्ट विलियम कॉलेज मध्ये संस्कृत विभाग प्रमुख म्हणून रुजू झाले.
स्थानिक भाषा आणि मुलींच्या शिक्षणासाठी ईश्वरचंद्र यांनी शाळांची एक साखळी उघडली आणि कोलकात्यात मेट्रोपॉलिटन कॉलेजची स्थापना केली.
*त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे विधवा पुर्नविवाहाचा कायदा १८५६ मध्ये संमत झाला.*
*🙏🙏विनम्र अभिवादन..🙏🙏*
🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏
संकलन -)
गजानन गोपेवाड
उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६
*************************************
सुखी व्हायचंय ? मग चांगला विचार करा
थॉमस अल्वा एडिसन यांचा बहुतेक वेळ प्रयोग शाळेत व्यतीत व्हायचा ,त्यांच्याप्रयोग शाळेत संशोधनाच्या वस्तू असत .एके दिवशी त्यांच्या प्रयोग शाळेला आग लागली .त्यांची कित्येक वर्षाची संशोधनाची मेहनत जळून राख झाली .हे दृश्य ते डोळ्यानी पाहत होते ,परंतु आश्चर्य म्हणजे इतक्या कठीणप्रसंगी देखील एडिसन निराश झाले नाहीत .आपल्या मुलाला जवळ बोलावून ते म्हणाले "जा "तुझ्या आईला येथे बोलावून आण ,कितीही पैसे खर्च केले तरी पुन्हा तिला असे दृश्य पाहता येणार नाही ,त्यांची पत्नी घटनास्थळी पोहोचली तेंव्हा एडिसन तिला म्हणाले ,बघ परमेश्वराने आपल्या सर्व चुका जाळून टाकल्या ,आता मला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळाली आहे .तेंव्हा मी तिचा पुरेपुर फायदा घेईन .एडिसनने एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतर निराश न होता आशावादी दृष्टीकोनठेवून अनेक महत्वाचे शोध लावले आहेत .
गजानन गोपेवाड
🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳
🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋
भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *पँचमी*,कृतिका नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८,
रविवार, २६ सप्टेंबर २०२१.
🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉
*प्रभात दर्शन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*"भव्य निवास, बहुमूल्य वस्त्र, बड़े वाहन, रत्न आभूषण, समृद्ध परिवार, भोग विलासयुक्त जीवन जीने में कोई दोष नही है। लेकिन सदैव स्मरण भी रहे कि जीवन में आवश्यकताएं सहज पूरी हो सकती हैं, किन्तु इच्छाएं और तृष्णाएं कभी पूर्ण नही होती। इन्हें जितना पूर्ण करो, ये और अधिक बढ़ती हैं और पूर्ण न होने पर हताशा और कुंठा बढ़ती है।"*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*************************************
*२५ सप्टेंबर - अंतराळ संशोधक सतीश धवन जन्मदिन*
*************************************
*जन्म - २५ सप्टेंबर १९२०*
(श्रीनगर)
मृत्यू - ३ जानेवारी २००२
सतिश धवन यांचे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नंतर ISRO (Indian Space Research Organisation) चे १९७२ साली अध्यक्ष झाले.
धवन यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamics च्या संशोधनाचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म श्रीनगरमधे झाला आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले.
त्यांनी ग्रामीण शिक्षण, Remote Sensing तसेच Satellite Communication च्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले. त्यांच्या प्रयत्नांनी भारत INSAT - दूरसंचार उपग्रह, IRS - दूरसंवेद उपग्रह आणि PSLV - Polar Satellite Lanch Vehicle यासारखे प्रकल्प यशस्वी करू शकला.
त्यांच्या स्मरणार्थ श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळाचे सतीश धवन अंतराळ केंद्र असे नामकरण करण्यात आले.
त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन....!
🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏
संकलन -)
गजानन गोपेवाड
उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६
*************************************
🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳
🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋
भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *चतुर्थी*,भरणी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८,
शनिवार, २५ सप्टेंबर २०२१.
🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉
*प्रभात दर्शन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*"भव्य, विशाल एवं विलासिता से पूर्ण भवन बनाने में थोडा ही समय लगता है, किन्तु संस्कारित घर (परिवार), सच्चे मित्र और विश्वास बनाने बहुत अधिक समय लगता है। महत्वपूर्ण बात यह है कि आपका भवन आपके जीवन में सहायक नही अपितु संस्कारित परिवार, मित्र आपके पग-पग पर सहायक स्तम्भ है और यही आपकी वास्तविक सम्पदा है।"*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
══════════════════════
*📒📒📒 @ संकलन @📒📒📒*
*श्री. गजानन गोपेवाड
══════════════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
📙 *बोटं मोडताना आवाज का येतो ?* 📙
एखाद्यावर राग काढायचा असला, की त्याच्या नावानं बोटं मोडली जातात. त्या प्रत्येक वेळी आवाज का येत नाही हे नाही सांगता यायचं; पण बोटांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी तो मोकळा करण्यासाठी आपण बोटात ताणतो त्यावेळी मात्र हमखास कडकड असा आवाज येतो. कोणाच्या बाबतीत मोठ्यानं येतो, कोणाच्या बाबतीत ऐकू येईल न येईल असा येतो; पण येतो खरा.
वास्तविक असा आवाज केवळ बोटांच्या बाबतीतच येतो असं नाही. कोणत्याही हाडांच्या सांध्याच्या बाबतीतही तो येत असतो. सांध्याच्या ठिकाणी दोन हाडं एकमेकांशी जोडलेली असतात; पण या सांध्यांची हालचाल होते तेव्हा ही हाडं निरनिराळ्या कोनांमधून फिरतात. ते सहजसाध्य व्हावं म्हणून जिथं ही हाडं जोडलेली असतात तिथे एक स्नायूंचा जाडसर थर असतो, अस्तरासारखा. तो नसला तर ती हाडं एकमेकांवर घासून त्यांची झीज होईल. शिवाय त्यांची मोडतोडही होण्याची शक्यता असते. तरीही ते थर एकमेकांवर घासतात ते घर्षणापायी उष्णता निर्माण होतेच. आपले तळवे आपण एकमेकांवर घासले तर ते गरम होतात. त्याचं कारणही हेच.
या उष्णतेचा त्या थरांवर अनिष्ट परिणाम होतोच. त्यांची हालचालही मोकळी होत नाही. तशी ती व्हावी म्हणून तिथं एक प्रकारचं वंगण असतं. एक तेलासारखा पातळ स्निग्ध पदार्थ असतो. त्या वंगणात ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड, नायट्रोजन यांसारखे वायू विरघळलेल्या स्थितीत असतात.
बराच वेळ वापर झाला की ते सांधे थकल्यासारखे होतात. त्यांची मोकळी हालचाल होत नाही. कारण त्या हालचालीला मदत करणारे स्नायू जखडल्यासारखे होतात. त्या स्थितीत ते जरा ताणले तर सैलावतात. त्यांची परत मोकळी हालचाल होऊ शकते. पण तसे ते ताणले की त्या वंगणाच्या पिशव्याही फुगल्यासारख्या होतात. त्यांच्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत असलेले वायू मोकळे होऊन त्यांचे बुडबुडे तयार होतात. ते फुटतात आणि त्यांचाच तो आवाज होतो. किती वेगानं हे बुडबुडे तयार होऊन फुटतात तसंच किती बुडबुडे तयार होतात, त्यावर किती मोठा आवाज होणार हे अवलंबून असतं.
कोणत्याही सांध्याच्या वंगणाच्या बाबतीत हीच परिस्थिती असते; पण बोटांच्या सांध्यामध्ये बुडबुडे लवकर तयार होतात आणि पटकन फुटतातही. त्यामुळे त्यांचा आवाजही सहजगत्या होतो. शिवाय बोटांना तीन पेरं असतात. त्या तिन्ही पेरांची स्वतंत्र हालचाल होऊ शकते. म्हणजेच प्रत्येक बोटाला एकूण तीन सांधे असतात. ते जवळजवळही असतात. आपण जेव्हा बोटं ताणतो तेव्हा ते सगळेच सांधे ताणले जातात. सर्व ठिकाणच्या वंगणातल्या वायुंचे बुडबुडे तयार होऊन ते फुटतात. त्यामुळे बोटं ताणल्यानं नेहमीच कडकड असा आवाज होतो.
*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*
*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*
═══════════════════════
*************************************
*२४ सप्टेंबर - भारतीय क्रांतिकारक महिला भिकाजी रुस्तुम कामा जन्मदिन*
*************************************
*जन्म - २४ सप्टेंबर १८६१*
स्मृती - १३ ऑगस्ट १९३६
मादाम भिकाजी रुस्तम कामा या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख महिला नेत्या होत्या. त्या फ्रेंच नागरिक होत्या.
मादाम कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ रोजी मुंबईतल्या एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नाव भिकाई सोराब पटेल असे होते. भिकाईजींचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. मादाम कामा यांचे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने, इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. रूस्तम के.आर. कामा यांच्याशी त्यांनी विवाह केला. रुस्तम कामा हे सामाजिक कार्यकर्ते व वकील होते.
दादाभाई नौरोजी यांच्या सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. त्या युवकांना ब्रिटिश सरकारच्या बातम्या वेळोवेळी देत असत. मादाम कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले. त्या विशेषेकरून देशभक्तिपर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करीत.
सावरकरांचे '१८५७ चा स्वांतत्र्य लढा' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मादाम कामांनी त्यांना मदत केली. त्या स्वांतत्र्य मिळविण्यासाठी झटणार्या क्रांतिकारकांना आर्थिक मदतीसह अन्य प्रकारची मदत करत. २२ ऑगस्ट १९०७ साली जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मादाम कामांनी साडी नेसून व भारतीय झेंडा घेऊन या परिषदेतील सदस्यांना भारताबद्दल माहिती दिली.
जर्मनीत श्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मादाम कामा यांच्यावर टाकण्यात आली होती. तिथे कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला.
त्यात हिरवा, पिवळा व लाल रंगांचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो पिवळा विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले. झेंड्यावरील ८ कमळाची फुले तत्कालीन भारताच्या ८ राज्यांची प्रतीके होती. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर काढलेले सूर्य आणि चंद्र हे हिंदू-मुस्लिम विश्वास दर्शवणारे चिन्ह होते.
मादाम कामांनी श्टुटगार्ट येथे झेंडा फडकवल्यानंतर दरम्यानच्या काळात पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि मादाम कामा यांना फ्रान्समध्ये स्थानबद्ध करण्यात आले. साधारण १९३५ सालापर्यंत त्या तिथेच होत्या. त्यानंतर त्यांना भारतात परतण्याची परवानगी मिळाली आणि वयाच्या ७४ व्या वर्षी त्या परत मायदेशी आल्या.
१३ ऑगस्ट १९३६ या दिवशी एका पारशी धर्मादाय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
मुंबईतील ओव्हल मैदानाजवळच्या एका हमरस्त्याला ‘मादाम कामा’ यांचे नाव .
🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏
संकलन -)गजानन गोपेवाड
उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६
*************************************
🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳
🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋
भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *तृतीय*,अश्विनी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८,
शुक्रवार, २४ सप्टेंबर २०२१.
🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉
*प्रभात दर्शन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*"किसी की कोमल भावनाओं का तिरस्कार अथवा किसी का अपमान कदापि भूलकर भी न करें और अगर करें तो ये याद रखें कि यह वो ऋण है जो हर कोई समय आने ब्याज सहित चुकाता अवश्य है अथवा चुकाने के लिए सदैव तत्पर रहता है। यह भी स्मरण रहे कि ईश्वर प्रत्येक को प्रत्येक अवसर अवश्य देता है।"*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
══════════════════════
*📒📒📒 @ संकलन @📒📒📒*
*श्री. गजानन गोपेवाड
══════════════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
📕 *पाठदुखीवर काय उपचार घ्यावे?* 📕
पाठदुखीला अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञाची रोजीरोटी असे गंमतीने म्हटले जाते! याचा अर्थ एवढाच की पाठदुखीवर उपचार घेत राहावे लागतात. शाहरूख खान, सचिन तेंडूलकर यांच्या पाठदुखीमुळे सर्वांना पाठदुखीविषयी जास्त माहिती झाली. पाठीच्या कण्याच्या दुखापतीमुळे वा आजारांमुळे पाठ दुखते. पाठीचे स्नायू दुखावले तरीही पाठ दुखते. विचित्र अवस्थांमध्ये अवघडलेल्या स्थितीत काम करणे, मणक्यांच्या हालचालींचा अभाव, मणक्यांच्या पृष्ठभागावर खडबडीतपणा येणे, दोन मणक्यांमधील कुर्चा सरकून मज्जारज्जूवर दाब येणे, तसेच मणक्यांमध्ये अतिरिक्त हाडाची वाढ होणे या सर्वांमुळे पाठ दुखू शकते. काही वेळा नसा दाबल्या गेल्याने मुंग्या येणे, बधीरपणा येणे अशी लक्षणेही दिसून येतात.
पाठदुखी झाल्यास वेदनाशामके घेणे हा वरवर सोपा पण तात्पुरता परिणाम करणारा उपाय होय. पाठदुखी टाळण्यासाठी उभे राहताना, बसताना, काम करताना शरीराची अवस्था सुयोग्य राहील हे पाहायला हवे. सामान्यत: दिवसभरात अनेकवेळा आपण समोर झुकतो किंवा वाकतो. त्यामुळे पाठ दुखायला लागते. अशावेळी पाठीच्या कण्याला विरुद्ध दिशेने ताण देणारी भुजंगासन, नौकासन अशी आसने नक्कीच फायदेशीर ठरतात. पाठीच्या कण्यासाठीचे अनेक व्यायाम आहेत. पाठ दुखत असताना हे व्यायाम करू नयेत. पाठीचे व्यायाम हा पाठदुखी टाळण्याचा प्रभावी व कायमस्वरूपी इलाज आहे. मणक्यात रचनात्मक बिघाड झाला असेल तर क्वचित पाठदुखी बरी करण्यासाठी शस्त्रक्रियाही करावी लागते.
*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*
*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*
═══════════════════════
══════════════════════
*📒📒📒 @ संकलन @📒📒📒*
*श्री. गजानन गोपेवाड
══════════════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
🔥 *ज्वाला नेहमी वरतीच का उफाळते ?*🔥
************************************
केला जरी पोत बळेचि खालेज्वाला तरी ते वरती उफाळे वामन पंडित म्हणून गेले आहेत. अर्थात, त्यांचं हे वचन म्हणजे आपल्याला नेहमी येणाऱ्या अनुभवाचंच नवनीत आहे. आपण नेहमी पाहतो, की पेटती ज्योत वरच्या दिशेनेच उडत असते. साधी पेटलेली काडी घेतली आणि हातात उलटी धरली तरी त्याची ज्योत वरच्या दिशेनेच उफाळून येते. बोटं भाजून काढते. साहजिकच हे असं का होतं, हा सवाल त्या ज्योतीसारखाच मनात उफाळून येतो.
पोत म्हणजेच मशालीचा पलिता जेव्हा पेटतो तेव्हा त्या पलित्याचं कापडी टोक जरी पेटल्यासारखं वाटलं तरी ते जळत नाही. अगदी आपल्या नेहमीच्या ओळखीची मेणबत्ती घेतली किंवा निरांजनातली वात, तर ती कापसाची वात काही जळत नाही. जळतं ते त्या कापसाला चिकटलेलं मेण. पलित्यात असलेलं तेल. ते इंधन जळतं. अर्थात, असं इंधन नेहमीच तेलासारखं द्रवरूप असतं असं नाही. तुपासारखं अर्धद्रवरूपात किंवा मेणासारखं घनरूपातही ते असू शकतं पण ते मुळात कोणत्याही रूपात असलं तरी त्याला उष्णता मिळाली, ते गरम झालं की प्रथम द्रवरूपात आणि आणखी जास्त उष्णता मिळाली की वायुरूपात बदलतं. पाणी कसं घनरूपात म्हणजे बर्फाच्या खड्यात असतं. त्याला उष्णता मिळाली की त्याचं वाहत्या पाण्यात रूपांतर होतं आणि आणखी जास्त उष्णता मिळाली की त्याची वाफ होते. सगळ्याच पदार्थांची अशी स्थिती असते पण काही पदार्थ असे असतात, की ते वायुरूपात गेल्यावर त्यांना आणखी उष्णता मिळाली, की ते पेट घेऊ शकतात. इंधन अशा ज्वालाग्राही पदार्थांचंच असतं.
मेणबत्तीतलं मेण गरम झालं की वितळतं. द्रवरूपातलं ते मेण मग केषाकर्षणापायी त्या वातीवरून तिच्या टोकापर्यंत पोहोचतं. तोपर्यंत आणखी गरम होत ते वायुरूप धारण करतं. ते वायूच मग पेट घेतात. जळत राहतात. अर्थात, वायू असल्यामुळं ते हलके असतात आणि त्यामुळंच मग ते वरवर जात राहतात.
वायू नेहमीच वरवर जात राहतात. पाण्याची वाफही अशीच वरवर जात राहते पण वाफ ज्वालाग्राही नसल्यामुळं ती तशी नुसतीच वर जाते. आपल्याला दिसतेही पण पेटलेले वायू वरवर जातात तेव्हा ती ज्योत किंवा ज्वालाच वरवर जात असल्यासारखी दिसते. ती मेणबत्ती उलटी धरली तरी पेटते. वायू वरवरच जात राहतात. वामन पंडितांच्या उक्तीचा दृष्टान्त देतात.
हे होतं ते गुरुत्वाकर्षणाच्या बलापोटीच. त्या बलापायी इतर वस्तू जरी जमिनीच्या दिशेनं येत असल्या, तरी वायू हलके असल्यामुळं ते सहजगत्या वरच्या दिशेनं जात राहतात. जर गुरुत्वाकर्षण अस्तित्वात नसेल तर ते वर जाणार नाहीत. गुरुत्वाकर्षण शून्यावर कधीच जात नाही पण ते अत्यल्प होऊ शकतं. अंतराळयानात ते असंच घसरतं. त्या यानात मेणबत्ती पेटवली तर तिची ज्योत तिथल्या तिथंच पसरत राहते. पाणी पसरून त्याचं थारोळं व्हावं तशीच. तिथं मग वामन पंडितांच्या उक्तीचा प्रत्यय येत नाही. तिथं केला जरी पोत सहजची खालेज्वाला तरी ते खालतीच खेळे.
*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*
*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*
═══════════════════════
══════════════════════
*📒📒📒 @ संकलन @📒📒📒*
*श्री. गजानन गोपेवाड
══════════════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
📒 *पाण्यात ठेवलेली पेन्सिल मोडल्यासारखी का दिसते?*
***********************************
कोणतीही वस्तू आपल्याला दिसते कशी ? म्हणजे तशी ती आपण डोळ्यांनीच पाहतो ; पण डोळ्यांमध्ये तरी तिची प्रतिमा उमटते कशी ? आपल्याला अंधारात कोणतीही वस्तू दिसत नाही. अगदी आपल्या हाताचं बोटही दिसत नाही. म्हणजेच कोणतीही वस्तू पाहण्यासाठी आपल्याला प्रकाशाची गरज भासते. दिव्यासारख्या वस्तूला स्वतःचा प्रकाश असतो. आकाशातल्या ताऱ्यांनाही; पण इतर कोणतीही वस्तू आपल्याला दिसण्यासाठी अशा दुसऱ्याकडून आलेला प्रकाश त्या वस्तूवरुन परावर्तित होऊन तो आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असते.
प्रकाश नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो. त्यामुळे त्या वस्तूवरून परावर्तित झालेल्या प्रकाशाचे किरण असेच शहाण्यासारखे सरळ रेषेत प्रवास करत आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात आणि त्यांची नीटस स्वच्छ प्रतिमा डोळ्यांच्या पडद्यांवर उमटते. जोवर प्रकाश एकाच माध्यमातून प्रवास करत असतो तोवर हा सरळ रेषेतला प्रवास कोणताही अडथळा न येता पार पडतो. जर माध्यम बदललं तर मात्र परिस्थिती वेगळी होते. याचं कारण प्रकाशाचा वेग निरनिराळ्या माध्यमांमध्ये निरनिराळा असतो. निर्वात पोकळीत तो सर्वात जास्त म्हणजे सेकंदाला तीन लाख किलोमीटर एवढा असतो. हवेत त्यापेक्षा थोडा कमी असतो. पाणी किंवा काच यांसारख्या घन माध्यमांमध्ये तो आणखी कमी होतो. रिकाम्या रस्त्यावरून आपण सुसाट धावू शकतो; पण त्याच रस्त्यावर माणसांची गर्दी असली तर सहाजिकच आपला वेग कमी होतो. प्रकाशाची गती ही वेगळी नसते.
त्यामुळेच एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना या वेगातील फरकामुळे प्रकाशकिरण वाकतात. ज्या माध्यमात वेग कमी असतो त्या माध्यमाच्या दिशेनं ते वाकतात. समजा तुम्ही विशिष्ट वेगानं डांबरी रस्त्यावरून सायकल चालवत आहात. मध्येच बाजूच्या गवताळ भागात जर सायकलचं चाक गेलं तर सायकल त्या बाजूला वळते. कारण डांबरी रस्त्यापेक्षा गवताळ भागातून जाताना चाकाच्या गतीला विरोध होतो आणि वेग कमी होतो. प्रकाशकिरणही वाकतात ते यामुळेच.
आता एखाद्या पेल्यात ठेवलेल्या पाण्यात आपण एखादी पेन्सिल ठेवतो तेव्हा ती जर संपूर्णपणे त्या पाण्यात बुडालेली असेल तर ती एकसंधच दिसते. कारण तिच्यावरून परावर्तित झालेले किरण संपूर्णपणे एकाच माध्यमातून प्रवास करत असतात. जेव्हा असे किरण पाण्याबाहेर येऊन हवेतून प्रवास करू लागतात तेव्हा सर्वच किरण एकसाथ वाकतात. त्यामुळे परत पेन्सिल एकसंधच दिसते.
जेव्हा पेन्सिलीचा काही भाग पाण्यात असतो आणि काही पाण्याबाहेर असतो तेव्हा तिच्या वरचा म्हणजे हवेत असलेल्या भागावरून परावर्तीत होणारे प्रकाशाचे किरण केवळ हवेतूनच प्रवास करत आपल्यापर्यंत पोहोचतात. ते एका रेषेत प्रवास करतात; पण पाण्यात असलेल्या भागावरून निघालेले किरण काही अंतर पाण्यातून प्रवास करतात आणि मग पाण्याच्या पृष्ठभागाच्या बाहेर पडून ते हवेतून प्रवास करू लागतात. त्या वेळी त्या दोन भागांमधल्या वेगातल्या फरकामुळे त्यांची दिशा बदलते. आपल्या डोळ्यांना ते हवेतून येणाऱ्या किरणांपेक्षा वेगळ्या दिशेने येत असल्यासारखे दिसतात. या दोन दिशांमधल्या फरकामुळे पेन्सिलीच्या दोन भागांमध्ये काही कोन असल्याचा भास आपल्याला होतो. म्हणूनच पाण्याच्या पृष्ठभागाजवळ ती वाकल्यासारखी किंवा मोडल्यासारखी दिसते. प्रकाशाच्या या आविष्काराला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. या म अपवर्तनापोटीच बिचार्या पेन्सिलीवर मोडण्याची पाळी येते.
*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*
*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*
═══════════════════════
************************************
*२३ सप्टेंबर - भौतिकशास्त्रज्ञ डॉ. राजा रामण्णा यांचा स्मृतिदिन*
************************************
जन्म - २८ जानेवारी १९२५
*स्मृती - २३ सप्टेंबर २००४*
भारतीय अणुकेंद्रकीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ.राजा रामण्णा यांचा आज स्मृतिदिन.
विख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ.राजा रामण्णा यांचा जन्म तुंकुर (म्हैसूर संस्थान) येथे २८ जानेवारी १९२५ साली झाला. शाळेपासूनच त्यांना साहित्य व संगीतात रस होता. १९४७च्या सुमारास ते मद्रास ख्रिश्चन कॉलेज मधून भौतिकशास्त्रात बी.एस्सी. आणि शास्त्रीय संगीतात बी.ए. झाले.
१९५४ साली, लंडन विद्यापीठातून अणुभौतिक पीएच.डी. मिळवली. तेथील आण्विक ऊर्जा संशोधन संस्थेतून ‘आण्विक इंधन व अणुभट्टी’ बाबत ते तज्ज्ञ झाले.
भारतात परतल्यावर BARC च्या (मुंबई) आण्विकशस्त्र प्रकल्पामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून डॉ.रामण्णा काम करू लागले. १९५८ साली, त्या कार्यकमाचे ते प्रमुख संचालक झाले. पोखरणच्या (राजस्थान) सैनिकीतळावर भूमिगत चाचण्यांसाठी त्यांनी बांधकाम सुरू केले.
इंधनाबाबतचा रचनात्मक कार्यक्रम १९७०च्या सुमारास डॉ. रामण्णांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला. पहिले अण्वस्त्रयान रामण्णांच्या पथकाने मुंबईहून पोखरणपर्यंत गुप्तता बाळगून वाहून नेले.
मे १९४७ च्या एके सकाळी, अण्वस्त्र चाचणी झाली. अण्वस्त्राचे सांकेतिक नाव होते, ‘हसरा बुद्ध'. त्या वर्षीचा भारताचा नागरी सन्मान त्यांना लाभला.
१९८० नंतरच्या दोन दशकात, संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे (डीआरडीओ) डॉ.रामण्णा संचालक होते. १९९० साली ते पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री होते. १९९७ ते २००३ या कालावधीत डॉ. रामण्णा राज्यसभेच खासदार होते.
१९९१ साली ‘यिअर्स ऑफ पिजग्रिमेज’ हे त्यांचे आत्मचरित्र आणि १९९३ साली पौर्वात्य व पाश्चात्य संगीतरचना’ ही त्यांनी लिहिलेली पुस्तके डॉ. रामण्णांचे विचार जगापुढे प्रकाशित करून गेले.
२००० साली ते संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार होते. अशातऱ्हेने अखेपर्यंत कार्यरत राहून, डॉ. राजा रामण्णा यांनी २३ सप्टेंबर २००४ रोजी जगाचा निरोप घेतला. देश रसिक संरक्षण शास्त्रज्ञाला मुकला.
डॉ.राजा रामण्णा यांना फाय फाउंडेशन, इचलकरंजी यांच्या तर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏
संकलन गजानन गोपेवाड
उमरखेड जिल्हा- यवतमाळ
४४५२०६
********************************
🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳
🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋
भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *द्वितीय*,रेवती नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८,
गुरुवार, २३ सप्टेंबर २०२१.
🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉
*प्रभात दर्शन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ज्ञान बोझ हैं यदि वह आपके भोलेपन को छीनता हैं।
ज्ञान बोझ हैं यदि वह आपके जीवन में एकीकृत नहीं हैं।
ज्ञान बोझ हैं यदि वह प्रसन्नता नही लाता।
ज्ञान बोझ हैं यदि वह आपको यह विचार देता हैं कि आप बुद्धिमान हैं।
ज्ञान बोझ हैं यदि वह आपको स्वतंत्र नहीं करता।
ज्ञान बोझ हैं यदि वह आपको यह प्रतीत कराता हैं कि आप विशेष हैं।
एवं सबसे मुख्य बात
ज्ञान बोझ है यदि वह समाज, राष्ट्र और धर्म के लिए उपयोगी एवं सहायक नही है।"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
************************************
*२१ सप्टेंबर - RAW या गुप्तहेर संघटनेची स्थापना*
************************************
स्थापना - २१ सप्टेंबर १९६८
संशोधन आणि विश्लेषण विभाग अर्थात तुम्हाला आम्हाला ‘रॉ’ या शॉर्ट फॉर्ममुळे अधिक परिचित असलेल्या भारताच्या या गुप्तचर संस्थेची स्थापना २१ सप्टेंबर १९६८ रोजी झाली.
१९६२ च्या भारत-चीन युद्धात आणि १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताची अंतर्गत संस्था विशेष काही चमक दाखवू शकल्या नाहीत. त्यामुळे रॉची स्थापना करण्यात आली. दहशतवाद्यांची माहिती गोळा करणं, परदेशातील गुप्त माहिती मिळवणं, परराष्ट्रीय धोरण ठरवताना मदत करणं, तसेच अण्वस्त्र संरक्षणाची जबाबदारी इत्यादी गोष्टी रॉच्या अख्त्यारित येतात.
रॉ ही संस्था संसदेला जबाबदार नसते, त्यामुळे माहिती अधिकारा अंतर्गत येत नाही. नवी दिल्ली येथे रॉचे मुख्य कार्यालय असून, मध्य प्रदेश कॅडरचे आयपीएस अधिकारी अनिल धस्माना हे रॉचे विद्यमान सचिव आहेत.
*इतिहास*
भारतात पूर्वी एकच गुप्तचर यंत्रणा होती, ती म्हणजे इंटेलिजियन्स ब्युरो. भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी या संस्थेची स्थापना केली होती. दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाल्यानंतर जगातील राजकीय अस्थिरता पाहता इंटेलिजियन्स ब्युरोचे अधिकार वाढवून, भारताच्या सीमेजवळील देशांमधून माहिती गोळा करण्याची जबाबदारी सुद्धा देण्यात आली. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि संजीवी पिल्लई हे आयबीचे पहिले भारतीय संचालक बनले. आयबीने बऱ्यापैकी परदेशी माहिती गोळा करण्यात जम बसवला होता, मात्र तरीही भारत-चीन युद्धा दरम्यान प्रभावी कामगिरी आयबी करु शकली नाही. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी परदेशातून माहिती गोळा करु शकेल, अशा गुप्तचर संस्थेच्या स्थापनेचे आदेश दिले.
त्यानंतर, काही वर्षातच १९६५चं भारत-पाकिस्तान युद्ध झालं आणि अशा गुप्तचर यंत्रणेची गरज अधिक भासू लागली. त्यामुळे १९६८ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रॉची स्थापना केली.
रामेश्वर नाथ काओ हे रॉचे पहिले प्रमुख होते. रामेश्वर नाथ काओ यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात सिक्कीम राज्याला भारताशी जोडून ठेवण्यात आणि १९७१ च्या युद्धावेळी पाकिस्तानला पराभूत करुन बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात रॉने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
रॉ थेट पंतप्रधानांशी जोडली गेली आहे. आपले अहवाल, माहिती सर्वकाही रॉकडून थेट पंतप्रधानांना दिले जाते. मात्र, त्यामध्ये एक समिती आहे. संयुक्त गुप्तचर समिती (JIC) असे या समितीचे नाव आहे. या समितीवर मंत्रिमंडळाचं वर्चस्व असतं. रॉ, आयबी आमि डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी यांमध्ये समन्वयाचं काम ही समिती करते. रॉकडून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करण्याचं कामही संयुक्त गुप्तचर समिती करते. १९९९ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसोबत संयुक्त गुप्तचर यंत्रणेला जोडण्यात आलं.
*‘रॉ’च्या काही निवडक कामगिऱ्या*
Al-Fatah या पाकिस्तानातील संघटनेने पोसलेल्या दहशतवाद्यांनी राजीव गांधी यांच्या हत्येचा कट रचला होता. तो हाणून पाडण्यात रॉची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. तसेच, १९७१ मध्ये ‘मिशन गंगा’ करुन पाकिस्तानी विमानांना भारतीय सीमेच्या बाहेर ठेवण्याची जबाबदारी असो वा राजस्थानातील पोखरण येथे पार पडलेल्या पहिल्या अणुचाचणीवेळी बाह्य-सुरक्षेची जबाबदारीही रॉने पार पाडली होती.
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि इतर देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी रॉ अत्यंत मोलाची भूमिका बजावत असते. प्रसंगी रॉचे अधिकारी आपले प्राण पणाला लावून कामगिरी पूर्ण करत असतात.
🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏
संकलन -)गजानन गोपेवाड
उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६
************************************
🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳
🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋
भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *प्रथम*,उ.भा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु, युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८,
मंगलवार, २१ सप्टेंबर २०२१.
🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉
*प्रभात दर्शन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*आपसी संवाद में शब्दों का चयन अत्यधिक महत्वपूर्ण है। एक-एक शब्द अर्थ-अनर्थ कर सकता है। शब्दों के हाथ-पैर नहीं होते, किन्तु शब्द बहुत दूर तक जाते हैं। एक शब्द कई अवसर पर औषधी का असर करता है और कई अवसर पर एक शब्द घाव भी दे सकता है। अतः सचेत रहें, क्योंकि मुंह से निकले शब्द वापिस नहीं आते।*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
***********************************
*२० सप्टेंबर - डॉ. अॕनी बेझंट स्मृतिदिन*
***********************************
जन्म - १ आॕक्टोबर १८४७
*स्मृती - २० सप्टेंबर १९३३*
जन्माने ब्रिटिश असूनही मनाने भारताशी व भारतीय तत्वज्ञानाशी जोडल्या गेलेल्या अॕनी बेझंट यांचा आज स्मृतिदिन.
अॕनी बेझंट बालवयातच भारतीय तत्वज्ञानाकडे ओढल्या गेल्या. शाश्वत सत्याचा मार्ग शोधायचा तर प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचाच आधार घ्यायला हवा, असे त्या मानीत असत.
तत्वज्ञानाच्या अतीव ओढीमुळेच त्या १८९३ मध्ये भारतात आल्या व भारताच्याच झाल्या. इतक्या की त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतात चालू असलेल्या आंदोलनातही भाग घेतला. १९१५ ला कोलकत्यात भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या.
लोकमान्य टिळकांनी १९१६ मध्ये होमरुल चळवळ सुरू केली. तिला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. ॲनी बेझंट सुद्धा या चळवळीत जोमाने उतरल्या.
हिंदू व बौद्ध तत्वज्ञानाचा अॕनींवर विशेष प्रभाव होता. *'मी जन्माने ख्रिस्ती व मनाने हिंदू आहे',* असे त्या म्हणत. आपल्या तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी 'थिआनॕसाॅफिकल सोसायटी'ची स्थापना केली. जागतिक थिआनॕसाॅफिकल संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.
ज्येष्ठ तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे ॲनी बेझंट यांच्या बरोबर जिव्हाळ्याचे संबंध होते. ॲनी त्यांना 'मानसपुत्र' मानीत. कृष्णमूर्ती आपल्या प्रवचनांत वारंवार ॲनींचा 'मदर' असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करत.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी कुटुंब नियोजनाचे महत्व ओळखले होत्या. त्यांनी 'फ्रुट्स आॅफ फिलाॅसाॅफी' हा याच विषयावर प्रबंध लिहिला. त्यामुळे ख्रिस्ती पुराणमतवादी खवळले. ॲनींना कोर्टात खेचण्याचे आले. ॲनींना सहा महिन्यांची शिक्षा झाली पण वरच्या कोर्टात ती रद्द झाली.
ॲनी बेझंट यांचे २० सप्टेंबर १९३३ रोजी निधन झाले.
🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏
संकलन -)
गजानन गोपेवाड
उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६
*************************************
🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳
🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋
भाद्रपद मास,शुक्ल पक्ष, *पूर्णिमा*,पू.भा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८,
सोमवार, २० सप्टेंबर २०२१.
🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉
*प्रभात दर्शन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*जीवन में हमारे दो बड़े शत्रु हैं, अगर हमें किन्ही शत्रुओं से बचना है तो वो चिंता और क्रोध से बचना है। चिंता से मस्तिष्क एवं वर्तमान दुर्बल होता है और चिंता के कारण उतपन्न क्रोध से सम्बन्ध खराब होते है।*
*सचेत रहिये, क्योंकि पल भर का क्रोध एवं व्यर्थ की चिंता हमारा पूरा भविष्य बिगाड़ सकती है।*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳
🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋
भाद्रपद मास,शुक्ल पक्ष, *चतुर्दशी*,शतभिषा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८,
रविवार, १९ सप्टेंबर २०२१.
🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉
*प्रभात दर्शन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*सुशीलो मातृ पुण्येन*
*पितृ पुण्येन चातुरः,*
*औदार्यं वंश पुण्येन*
*आत्मा पुण्येन भाग्यवान्।।*
भावार्थः- एक व्यक्ति अपनी माता के पुण्यों के कारण सुशील होता है और पिता के पुण्यों से चतुर होता है।
उदारता उसे अपनी वंश परम्परा से प्राप्त होती है तथा स्वयं अर्जित पुण्यों से वह् भाग्यवान् होता है।
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*आपको और आपके परिवार को अनंत चतुर्दशी और गणेश चतुर्दशी की हार्दिक शुभकामनाएं और बधाई🙏*
याद रखें
*"डिलीट" जितना तेजी से होता है ,*
*उतनी तेजी से "डाऊनलोड" नही होता ।*
*क्योकि ..*
*समय "सर्जन" में ही लगता है*
*"विसर्जन" में नही ।।*
*श्री गणेशजी आपके परिवार से कभी विदा न हो और हर पल आपके साथ रहकर खुशियां प्रदान करते रहे यही प्रार्थना।*
*गणपति बप्पा मोरया । अगले बरस तू जल्दी आ ।*
: 🛕🚩🛕🚩🛕🚩🛕🚩
*ख़ुश रहें..!! स्वस्थ रहें..!! मस्त रहें..!!*
*स्वच्छ भारत*
*स्वस्थ भारत*
*वंदेमातरम शुभ दिवस*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*🚩🐅आपका दिन मंगलमय हो 🐅🚩*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*************************************
*१९ सप्टेंबर - भारतीय अंतराळवीर सुनीता विल्यम जन्मदिन*
👩🚀👩🚀👩🚀👩🚀👩🚀👩🚀👩🚀👩🚀👩🚀👩🚀👩🚀
************************************
जन्म - १९ सप्टेंबर १९६५
सुनीता विल्यम्स ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री आहेत. तिला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे. तिच्या नावावर सगळ्यात जास्त वेळा (७ वेळा) आणि जास्त वेळ (५० तास, ४० मिनिटे) अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रम आहे. २०१२ मध्ये तिने ३२ व्या मोहिमेची फ्लाईट इंजिनिअर तसेच ३३ व्या मोहिमेची कमांडर म्हणून काम केले.
सुनीताचा जन्म युक्लिड, ओहिओ येथे झाला. तिचे वडील भारतीय-अमेरिकन न्यूरोअँटोमिस्ट दीपक पंड्या तर आई स्लोव्हिन-अमेरिकन उर्सुलिन बोनी पंड्या ही होती. सुनीता तीन भावंडांमध्ये सगळ्यात धाकटी होती; तिचा भाऊ जय ४ वर्ष मोठा तर बहीण डीना अँना हि ३ वर्ष मोठी आहे.
सुनीता नीडहॅम, मॅसाच्युसेट्स येथील नीडहॅम हायस्कुल मधून पदवीधर झाली. तिला १९८७ साली युनायटेड स्टेटस नेव्हल अकॅडेमि कडून भौतिक विज्ञान ह्या विषयात बॅचलर ऑफ सायन्सची पदवी मिळाली आणि १९९५ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अभियांत्रिकी प्रबंधन ह्या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळाली .
*शिक्षण*
* नीडहॅम हायस्कूलˌ नीडहॅम, १९८३.
* बी.एस., पदार्थ विज्ञान, यू.एस. नेव्हल अकॅडेमी, १९८७.
* एम.एस., अभियांत्रिकी व्यवस्थापनˌ फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीˌ १९९५.
*मिलिटरी कारकीर्द*
सुनीता विल्यम्स मे १९८७ ला अमेरिकन नौदलात मध्ये रुजू झाल्या. नेव्हल कोस्टल सिस्टिम कमांडमध्ये सहा महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्तीनंतर त्यांची बेसिक डायविंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे त्यांची जुलै १९८९ मध्ये नेव्हल एव्हिएटर म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी सप्टेंबर १९९२ मध्ये अँड्रयू चक्रीवादळाच्या वेळी मियामी, फ्लोरिडा येथे झालेल्या रिलीफ ऑपेरेशनमध्ये महत्वाची कामगिरी बजावली. पुढे त्यांनी पायलट पद भूषविले. जून १९९८ मध्ये त्या सैपान येथे नियुतत असतांना त्यांची अवकाश मोहिमेकरिता नासा मध्ये निवड झाली.
*नासा कारकीर्द*
सुनीताचे अंतराळवीर उमेदवारीचे प्रशिक्षण ऑगस्ट १९९८ मध्ये जॉन्सन स्पेस सेंटर येथे सुरु झाले. मार्च २०१६ पर्यंत सुनीताने एकूण ७ वेळा मिळून ५० तास ४० मिनिटे स्पेसवाक पूर्ण केले. जास्त स्पेसवाक केल्यामुळे ती सर्वाधिक अनुभवी अंतराळवीरांच्या यादीत ७ व्या क्रमांकावर जाऊन पोहोचली.
🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏
संकलन -)
गजानन गोपेवाड
उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६
***********************************
*व्यायाम व योगा अवश्य करावा* *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-* 1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...